'कॅन्सरपासून दूर राहण्यात हे घरगुती पदार्थ तुमची मदत करू शकतात

कॅन्सरपासून दूर राहण्यात हे घरगुती पदार्थ तुमची मदत करू शकतात

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

कॅन्सर ही आजवरच्या सर्वात भयानक आजारांपैकी एक आहे. त्यापासून वाचण्याचा केवळ एकच सुरक्षित मार्ग आहे आणि ते म्हणजे कॅन्सर होऊच न देणे. ह्या १५ ते २० वर्षांच्या काळात कॅन्सर संबंधी प्रकरणांत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. पण कॅन्सर होण्यासाठी कुठल्याही एका गोष्टीला जबाबदार ठरविता येत नाही.

पण काही अश्या गोष्टी असतात ज्यांमुळे कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तर काही अश्याही असतात ज्या आपला कॅन्सर पासून बचाव करतात.

वाढते वय, अति प्रमाणात धुम्रपान करणे, मद्यपान करणे, जास्त वेळ उन्हात रहाणे, लठ्ठपणा तसेच काही जेनेटिक कारणांमुळे कॅन्सर होऊ शकतो. ह्यातील काही गोष्टी आपल्या हातात असतात तर काही नसतात. पण जर तुम्ही तुमची लाइफस्टाइल हेल्दी ठेवली तर तुम्ही ह्या भयानक आजारापासून वाचू शकता. हेल्दी आणि योग्य आहार तुम्हाला कॅन्सर सारख्या आजारापासून दूर ठेवण्यात मदत करतो.

अक्रोड :

cancer-walnut-inmarathi
lifehacker.com

आक्रोडमध्ये पॉलीफेनोल आणि फायटोकेमिकल्स असतात, ह्यात अँटीऑक्सिडेंट गुण असतात. तसेच ह्यात कॅन्सर रोधक तत्व देखील आढळतात. रोज कमीत कमी ७ आक्रोट खाल्ल्याने कॅन्सरची संभावना कमी होते.

टोमॅटो:

cancer-tomatoes-inmarathi
financialtribune.com

टोमॅटो हा लायकोपेनचा चांगला स्त्रोत आहे. कारण ह्यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात जे कॅन्सरशी लढण्यात मदत करतात. लायकोपेन आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढतात, सोबतच सेल्सला देखील प्रोटेक्ट करतात. तसेच ह्यात विटॅमिन A, C आणि E देखील असतात. रोज एक कप टमाटर खाणे शरीरासाठी फायद्याचे असते.

पालक :

cancer-Spinach-inmarathi
well-beingsecrets.com

पालकही ल्युटेनचा उत्तम स्त्रोत आहे. ह्यात देखील मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात, तसेच हे कॅन्सर हा रोग होण्यापासून आपला बचाव करतात. पालकमध्ये आढळणारे बीटाकॅरोटीन, विटॅमिन A, फोलेट आणि फायबर देखील कॅन्सर पासून आपला बचाव करतात. रोज पालक खाल्ल्याने कॅन्सर होण्याची शक्यता अमी असते.

डाळिंब :

cancer-pomegranate-inmarathi
resperate.com

डाळिंबात देखील मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आढळतात. डाळिंब तुम्ही सकाळच्या नाश्त्यात तुमच्या स्मुदी किंवा फ्रुट सलादमध्ये मिक्स करून ह्याचे सेवन करू शकता. तसेच तुम्ही डाळिंबाचे ज्यूस देखील घेऊ शकता.

द्राक्षे :

cancer-grapes-inmarathi
goodhousekeeping.com

द्राक्ष आणि द्राक्षांच्या बियांत अँटीऑक्सिडेंट खूप प्रमाणात असतात. जे कॅन्सरच्या सेल्स ला वाढण्यापासून रोखतात. रोज अंगूर खाल्ल्याने तुम्ही हेल्दी तर राहालाच सोबतच तुम्ही कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारापासून देखील दूर राहाल.

आलं :

cancer-ginger-inmarathi
business.com.gh

ह्यातील अँटीऑक्सिडेंट्स कॅन्सरच्या सेल्सना वाढण्यापासून रोखतात. २००७ साली झालेल्या एका रीसर्चनुसार आलं हे कॅन्सरला पसरू देत नाही. रोज २-३ कप आलं घातलेला चहा घेतल्याने किंवा आपल्या डायटमध्ये आल्याचा समावेश केल्याने, कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.

लसुन :

cancer-garlic-inmarathi
thejakartapost.com

लसून ह्यात आढळणारे गुण देखील कॅन्सर होण्याच्या शक्यतेला कमी करतात. नियमितपणे लसून खाल्ल्याने कॅन्सर सेल्सचा विकास होत नाही. तुम्ही लसून हे कच्च किंवा भाजीत घालून घेऊ शकता.

ब्रोकोली :

cancer-broccoli-inmarathi
bbcgoodfood.com

ब्रोकोलीमध्ये ग्लूकोसिनॉलेट्स असते जे शरीराचे संरक्षण करणारे ऐन्जाइम्स तयार करतो. सोबतच कॅन्सर सारख्या रोगापासून देखील शरीराचे रक्षण करतो. आठवड्यातून २-३ वेळा २ कप उकडलेली ब्रोकोली खाणे शरीरासाठी फायद्याचे ठरते.

ग्रीन टी :

cancer-green tea-inmarathi
food.ndtv.com

ग्रीन टीमध्ये असणारे वेगवेगळे तत्व कॅन्सर सेल्सना वाढण्यापासून थांबवतात. ग्रीन टी फ्री रॅडीकल्सला नुकसान पासून देखील वाचवतात. त्यामुळे रोज ३-४ कप ग्रीन टी घ्यावी.

अशा अनेक घरगुती गोष्टी नियमित वरून तुम्ही कॅन्सरपासून दूर राहू शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?