'तर या कारणामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्स आता बाथ टबची सुविधा देणार नाहीत!

तर या कारणामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्स आता बाथ टबची सुविधा देणार नाहीत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

गेल्या २४ फेब्रुवारीला चित्रपट सृष्टीच्या पहिल्या फिमेल सुपरस्टार श्रीदेवी ह्या काळाच्या पडद्याआड गेल्या. दुबईतील एका हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या शवविच्छेदन अहवालात सांगण्यात आले.

त्यानंतर आपल्या भारतीय मिडीयाने ह्या बाथटबचे “मौत का बाथटब” म्हणून एवढे प्रमोशन केले की, आता जगभरातील हॉटेल्सनी याचा धसका घेतला आहे.

 

shridevi-inmarathi
akm-img-a-in.tosshub.com

जगभरातील पंचतारांकित हॉटेल्सने ह्या बाथटबची सुविधा आपल्या हॉटेल्समधून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण याचे कारण जरा वेगळे आहे.

असे करण्यामागे सर्वात महत्वाच कारण पाण्याचा अपव्यय टाळणे हे सांगितले जात आहे. जल संरक्षणाविषयी जागरुकता पसरविण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.

कारण बाथटबमध्ये एका व्यक्तीच्या अंघोळीसाठी ३७० लिटर पाणी खर्च होते. तर शॉवर वापरत असताना ७० लिटर पाण्यात एक व्यक्ती अंघोळ करू शकतो.

 

Hotel-bathtub-inmarathi04
tourismattraction.com

त्यासोबतच बाथटब हा बाथरूम मध्ये जास्त जागा घेतो. म्हणूनही पंचतारांकित हॉटेल्स ह्याला आपल्या सुविधेतून बाद करण्याच्या विचारात आहे. जर बाथरूममधून बाथटब काढून टाकले तर बाथरूममध्ये जागा जास्त राहील आणि बाथरूम मोकळं वाटेल.

तसेच बाथ टब काढून टाकल्याने बाथरुमला ग्लोबल ट्रेंडनुसार आणखीन आधुनिक बनवले जाईल. कारण हायटेक बाथरूममध्ये बाथटब बसत नाही.

 

Hotel-bathtub-inmarathi02
thailand.tripcanvas.co

बंगळूरू येथील नोवेटेल, मुंबई येथील ताज आणि विवांता सारख्या बड्या हॉटेल्समध्ये आता शॉवरच वापरण्यात येत आहेत.

जगभरातील लोक आता पाणी वाचविण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यांना हॉटेलमध्ये आधुनिक सुविधा हव्या आहेत. पण त्यासोबतच त्यांना पाण्याचा अपव्यय देखील नको आहे.

म्हणूनच हॉटेल्समध्ये येणाऱ्या लोकांच्या बाथटब नाही तर शॉवर बाथ जास्त पसंतीस पडतो आहे. म्हणून आता हॉटेल्स मधून हा बाथटब काढून टाकण्याचा विचार सुरु आहे.

पण ह्या बाथटबला काही पूर्णपणे बाद करण्यात येणार नाही तर ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना ही सुविधा पुरविली जाईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?