' रोज ठरलेल्या वेळी चहा-कॉफीची तलफ का येते? जाणून घ्या – InMarathi

रोज ठरलेल्या वेळी चहा-कॉफीची तलफ का येते? जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एक कटिंग द्या अशी हाक ऐकली नाही असा माणूस सापडणं अशक्य आहे.

गाव असो वा खेडं, कटिंग या शब्दाचा अर्थ सर्वांनाच ठाऊक असतो. कटिंग शब्दाचे अनेक अर्थ असले तरी, अर्धा कप चहा हा अर्थ हल्ली बराच रुढ झाला आहे.

बहुतेकांना चहा आणि कॉफी सारखी पिण्याची सवय असते. दिवसातून ते कितीतरी वेळा चहा किंवा कॉफी पितातच. चहा किंवा कॉफी प्यायल्याशिवाय जणू या लोकांना त्यांचा दिवस पूर्णच झालेला नाही असं वाटतं.

आपल्या प्रत्येकाचीच चहा पिण्याची एक वेळ नेहमीच ठरलेली असते आणि त्याच वेळेवर बरोबर चहा पिण्याची तलफ येते. पण असं का होतं, हे कदाचित तुम्हाला माहित नसेल.

चहाचा अतिरेक झाल्यास त्याला थेट व्यसन म्हणणा-यांचं प्रमाणही खूप आहे. विद्यार्थ्यांपासून ते थेट नोकरदारांपर्यंत प्रत्येकाकडूनच चहाचं व्यसन लागल्याची तक्रार केली जाते.

चहा ही गरज असली, तरी त्याच्या अतिरेकामुळे उद्भविणारे आजार हा तर सध्या काळजीचा विषय बनला आहे.

चहामुळे होणा-या अॅसिडीटीसारख्या आजारांपासून तुम्हीही त्रस्त आहात? मग हा लेख वाचाच.

कारण चहा, कॉफीचं नेमकं व्यसन कशामुळे लागतं याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

 

Tea Manish Dhane Flickr InMarathi

 

चहामधील कॅफेन हे एका प्रकारच्या ड्रग्ज सारखे काम करते. तुम्ही औषधे जरी यावर घेतलीत, तरीदेखील ते काही काळ काम करते आणि २४ तासांच्या आतमध्ये याची लक्षणं परत एकदा दिसायला सुरुवात होते.

सुरुवातीला याची लक्षणे खूप कमी प्रमाणात असतात.

पहिल्यांदा तुम्हाला मानिसकदृष्ट्या अस्वस्थ वाटतं. तुमचे स्नायू तुम्हाला थकल्यासारखे वाटतात. त्यामुळे तुम्ही कठोर स्वभावाचे नसलात, तरीदेखील तुमची उगाचच लहानसहान गोष्टींमुळे चिडचिड होते.

विनाकारण होणारी चीडचीड किंवा येणारी अस्वस्थता हे त्याचं सर्वात महत्वाचं लक्षण आहे. 

कालांतराने तुम्हाला अस्पष्ट अशा डोकेदुखीची जाणीव यामधून होते. त्यामुळे तुम्हाला कशातही लक्ष केंद्रित करणे कठीण होते. हे ड्रग्ज अति प्रमाणात सेवन केल्यामुळे स्नायूंच्या मंद वेदना, मळमळ आणि इतर फ्लू लक्षणे तुम्हाला जाणवू शकतात.

 

Brain becomes addicted to caffeine.Inmarathi1

 

एफडीएनने असे म्हटले आहे की, ८० टक्के अमेरिकन हे कॅफेनचे सेवन दररोज मोठ्या प्रमाणावर करतात. हे कॅफेन सेवन करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. याचे जास्त सेवन केल्यास ते आपल्या मेंदूवर परिमाण करते.

प्रयत्न करूनही काही गोष्टी सातत्याने विसरल्याचा अनुभव तुम्हाला कधी आला आहे? याचं उत्तर हो असेल, तर वेळीच सावध व्हा.

कारण तुम्ही चहा किंवा कॉफीचा अतिरेक केल्याचं हे लक्षण असु शकतं.

त्यामुळे आपण गोष्टी विसरायला लागतो, जसे कारमध्ये काही वस्तू विसरणे, ऑफिसच्या मिटिंगमध्ये केलेली तयारी विसरणे. अशा कितीतरी गोष्टी आपण विसरायला लागतो.

इतर ड्रग्जप्रमाणेच कॅफेन हे रासायनिकदृष्ट्या व्यसनी बनवणारे आहे. शास्त्रज्ञांनी हे १९९४ मध्ये सांगितले होते.

गेल्या मे महिन्यामध्ये डायग्नोस्टीक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मॅन्टल डिसऑर्डर (डीएसएम) च्या प्रकाशनामध्ये हे सांगितले की, कॅफेन हे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिमाण करते.

 

Brain-becomes-addicted-to-caffeine.Inmarathi2

 

आपण कॅफेनचे सेवन केल्यावर लगेचच आपले छोटे आतडे ते शोषून घेते आणि रक्तवाहिन्यांत ते पसरले जात. हे रसायन पाण्यात आणि पाण्याची मात्रा असलेल्या पदार्थात विरघळणारे असते.

अर्थातच त्यामुळे कॅफेन हे आपल्या मेंदूच्या पेशींच्या रिसेप्टरमध्ये योग्यप्रकारे बसू शकते. त्यामुळे अॅडिनोसिन हे प्रभावीपणे काम करायचे बंद करते आणि त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो.

स्टीफन आर. ब्रॉन असे म्हणतात की, कॅफेन आणि अल्कोहोलचे विज्ञान आणि काम करण्याची पद्धत काही प्रमाणात सारखीच आहे.

कॅफेन हा पदार्थ हा नैसर्गिकदृष्ट्या उत्तेजक असतो. लोक या प्रकियेचा चहा, कॉफी, सोडा किंवा ऊर्जा देणारी पेय यामधून दैनंदिन लाभ घेतात. परिणामी मस्तिष्काची रासायनिक आणि प्रत्यक्ष लक्षणे ही कालांतराने बदलतात.

त्यामुळे हे स्पष्ट होते की, चहा आणि कॉफी यांच्यामध्ये असलेल्या कॅफेनच्या अति सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता निर्माण होते.

 

 

Brain becomes addicted to caffeine.Inmarathi3

 

चहा आणि कॉफी यांच्यामधील कॅफेन सरळ आपल्या मेंदूवर परिणाम करत असल्याने त्याची आपल्याला सवय होते.  जसं दारू पिणाऱ्या लोकांना दारूची सवय होते अगदी तसंच.

यातलं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे सध्याच्या काळात जाणवणारा स्ट्रेस घालविण्याची धडपड.

या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप तणावग्रस्त परिस्थितीला सामोरे जावं लागतं आणि हा स्ट्रेस घालवण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्या परिने प्रयत्न करत असतो.

मात्र या प्रयत्नांतल्या सगळ्यात सोपा उपाय म्हणजे चहा किंवा कॉफी.

चहा आणि कॉफीमुळे उत्तेजन मिळत असल्याने लोक त्याचे सेवन मोठ्या प्रमाणावर करतात.

===

आपल्या मेंदूवर त्याचा परिणाम होतो, त्यामुळे दररोज त्या वेळी आपल्याला चहा पिण्याची तलफ येते आणि एकप्रकारचे आपल्याला त्याचे व्यसन जडते.

त्यातच आता प्रत्येक शहरात गल्लोगल्ली चहाची दुकानं थाटलेली दिसतात. पुर्वीपासून दिसणा-या चहाच्या टप-या आहेतच, पण त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी ब्रॅन्डेड चहादेखील उपलब्ध होत आहे, त्यामुळे दिवसाच्या कोणत्याही प्रहरी चहाची तलफ आली तरी अनेक पर्याय सहज मिळतात.

त्यातच दारु किंवा अन्य व्यसनापेक्षा चहा, कॉफी स्वस्त देखील असते, मात्र असं असलंं तरी चहा, क़ॉफीचं सेवन किती प्रमाणात आणि कधी करावं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

चहा, कॉफीच्या अतिरेकामुळे जडणारे विकार, त्याचा शरीरावर होणारा परिणाम यांकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?