' "चिंता" करताय तुम्हला कल्पनाही नसेल कि चिंता करण्याचे ही फायदे असतात

“चिंता” करताय तुम्हला कल्पनाही नसेल कि चिंता करण्याचे ही फायदे असतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपण बऱ्याचदा आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या तोंडून एक गोष्ट सतत ऐकतो, ती म्हणजे चिंता नको करू.. सगळं काही ठीक होईल, जस्ट चिल, सगळं सुरळीत होईल, असे डायलॉग्स आपण दिवसातून किमान १० वेळा तरी ऐकतोच! कधी आपल्या जवळच्या नातेवाईंकांच्या तोंडून तर कधी रस्त्यावर चालणाऱ्या २ अनोळखी मित्रांच्या तोंडून.

पण ही चिंता, काळजी टेन्शन हा नक्की काय प्रकार आहे? आणि तो सगळ्यांच्याच पाचवीला का पुजला आहे!

मानसशास्त्रानुसार Anxiety disorder असणारे लोक खूप खास असतात. ह्या डिसऑर्डरमध्ये व्यक्ती खूप चिंतीत असते आणि ती खूप विचार करते.

 

anxiety disorder inmarathi
anxiety.org

 

असे लोक जीवनात कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद ठेवतात. जर तुम्हालाही Anxiety disorder असेल तर त्याची केवळ वाईट बाजू बघू नका तर त्याची चांगली बाजू देखील अनुभवा.

 

5-super-powers-people-anxiety-disorder-inmarathi03
homeplanetearth.org

१. आईक्यू वाढणे

 

anxiety inmarathi
the economic times

 

बुद्धयांक किंवा ज्याला इंग्लिश मध्ये IQ (Intelligence quotient) असंही म्हंटल जातं याबाबतीत तर तुम्हाला ठाऊक असेलच की बुद्धयांक म्हणजे काय तो कसा मोजला जातो शिवाय त्याच्या आधारावर एखाद्याची बुद्धिमत्ता किंवा बौद्धिक कल कोणत्या बाजूला आहे हे ओळखले जाते!

 आपण १० वी किंवा १२ वी नंतर बऱ्याच aptitude test देतो, ती सुद्धा एक प्रकारची बुद्धयांक चाचणीच असते!

न्यूयॉर्क च्या सुनी डाउनस्टेट मेडिकल सेंटरच्या रिसर्चनुसार, Anxiety मुळे लोक जास्त स्मार्ट होऊन जातात. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण या अवस्थेत लोक खूप बारकाईने विश्लेषण करतात.

ते प्रत्येक संभाव्य परिणामाबाबत जागरुक असतात. आणि ते त्यासाठी तयार देखील असतात.

 

२. जास्त सहानुभूती व्यक्त करणे

 

 5-super-powers-people-anxiety-disorder-inmarathi05
anxietyhack.com

 

सहानुभूती किंवा संवेदनशीलता हा माणसाच्या स्वभावाचा एक पैलू आहे, आपण सगळेच कुठल्या ना कुठल्या बाबतीत संवेदनशील किंवा हळवे होतोच, पण त्यामागची कारण वेगवेगळी असतात!

पण हेच Anxiety असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत लागू होत नाही!

सामान्य लोकांच्या तुलनेत Anxiety disorder असलेला व्यक्ती जास्त संवेदनशील असते, ती इतरांप्रती अधिक सहानुभूती दर्शविते.

कधी कधी ते एवढे संवेदनशील होऊन जातात की लोक त्यांना समजूच नाही शकत. असे लोक इतरांच्या भावनांना अधिक प्रभावीपणे समजू शकतात. हे खूप इमोशनल असतात.

 

३. खोटं जाणायची क्षमता

 

5-super-powers-people-anxiety-disorder-inmarathi07
inspireactachieve.com

 

खोटं बोलणं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे, अशी कोणीही व्यक्ती नाही जी आजवर कधीच खोटं बोललेली नाही! त्यामुळे कमी जास्त प्रमाणात का होईना सगळेच लोकं खोटं बोलतातच!

पण Anxiety disorder ज्यांना आहे त्यांना तर या खोटेपणाचा तिटकारा असतो!

Anxiety disorder असलेली व्यक्ती खूप सतर्क असतात. जर त्यांच्या समोर कोणी खोटे बोलले तर ते त्यांना लगेचच कळून जाते. अशी लोकं खूप साहसी असतात.

जर समोरची व्यक्ती काही चुकीचे करत असेल तर असे व्यक्ती त्याला विरोध करायलाही घाबरत नाहीत. त्या नेहेमी खरं बोलतात आणि जे सत्य असेल ते समोर आणण्याचा प्रयत्न करतात.

 

४. सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेला ओळखण्याची शक्ती

 

crowded inmarathi
patheos

 

आपल्या आसपास विविध प्रकारची माणसं वावरत असतात आणि त्यांचा आपल्या जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रभाव पडतच असतो! मग ती लोकं कुटुंबातली असोत, मित्रमंडळींपैकी असतो किंवा तुमच्या ऑफिस मधले कलीग असोत!

पण यापैकी प्रत्येक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन येते असं नाही, काही लोकं ही खूप निगेटिव्ह किंवा नकारात्मक विचारांचे असतात, त्यामुळे अशा लोकांपासून शक्यतो अंतर ठेवूनच राहिले पाहिजे!

कारण त्यांच्या या विचारांचा आपल्या मनावर परीणाम होण्याची दाट शक्यता असते!

जर आपल्या सोबत एखादी अशी व्यक्ती आहे जी केवळ नकारात्मक बोलते आहे, तर अश्या व्यक्तीला आपण असे म्हणू शकत नाही की तुमच्याकडून खूप नेगेटिव्ह फिलिंग येत आहे.

पण Anxiety disorder असलेल्या व्यक्ती असे बोलायला घाबरत नाही. ते सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेला ओळखतात आणि जर त्यांना कोणी नकारात्मक वाटत असेल तर त्यांना तोंडावर ते हे सांगतात.

५. जीवन वाचविण्याची क्षमता

 

climb inmarathi
psychological science

 

Anxiety disorder असलेली व्यक्ती त्या गोष्टींची देखील कल्पना करून घेते जे आपल्यासारखे सामान्य लोक नाही करू शकत.

आणि ही शक्ती सर्व्हायव्हल मॅकॅनिजमच्या स्वरुपात वापरली जाते. म्हणजे जर काही वाईट होणार असेल तर ह्या लोकांना त्याचा आभास आधीच झालेला असतो. अश्यात ते आपल्या आजूबाजूच्या लोकांना सतर्क करतात.

तर Anxiety disorder ह्या मानसिक आजाराचे केवळ वाईट परिणामाच नाही तर ह्याचे काही चांगले परिणाम देखील आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

6 thoughts on ““चिंता” करताय तुम्हला कल्पनाही नसेल कि चिंता करण्याचे ही फायदे असतात

 • March 8, 2018 at 9:24 am
  Permalink

  आपल्या साईटवर खूप छान आणि वाचनीय लेख येतात.
  परंतु आपल्या पेज सारखीच अनेक पेज लाइक केल्याने त्या गराड्यात आपल्या नवीन लेख कधीतरीच timeline वर दिसतो त्यामुळे आपण व्हाट्सअँप सर्विस सुरु करावी हि विनंती. जेणेकरून जेव्हा जेव्हा आपण नवीन लेख अपलोड कराल तेव्हा आपल्या आर्टिकल ची लिंक मला व्हाट्सअँप वर भेटेल.
  अनेक फेसबुक पगणी अशी व्हाट्सअँप सर्विस सुरु करावी हि विनंती.

  Reply
  • March 8, 2018 at 11:22 am
   Permalink

   धन्यवाद! कृपया आमचं अँड्रॉइड अँप तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करून घ्या.हे इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक लेखाचे नोटिफिकेशन मिळेल. त्यात “फेव्हरेट” चा पर्याय आहे! हा पर्याय वापरून आपण आपल्या आवडीचे लेख सेव्ह करू शकता आणि कधीही वाचू शकता !

   Reply
 • November 2, 2018 at 5:50 pm
  Permalink

  good

  Reply
 • December 1, 2018 at 1:35 pm
  Permalink

  great

  Reply
 • December 10, 2018 at 10:24 pm
  Permalink

  mast

  Reply
 • February 26, 2020 at 5:37 am
  Permalink

  छान लेख!

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?