' भल्या भल्या तरुणांना लाजवेल अशी आहे ह्या ६८ वर्षीय वृद्धाची बॉडी… – InMarathi

भल्या भल्या तरुणांना लाजवेल अशी आहे ह्या ६८ वर्षीय वृद्धाची बॉडी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जेव्हापासून शाहरुख, सलमान, ह्रीतीकने आपले सिक्स पॅक अॅब्ज बनवले आहेत, तेव्हापासून नवीन हिरोच नाही तर स्वतःला हिरो समजणारा गल्लीतील प्रत्येक मुलगा सिक्स पॅक अॅब्ज बनविण्याच्या मागे लागला.

त्यानंतर तर हा ट्रेण्डच झाला. आता तर हे वेड केवळ सिक्स पॅक अॅब्ज एवढ्या पुरतेच नसून संपूर्ण बॉडी ट्रान्सफॉर्मेशन हा एक ट्रेण्डच आला आहे.

जिममध्ये जाऊन आपले शरीर पिळदार करून घेण्याकडे अनेकांचा कल असलेला पाहायला मिळतो.

 

Hritik-InMarathi

 

फिट राहणे ह्याची व्याख्या म्हणजे बॉडी बनवणे अशीच झाली आहे जणू! मग ह्यासाठी रोज जिममध्ये वेळ घालवणे, त्यानुसार डाएट करणे आणि कधी कधी तर औषधे आणि इंजेक्शन घेऊन देखील हवी तशी बॉडी तरुण बनवतात.

बॉडी बनवणे किंवा फिट राहणे हे तसे चांगलेच आहे. त्याच बहाण्याने लोक व्यायाम तरी करतात. पण हिरो सारखी बॉडी बनवणे काही सोपे काम नाही.

कित्येकदा चित्रपटातील हिरोंची जी बॉडी पडद्यावर दिसते, ते केवळ तंत्रज्ञानाने दिलेले इफेक्ट्स असतात.

पण तरी ह्या हिरोंसारखी बॉडी बनविण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तरी कधी कधी आपल्याला हवी तशी परफेक्ट बॉडी मिळत नाही.

 

ramlal-nishad-inmarathi

 

पण आज आम्ही तुम्हाला एका अश्या व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याची बॉडी बघून सलमानही लाजेल.

हो ही व्यक्ती काही विशी-तिशीतली नाही तर चक्क साठीच्या पलीकडे गेलेली आहे. पण तरी त्यांनी स्वतःला एवढं जबरदस्त मेंटेन केलं आहे, की तुम्ही तरुण त्यांच्यासमोर काहीच नाही.

 

ramlal-nishad-inmarathi04

 

ही व्यक्ती म्हणजे ६६ वर्षीय रामलाल निषाद. निषाद ह्यांनी फीट राहण्याचा आणि एक सुदृढ शरीर मिळविण्याचा मूलमंत्र जाणला आणि आज ते तरुणांचे आयकॉन बनले आहेत. त्यांची बॉडी बघून भल्या भल्या तरुणांचे डोळे विस्फारतील.

त्यांच्या बाबत सर्वात महत्वाची बाब म्हणजे ते काही आपल्या सारख्या मेट्रो शहरांतील कुठल्या जिममध्ये जाऊन ही बॉडी बनविलेली नाही. तर ते मेहनत आणि मजदुरी करतात.

पोटाची खळगी भागविण्यासाठी ह्या व्यक्तीला मोल-मजुरी करावी लागते तो कुठे ह्या जिम मध्ये जाणार. मग आता प्रश्न हा की निषाद ह्यांनी एवढी अप्रतिम बॉडी मिळविली कशी ? तीही जिममध्ये न जाता?

 

ramlal-nishad-inmarathi02

 

निषाद हे छत्तीसगड राज्यातील रायगड ह्या जिल्ह्यात राहतात. त्यांनी कुठलंही स्पेशल डायट किंवा आपले खाणे पिणे न बदलता ही बॉडी बनविली आहे. जेव्हा ते शर्टलेस होतात तेव्हा सलमान देखील त्यांच्यासमोर कमी वाटायला लागतो.

रामलाल निषाद ह्यांनी अभिनेते धर्मेंद्र ह्यांच्यापासून प्रभावित होऊन नियमितपणे व्यायाम करण्यास सुरवात केली. आणि त्या व्यायामाच्या जोरावरच त्यांनी अशी शरीरयष्टी कमवली.

त्यांच्या मते तुम्हाला फिट राहण्यासाठी खूप काही करण्याची गरज नाही तर, केवळ नियमित व्यायाम आणि पोषक आहार घेऊन देखील तुम्ही फिट राहू शकता.

 

ramlal-nishad-inmarathi03

 

निषाद हे मागील ५० वर्षां हून अधिक काळापासून नियमितपणे व्यायाम करत आहेत. ६८ वर्षांच्या वयात देखील ते रोज नियमितपणे ४०० पुशअप्स, ७० बेंच प्रेस मारतात. तर ५०-५० राउंड बायसेपचा व्यायाम करतात.

आताचे युवा देखील हे करू शकणार नाहीत. म्हणूनच आज निषाद हे तरुणांचे आयकॉन बनले आहेत. ते तुमच्या आमच्या सारख्या सर्वांसाठीच एक प्रेरणा आहेत. जर आपल्याला निरोगी आणि चांगले जीवन जगायचे असेल तर नियमितपणे व्यायाम हा केलाच पाहिजे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?