' मृत्यूच्या समीप असलेल्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय विचार चालू असतात..? – InMarathi

मृत्यूच्या समीप असलेल्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय विचार चालू असतात..?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मरण हे कोणाला कधी येईल, याबद्दल आपण काहीही सांगू शकत नाही, कारण चांगला धडधाकट मनुष्याचा  देखील लहानश्या आजारामुळे मृत्यू होतो. अपघातात देखील आजकाल खूप जणांचा सहज मृत्यू होतो. सकाळी घरातून निघणारे लोक रात्री परत घरी सुखरूप येतील की नाही चिंता देखील लोकांना लागून राहिलेली असते.

पण मृत्यूला थांबवणे कोणाला शक्य नसते, जर मृत्यू येणारच असेल तर तो कुठूनही आणि कसाही येऊ शकतो.

पण अंथरुणाला खिळलेल्या माणसाचा मृत्यू जर जवळ आलेला असेल, तर माणसाच्या मनामध्ये काय विचार त्यावेळी चालू असेल याबद्दल तुम्ही कधी अंदाज लावू शकला आहेत का ? नाही ना.

 

Thinking Of Death People.Inmarathi

 

शास्त्रज्ञांनी यावर काही रिसर्च केली आहे. पण त्यामध्ये देखील त्यांना काही योग्य अशी माहिती मिळाली नाही. शास्त्रज्ञांना याबद्दल काही माहिती नक्कीच आहे, पण शेवटी ही गोष्ट एक रहस्यच बनून राहिली आहे. सध्याच झालेल्या एका रिसर्चमध्ये शास्त्रज्ञांना काही रंजक माहिती मिळाली आहे.

बर्लिनचे चेरीट विद्यापीठ आणि ओहायोच्या सिनसिनाटी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी जेन्स द्रेयरच्या नेतृत्वाखाली हा रिसर्च केला होता.

यासाठी शास्त्रज्ञांनी काही रुग्णांच्या मृत्यूचे बारकाईने निरीक्षण केले. त्यासाठी त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडून परवानगी घेतली होती. हे जे रुग्ण होते, त्यातील काही भीषण अपघाताच्या दुर्घटनेमध्ये जखमी झाले होते किंवा स्ट्रोक आणि कार्डिक अरेस्टचे शिकार झाले होते.

शात्रज्ञांना या रिसर्चमध्ये हे समजेल की, पशु आणि मनुष्य या दोघांचेही मेंदू मृत्यूच्या वेळी एकाचप्रकारे काम करतात.

हे ही वाचा – ज्ञानगंज : मृत्यूवर विजय मिळवणाऱ्यांची हिमालयातील रहस्यमय भूमी!

Thinking Of Death People.Inmarathi1

 

मृत्यूच्या वेळी रुग्णाच्या मनामध्ये काय चालू आहे, एवढ्यासाठीच ही रिसर्च नव्हती, तर त्यावेळी त्या मृत्यूपासून कसे वाचवता येऊ शकते हे समजून घेणे देखील या रिसर्चचा एक भाग होता. या शास्त्रज्ञांच्या शोधाच्या अगोदर ‘ब्रेन डेथ’ बद्दल आपल्याला जेवढी माहिती होती, त्यातील जास्तकरून माहिती आपल्याला पशूंवर करण्यात आलेल्या प्रयोगांमधून मिळालेली आहे.

मृत्यूच्या वेळी शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह थांबतो आणि त्यामुळे मेंदूमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. सेरेबल इस्किमया नावाच्या या स्थितीमध्ये गरचेचे रासायनिक अवयव कमी होतात आणि त्यामुळे मेंदूची ‘इलेक्ट्रिकल एक्टिव्हीटी’ पूर्णपणे संपुष्टात येते.

असे मानले जाते की, मेंदू शांत होण्याची ही प्रक्रिया यामुळे अंमलात येते, कारण न्यूरॉन आपली ऊर्जा संरक्षित करतात. पण त्यांचे ऊर्जा संरक्षित करणे, काहीच कामाला येत नाही, कारण मृत्यू हा येतोच असतो.

सर्व महत्त्वाचे आर्यन मेंदूच्या कोशिकांना सोडून वेगळे होतात, ज्यामुळे अॅडेनोसिन ट्रायफॉस्फेटचा पुरवठा कमी होतो.

हा तो जैविक जटिल रसायन आहे, जो संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जा साठवून ठेवण्याचे काम करतो आणि त्या उर्जेला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्याचे काम करतो. यानंतर टिश्यू रिकव्हरी अशक्य होते.

 

Thinking Of Death People.Inmarathi2

 

पण शास्त्रज्ञांची टीम माणसांच्या संबंधातील या प्रक्रियेला अजून खोलात जाऊन समजून घेऊ इच्छित होती. त्यामुळे त्यांनी काही रुग्णांच्या मेंदूच्या न्यूरोजीकल हालचालींवर लक्ष्य ठेवण्यास सुरुवात केली.

डॉक्टरांकडून शास्त्रज्ञांना सांगितले होते की, या रुग्णांना इलेक्ट्रोड स्ट्रिप्सचा वापर करून बेशुद्ध अवस्थेतून परत बाहेर आणण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये.

शास्त्रज्ञांना या रिसर्चमध्ये हे आढळून आले की, नऊमधील आठ रुग्णांच्या मेंदूची कोशिका मृत्यूला टाळण्याचा प्रयत्न करत होती. त्यांनी हे पाहिले की, हृदय थांबल्यानंतर देखील मेंदूच्या कोशिका आणि न्यूरॉन काम करत होते.

न्यूरॉनची काम करण्याची प्रक्रिया अशी असते की, न्यूरॉन हे चार्ज केलेल्या आर्यननी स्वतःला भरतात आणि स्वतः मध्ये आणि आपल्या वातावरणामध्ये विद्युत असंतुलन बनवतात. यामुळे ते शॉक निर्माण करण्यामध्ये सक्षम होतात.

शास्त्रज्ञांनुसार, हे विद्युत असंतुलन बनवून ठेवणे हा एक सारखा करण्यात येणारा प्रयत्न आहे.

 

Thinking Of Death People.Inmarathi3

हे ही वाचा – महाभारतातील सर्वात दाहक मृत्यूमागची…जन्मजन्मांतराच्या सूडाची एक कहाणी

यासाठी कोशिका वाहणाऱ्या रक्ताचा वापर करतात आणि त्यातून ऑक्सिजन आणि रासायनिक ऊर्जा घेतात. शास्त्रज्ञांनुसार, जेव्हा शरीर मरते तेव्हा मेंदूला रक्ताचा पुरवठा होणे बंद होतो. त्यावेळी ऑक्सिजनपासून वंचित असलेले न्यूरॉन त्यांनी सोडलेल्या संसाधनांना परत मिळवण्याचा प्रयत्न करते.

इलेक्ट्रोकेमिकल बॅलेन्समुळे मेंदूच्या कोशिका नष्ट होतात, ज्यामुळे खूप मात्रेमध्ये थर्मल एनर्जी रिलीज होते आणि त्यानंतर माणसाचा मृत्यू होतो. या रिसर्चच्या जोरावर शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की, मृत्यू आज जसा अटळ आहे तसेच तो भविष्यात देखील असे काही सांगता येत नाही.

 

Thinking Of Death People.Inmarathi4

जेन्स द्रेयर यावर म्हणतात की, “एक्स्पेन्सिव्ह डिपोलरायझेशनमुळे कोशिकीय परिवर्तनाची सुरुवात होते आणि त्यानंतर मृत्यू होतो. पण ही खरचं मृत्यूची वेळ नसते, कारण डिपोलरायझेशनला ऊर्जेचा पुरवठा करून या स्थितीला उलटवले जाऊ शकते.

पण या गोष्टीला अंमलात आणण्यासाठी अजूनही कितीतरी शोध करण्याची गरज आहे. द्रेयर अजून म्हणतात की,” मृत्यू सारखीच हा तांत्रिक संबंध पैलू एक किचकट घटना आहे. ज्याच्याशी जोडलेल्या प्रश्नांची सरळ साधी उत्तरे उपलब्ध नाही आहे.

यावरून हे समजते की, मृत्यू जरी अटळ असला तरीदेखील तो येण्याअगोदर तो टाळण्यासाठी रुग्णाच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या हालचाली घडत असतात.

===

हे ही वाचा – यमराजांकडून मृत्यूपूर्वी संकेत मिळतात का, जाणून घ्या यामागची रंजक पौराणिक कथा…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?