आता चंद्रावरही लागणार आहे 4-G नेटवर्क!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

तुमच्या मोबाईलमध्ये 4G आहे की नाही माहित नाही, पण लवकरच चंद्रावर हे हाय स्पीड नेटवर्क 4G सुरु करण्यात येणार आहे. वोडाफोन जर्मनी आणि नोकिया या दोन कंपन्या सोबत मिळून चंद्रावर 4G नेटवर्क लावण्याच्या तयारीत आहेत. ज्याच्या मदतीने रोबोट चंद्रावरील लाईव्ह फोटोज पृथ्वीवर पाठवू शकेल.

 

4g network on Moon-inmarathi

 

हे नेटवर्क बर्लिन येथील पी. टी. साइंटिस्ट (पार्ट टाईम साइंटिस्ट) नावाच्या कंपनीच्या मदतीने तयार केलं जाईल. ही कंपनी एक खाजगी चंद्र रोबोट मिशन योजना आखत आहे.

ह्या मिशन अंतर्गत अपोलो ११ मिशन चे ५० वर्ष पूर्ण झाल्यामुळे ही कंपनी आता चंद्रावर एक लॉन्चर आणि दोन रोबॉट पाठविणार आहे.

अपोलो ११ हे मिशन नासा ची एक महत्वाकांशी योजना होती. ह्या मिशन अंतर्गत १९६९ साली नील आर्मस्ट्रॉन्ग आणि एडविन एल्ड्रिन यांनी पहिल्यांदा चंद्रावर पाउल ठेवले होते.

वोडाफोन जर्मनी ह्यांच्या अधिकृत विधानात सांगितल्या गेले आहे की,

“पुढील वर्षी चंद्रावर 4-G नेटवर्क असेलं. वोडाफोन चंद्रावर पहिले 4-G नेटवर्क स्थापन करण्याची योजना बनवत आहे. ह्यासाठी कंपनीने टेक्नोलॉजी पार्टनरच्या म्हणून नोकीयाला निवडले आहे.”

 

पीटी साइंटिस्टचे संस्थापक आणि सीईओ रॉबर्ट बोम यांनी सांगितले की, “सौर यंत्रणेची स्वस्त तपासणी करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. ह्या तंत्रज्ञानाद्वारे आपण सहजपणे आणि कमी खर्चात हाय डेफिनेशन व्हिडीओ डाटा गोळा करू शकतो.”

‘स्पेस’ च्या मते ह्या मिशन मध्ये कार कंपनी ऑडी ने बनविलेले रोबॉट पाठविण्यात येतील. हे पहिले एक असे मिशन असेल ज्याचा संपूर्ण खर्च खाजगीरित्या करण्यात आला आहे. ह्या इंटरनेट सर्विसच्या वाहतुकीसाठी टॉवर लावले जातात. पण चंद्रावर असं होणार नाही. नोकिया 4-G ट्रान्समिशनसाठी आजवरचे सर्वात हलके ट्रान्स्मिशन उपकरण बनविण्यात येईल.

 

4g network on Moon-inmarathi02

 

नोकिया नुसार ह्या ट्रान्समिशनसाठी १८०० मेगाहर्टझ फ्रिक्वेन्सी बंडचा वापर केला जाईल. जे एचडी व्हिडिओसाठी गरजेचं असते.

स्मिथसोनियन डॉट कॉम नुसार पहिले दोन रोबोट बेस स्टेशन म्हणजेच लॉन्चरला हाय डेफिनेशन व्हिडीओ पाठवणार. त्यानंतर ह्या बेस स्टेशनवरून ते व्हिडिओ पृथ्वीवर पाठविले जातील. हे रोबोट १९७२ साली नासाच्या अपोलो १७ चे देखील निरीक्षण करेल. गेल्या वेळी अपोलो १७ चा वापर अंतराळ वीरांनी चंद्रावर जाण्यासाठी केला होता.

पण ह्यामुळे आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की, चंद्रावर जर नेटवर्क लावायचं आहे तर 4-G चं का? 5-G का नाही?

 

4g network on Moon-inmarathi01

 

रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार ह्या मिशनमध्ये 5-G नेटवर्क ह्याकरिता लावण्यात येत नाहीये कारण, त्यावर अजूनही परीक्षण सुरु आहे. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की चंद्रावर 5-G काम करेल की नाही ह्याची काही शाश्वती नाही म्हणून 4-G नेटवर्क लावण्यात येणार आहे.

फॉरच्यून डॉट कॉम नुसार आतापर्यंत एकमेकांशी संपर्क बनवून ठेवण्यासाठी एनलॉग रेडियो ट्रांसमिशन पद्धतीचा वापर करण्यात यायचा. पण आता 4-G ने संपर्क साधण्यासाठी एनलॉग रेडियो ट्रांसमिशनच्या तुलनेत कमी उर्जा आणि खर्च लागणार आहे.

पीटी साइंटिस्टच्या मते त्यांच्या रोबोटला चार पाय असतील, ज्यामुळे तो चंद्रावरील खडबडीत जमीनिवर चालू शकतील. ह्या रोबॉटचे वजन ३० किलो असेल जे ५ किलो ओझे उचलण्यास सक्षम राहतील. हा रोबोट 4-G टेक्नोलॉजीच्या मदतीने 3-D व्हिडिओ घेऊ शकेल.

म्हणजे कदाचित आता आपल्याला लवकरच चंद्रावरील 3-D व्हिडिओ बघायला मिळतील…

माहिती आणि छायाचित्रांचा स्त्रोत : BBC, GETTY IMAGES

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?