' पुरुषांचे वर्चस्व झुगारून बॉलीवूडला ‘प्रकाश’ देणाऱ्या महिलेची कहाणी! – InMarathi

पुरुषांचे वर्चस्व झुगारून बॉलीवूडला ‘प्रकाश’ देणाऱ्या महिलेची कहाणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण जो तीन तासांचा चित्रपट बघतो. तो बनविण्यासाठी त्यामागे खूप मेहनत आणि तेवढेच लोकही असतात. म्हणजे जे त्या चित्रपटात अभिनय करत आहेत त्यात केवळ त्यांचीच मेहनत नसते तर त्यामागे अनेक लोक असतात ज्यांनी रात्रंदिवस त्याकरिता काम केलेलं असतं.

एका चित्रपटामागे, त्या चित्रपटाची कहाणी लिहिणाऱ्या लेखकापासून ते स्पॉटबॉय आणि मेकअप आर्टीस्टपर्यंत सर्वांची मेहनत असते. तो चित्रपट त्या सर्वांच्या योगदानातून बनतो.

आणि जर तो चित्रपट हिट गेला तर जरी सर्वत्र अभिनेत्यांची किंवा दिग्दर्शकांची वाहवाह होत असली तरी त्यामागे ह्या सर्व पडद्यामागच्या लोकांची मेहनत देखील असते.

चित्रपटाचे शुटींग करताना जेवढा महत्वाचा अभिनेत्याचा अभिनय असतो तेवढ्याच महत्वाच्या इतर गोष्टी देखील असतात.

जसे त्याचे कपडे, मेक-अप आणि त्यासोबतच कुठलाही सीन शूट करताना प्रॉपर लाईट असणे देखील तेवढेच महत्वाचे असते. जर लाईट पुरेसा नसेल तर सीन दिसायला चांगला दिसत नाही.

 

cameraman-inmarathi

 

शुटींग करताना वापरण्यात येणारे लाईट्स आणि त्याचे टूल्स हे खूप वजनी असतात. तसेच त्यांना डायरेक्ट जसे सांगण्यात येईल तसे सेट करत जावे लागते. कधी कधी ते लाईट्स आणि इतर टूल्स घेऊन इकडून तिकडे भटकावे देखील लागते.

ह्या सर्वांना सांभाळायचे काम हे गॅफरचे असते. गॅफर हा कॅमेरामन साठी की-पर्सन असतो.

त्याच्याशिवाय कॅमेरामन काहीही करत नाही. त्याच्यावर सेटवर वापरण्यात येणाऱ्या सर्व लाईट्स सांभाळण्याची जबाबदारी असते. तसेच त्याला इतर टेक्नीकल आणि इलेक्ट्रिक बाबींकडे लक्ष द्यावे लागते.

 

Hetal-Dedhia-inmarathi04

 

लाईटमन आणि कॅमेरामनचे काम हे खूप मेहनतीचे असते. ह्यात तुम्हाला त्या मोठ्या वजनी लाईट्स उचलाव्या लागतात. त्यांना नीट सेट करावे लागते. सर्व टेक्नीकल गोष्टी यायला हव्या असतात. आता जिथे टेक्नीकल हा शब्द आला तिथे पुरुषत्व आले.

टेक्नीकल काम असो, अंगमेहनतीचे काम असो हे पुरुषच करणार, असा आपला समज आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रात देखील पुरुषांचेच वर्चस्व बघायला मिळतं.

पण ह्याच क्षेत्रात एक अशी स्त्री आहे, जी ही मानसिकता बदलायचा प्रयत्न करत आहे. ती स्त्री म्हणजे बॉलीवूडची पहिली आणि एकमात्र फिमेल गॅफर ‘हेतल देधिया’…

हेतल देधियाने १९ व्या वर्षी जेव्हा ह्या क्षेत्रात आपले करिअर सुरु केले, तेव्हाच तिला जाणवले होते, की ह्या पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रात तिला आपले स्थान बनविण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. खूप झगडावे सुद्धा लागणार आहे. आणि त्याची सुरवात तिच्या घरातूनच झाली होती.

 

Hetal-Dedhia-inmarathi

 

तिचे वडील म्हणजेच मुलचंद देधिया हेदेखील तिच्या ह्या निर्णयाच्या विरोधात होते. ते स्वतः बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध गॅफर पैकी एक होते.

पण तरी तिने तिची जिद्द सोडली नाही. तिने हेच क्षेत्र निवडले आणि त्यात पूर्ण मेहनतीने काम करण्यास सुरवात केली. करिअरच्या सुरवातीलाच तिला ह्या पुरुषी मानसिकतेला बळी पडावे लागले.

कारण ह्या क्षेत्रातील पुरुषांना हे मान्यच नव्हते की, कुठली स्त्री हे काम करू शकते. तिला अनेकदा टोमणे देखील सहन करावे लागले की, “हिच्याकडून काहीही होणार नाही…”

हे काम करताना अतिशय क्रिएटिव्ह असावे लागते. म्हणजे कुठलाही लाईट घेतला आणि कुठेही लावला असे चालत नसते. त्यासाठी तुम्हाला जरा क्रिएटिव्ह असावे लागते, कुठला लाईट कुठल्या ठिकाणी कुठल्या अॅन्गलवर सेट करायचा हेदेखील तुम्हाला कळायला हवे.

हे सर्व हेतल उत्तमरीतीने करते आहे.

 

Hetal-Dedhia-inmarathi02

 

ती ते भारी लाईट्स स्वतः उचलते पण आणि त्यांना सेट देखील करते. ह्याकरिता नक्कीच खूप परिश्रम घ्यावे लागत असतील. पण हेतल ही खरेच खूप साहसी आहे.

तिने हार पत्करली नाही, सर्व कठीण परिस्थितींना सामोरे जाऊन तिने हे साध्य करून दाखवले. म्हणूनच कदाचित ती बॉलीवूडची पहिली स्त्री गॅफर बनू शकली.

 

Hetal-Dedhia-inmarathi01

 

हेतलने आजवर ‘डॉन’, ‘लक बाय चान्स’, ‘गुजारीश’ यांसारख्या हिंदी तर ‘MI4: Ghost Protocol’ आणि ‘Eat Pray Love’ ह्या हॉलीवूड चित्रपटांसाठी देखील काम केलेले आहे.

पण सध्या ती तिच्या हॉलीवूड प्रोजेक्ट्सवर जास्त लक्ष देते, कारण तिच्या मते, तिथे तिला तिच्या कामाला आणखी चांगल्याप्रकारे कसे करता येईल हे शिकायला मिळते.

बीबीसीला दिलेल्या एक मुलाखतीत हेतल म्हणाली होती की,

स्त्रियांना ह्या क्षेत्रात यायला हवे. कारण स्त्रिया ह्या पुरुषांच्या तुलनेत अधिक क्रिएटिव्ह असतात. त्यामुळे त्या ह्या क्षेत्रात अधिक प्रभावीपणे काम करू शकतात. आणि ह्यामुळे समाजातील लोकांमध्ये स्त्रीबाबत असलेली मानसिकता देखील बदलण्यास मदत होईल.

 

Hetal-Dedhia-inmarathi06

 

नक्कीच हेतल जे काम करते आहे ते काही सोपे नाही, त्यासाठी अतिशय मेहनत आणि जिद्दीची गरज आहे. आज पुरुषी वर्चस्व असलेल्या अश्या क्षेत्रात काम करणे म्हणजे काही खायचे काम नाही, तर त्या क्षेत्रात आपलं एक वेगळे नाव करून हेतलने यशाचे शिखर गाठले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?