भल्या भल्यांना लाजवेल अशी आहे ह्या ६६ वर्षीय वृद्धाची बॉडी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

जेव्हापासून शाहरुख, सलमान, ह्रीतीकने आपले सिक्स पॅक अॅब्ज बनवले आहेत तेव्हापासून नवीन हिरोच नाही तर स्वतःला हिरो समजणारा गल्लीतील प्रत्येक मुलगा सिक्स पॅक अॅब्ज बनविण्याच्या मागे लागला. त्यानंतर तर हा ट्रेण्डच झाला. आता तर हे केवळ सिक्स पॅक अॅब्ज एवढ्या पुरतच नसून संपूर्ण बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा ट्रेण्ड आला आहे.

 

Hritik-InMarathi

फिट राहाणे ह्याची व्याख्या म्हणजे बॉडी बनवणे. मग ह्यासाठी रोज जिममध्ये दिवस घालवणे, डायट घेणे आणि कधी कधी तर औषधी आणि इंजेक्शन घेऊन देखील हवी तशी बॉडी तरुण बनवतात.

बॉडी बनवणे किंवा फिट राहणे हे तसे चांगलेच, त्याच बहाण्याने लोक व्यायाम तर करतात. पण हिरो सारखी बॉडी बनवणे काही खायचं काम नाही. कित्येकदा चित्रपटातील हिरोंची जी बॉडी पडद्यावर दिसते ते केवळ इफेक्ट्स असतात. पण तरी ह्या हिरोंसारखी बॉडी बनविण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तरी कधी कधी आपल्याला हवी तशी परफेक्ट बॉडी मिळत नाही.

 

ramlal-nishad-inmarathi
topyaps.com

पण आज आम्ही तुम्हाला एका अश्या व्यक्ती बद्दल सांगणार आहे ज्याची बॉडी बघून सलमानही लाजेल. आणि हो ही व्यक्ती काही विशी-तिशीतली नाही तर चक्क साठीच्या पलीकडे गेलेली आहे. पण तरी त्यांनी स्वतःला एवढं जबरदस्त मेंटेन केलं आहे, की तुम्ही तरुण त्यांच्यासमोर काहीच नाही.

 

ramlal-nishad-inmarathi04
livecities.in

ही व्यक्ती म्हणजे ६६ वर्षीय रामलाल निषाद. निषाद ह्यांनी फीट राहण्याचा आणि एक सुदृढ शरीर मिळविण्याचा मूलमंत्र जाणला आणि आज ते तरुणांचे आयकॉन बनले आहेत. त्यांची बॉडी बघून भल्या भल्याचे डोळे विस्फारतील.

त्यांच्या बाबत सर्वात महत्वाची बाब म्हणजे ते काही आपल्या सारख्या मेट्रो शहरांतील कुठल्या जिम मध्ये जाऊन ही बॉडी बनविलेली नाही. तर ते मेहनत आणि मजदुरी करतात. पोटाची खळगी भागविण्यासाठी ह्या व्यक्तीला मोल-मजुरी करावी लागते तो कुठे ह्या जिम मध्ये जाणार. मग आता प्रश्न हा की निषाद ह्यांनी एवढी अप्रतिम बॉडी मिळविली कशी ? तीही जिममध्ये न जाता?

 

ramlal-nishad-inmarathi02
livecities.in

निषाद हे छत्तीसगड राज्यातील रायगड ह्या जिल्ह्यात राहतात. त्यांनी कुठलंही स्पेशल डायट किंवा आपले खाणे पिणे न बदलता ही बॉडी बनविली आहे. जेव्हा ते शर्टलेस होतात तेव्हा सलमान देखील त्यांच्यासमोर कमी वाटायला लागतो.

रामलाल निषाद ह्यांनी अभिनेते धर्मेंद्र ह्यांच्यापासून प्रभावित होऊन नियमितपणे व्यायाम करण्यास सुरवात केली. आणि त्या व्यायामाच्या जोरावरच त्यांनी अशी शरीरयष्टी कमवली.

त्यांच्या मते तुम्हाला फिट राहण्यासाठी खूप काही करण्याची गरज नाही तर, केवळ नियमित व्यायाम आणि पोषक आहार घेऊन देखील तुम्ही फिट राहू शकता.

 

ramlal-nishad-inmarathi03
bcdn.newshunt.com

निषाद हे मागील ५२ वर्षांपासून नियमितपणे व्यायाम करत आहेत. ६६ वर्षांच्या वयात देखील ते रोज नियमितपणे ४०० पुशअप्स, ७० बेंच प्रेस मारतात. तर ५०-५० राउंड बायसेप चा व्यायाम करतात.

आताचे युवा देखील हे करू शकणार नाहीत. म्हणूनच आज निषाद हे तरुणांचे आयकॉन बनले आहेत. ते तुमच्या आमच्या सारख्या सर्वांसाठीच एक प्रेरणा आहेत. जर आपल्याला निरोगी आणि चांगले जीवन जगायचे असेल तर नियमितपणे व्यायाम हा केलाच पाहिजे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?