' अँटीबायोटिक्स चालू असताना दारू पिऊ नये… खरं की खोटं? – InMarathi

अँटीबायोटिक्स चालू असताना दारू पिऊ नये… खरं की खोटं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आजकालच्या आधुनिक जीवनात जसं सर्व काही फास्ट झालं आहे त्याचप्रकारे लोकांच्या समस्याही वाढल्या आहेत. आजकाल लोकांमध्ये आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे. ह्यावेळी अनेकांना हा प्रश्न पडतो की, अँटीबायोटिक औषधी घेत असताना मद्यपान करणे योग्य आहे की, नाही.

तसे तर मद्यपान करणे आरोग्याच्या दृष्टीने वाईटच आहे. मद्यपान करू नये. अधिक प्रमाणात तर अजिबात करू नये. पण तरीही एखादी व्यक्ती मद्यपान करत असेल, तर अँटीबायोटिक्स घेत असताना त्याने मद्यपान थांबवायला हवे अथवा नाही यावर लोकांचे दुमत आहे.

 

antibiotics-aloccol-inmarathi
fourchette-et-bikini.fr

 

अनेक जण असे मानतात की मद्यपान केल्याने अँटीबायोटिक औषधी व्यवस्थित काम करत नाहीत. काही लोकांना असे देखील वाटते की, अँटीबायोटिक सुरू असताना मद्यपान केले तर त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात.

आज याच गोष्टी विषयीचे तथ्य आपण जाणून घेणार आहोत. 

 

antibiotics-aloccol-inmarathi01
doctorshealthpress.com

 

लंडनच्या जेनीटूर्नरी क्लिनिक ने ह्यावर ३०० हून जास्त लोकांवर सर्वे केला होता. ज्यानुसार ८१ टक्के लोकं असे मानतात की, मद्यपान केल्याने अँटीबायोटिक चा प्रभाव कमी होत नाही. तर ७१ टक्के लोकांच्या मते मद्यपानाचा ह्यावर काहीही फरक पडत नाही.

पण ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. पण डॉक्टरांच्या मते ह्या चुकीच्या धारणा लोकांना मद्यपान करण्यापासून दूर ठेवतात. म्हणून ते देखील लोकांच्या डोळ्यावरील पट्टी तशीच राहू देतात. ह्यामुळे लोक मद्यपानापासून दूर राहतात आणि औषधं वेळेवर घेतात.

 

antibiotics-aloccol-inmarathi03
glamour.com

 

अँटीबायोटिक्सवर दारूचा काहीही वाईट परिणाम होत नाही. पण अश्याही काही अँटीबायोटिक्स औषधी आहेत ज्या घेत असताना मद्यपान करणे चांगले नाही. सेफालोस्पोरिन सेफोटेटान घेताना जर तुम्ही मद्यपान करता तर तो शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतात.

ह्या दोघांचे एका वेळी सेवन केल्याने त्यांच्यातून एसीटल्डिहाइड नावाचे केमिकल बनते. ज्यामुळे चक्कर येणे, उल्टी होणे, डोकेदुखी, छातीत दुखणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

 

antibiotics-aloccol-inmarathi02
YouTube

 

डायसल्फाईड नावाचे औषध घेत असताना देखील अश्याच प्रकारची लक्षणे आढळतात. ही औषधं मद्यपान सोडविण्यासाठी वापरण्यात येते. ह्यामागे एकच कारण असतं की, जर कोणी मद्यपान केलं तर त्याला त्याचा त्रास व्हावा आणि त्यामुळे त्यांनी मद्यपान करण्यापासून दूर राहावे.

तसेच अँटीबायोटिक मेट्रोनिडाजोल घेताना देखील मद्यपान न करण्याची ताकीद दिली जाते. कारण असे केल्याने डोकं दुखणे, चक्कर येणे, उलटी होणे अश्या सर्व समस्या उद्भवू शकतात. ही औषध मेट्रोनिडाजोलला दातात इन्फेक्शन असल्यास तसेच इतर जखमांच्या उपचारासाठी दिल्या जाते.

आणखी इतरही काही अँटीबायोटिक्स आहेत, जे घेताना मद्यपान करण्यास मनाई करण्यात येते. टिनिडाजोल, लाइनेजोलिड आणि एरिथ्रोमायसिन इत्यादी.

 

antibiotics-aloccol-inmarathi04
movenoticias.com

 

पण त्यासोबतच अश्याही काही अँटीबायोटिक्स आहेत ज्या घेताना मद्यपान केल्यास काहीही परिणाम होत नाही. पण असे केल्याने तुमचा आजार बरा व्हायला वेळ नक्की लागू शकतो.

अँटीबायोटिक्सचा वापर हा अनेक आजारांच्या उपचारात केला जातो. म्हणू डॉक्टर नेहमीच अँटीबायोटिक्स घेताना मद्यपान करण्यास मनाई करतात. कारण आजार बरा होण्याच्याच बहाण्याने लोकं मद्यपानापासून दूर राहतात.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?