' एक ‘हटके’ लग्नसोहळा ज्यात ‘ती’ वरात घेऊन आली आणि ‘त्याने’ मांडवात वाट पाहिली! – InMarathi

एक ‘हटके’ लग्नसोहळा ज्यात ‘ती’ वरात घेऊन आली आणि ‘त्याने’ मांडवात वाट पाहिली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“आलिया गावात अजब वरात, हे उगवली चांदणी जणू हि उन्हात;
पोराला नायला पोरगी दारात, वऱ्हाड जोमात गाव कोमात…”

ह्या गाण्यावर आजवर आपण अनेकदा थिरकलो आहेत. जर तुम्ही हे गाणे जरा लक्षात देऊन एकले असेल किंवा बघितले असेल तर तुमच्या हे नक्की लक्षात आले असेल की ह्या गाण्यात नवरदेव नाही तर नवरी मुलगी वरात घेऊन नवरोबाला घ्यायला येते.

 

DJ-Song-inmarathi

 

जे आजवर चालत आलेल्या आपल्या परंपरेच्या अगदी विपरीत आहे. पण तो चित्रपट होता. खऱ्या जगात असं काही होत नाही, नेहेमी नवरदेवच वरात घेऊ नवरीला घ्यायला जातो.. हो ना? पण ह्यावेळी काही वेगळं घडलं आहे. आजवरच्या ह्या पुरुष प्रधान परंपरेला तडा देत एका नवरीने एक नवी परंपरा रोवली आहे.

 

patna-bride-inmarathi04

 

ही नवरी मांडवात आपल्या नवरदेवाची वाट बघत नाही बसली तर स्वतः नवरोबाच्या दारात पोहोचली तेही वऱ्हाड घेऊन आणि नवरदेवाने तिचे स्वागत केले.

बिहारच्या पटना येथील दानापूर येथे बँड, बाजा आणि वऱ्हाड घेऊन रथवर स्वार होऊन ही नवरी आपल्या सासरी पोहोचली. हे अनोखं, कधीही न ऐकलेलं लग्न सध्या चर्चेत आहे.

 

patna-bride-inmarathi01

 

ह्या नवरीचे नावं स्नेहा आहे, ती मुंबईच्या एखा खाजगी बँकेत असिस्टेंट बँक मॅनेजर आहे. तर नवरदेव अनिल यादव हे नेवीत लेफ्टनंट कमांडर आणि सध्या ते नेवल डॉकयार्ड कुलाबा येथे पोस्टेड आहेत.

हे दोघेही मुळचे पटना येथील आहेत. ह्यांच्या साखरपुड्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा विवाह त्यांच्या मूळ गावात करण्याचं ठरवलं. आणि ह्या विवाहात स्नेहाने जे केलं ते बदलत्या काळाचं एक उदाहरण ठरलं.

 

patna-bride-inmarathi

 

स्नेहाला नेहेमीच काहीतरी वेगळं करायचं होतं. म्हणून तिने तिच्या लग्नाला अविस्मरणीय बनविण्याचा निश्चय केला. त्यासाठी तिने नेहेमी नवरदेव वरात घेऊन येतो ह्या परंपरेलाच मोडलं. ती नवरी सारखी नटली तर खरी, पण नवरदेवाची मांडवात वाट न बघता स्वतः रथावर स्वार झाली.

===

त्यानंतर बँड-बाज्यासोबत ही अनोखी वरात निघाली दानापुरच्या आर्मी गेस्ट हाउसकडे, जिथे नवरदेव मोठ्या आतुरतेने ह्या वरातीची वाट बघत होता. ह्या वरातीतही वर्हाडी होते, गाजा-वाजा होता, लोकं नाचत होती, पण तरी रस्त्यावरील सर्वांचं लक्ष केवळ त्या रथावर आणि त्यावर स्वार असलेल्या त्या नवरीवर लागलेलं होतं.

 

patna-bride-inmarathi02

 

वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ह्या नवरीला बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांना आश्चर्य वाटलं, तर काहींना कौतुकही वाटलं. ही वरात जशी लग्न मंडपाच्या दारी पोहोचली, तशीच नवरदेवाने नवरीचे स्वागत केले आणि तिचा हात आपल्या हातात घेत तिला स्टेजपर्यंत नेले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना वरमाला घातल्या आणि सर्वांच्या उपस्थितीत हा अनोखा लग्नसोहळा पार पडला.

ह्या लग्नात हेच नाही तर अनेक गोष्टी वेगळ्या होत्या, ह्या लग्नात हुंडा घेतला गेला नाही. तसेच ह्या लग्नात परंपरांचं देखील बंधन नव्हत.

आज जिथे देशातील मुली सर्व क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने काम करत आहेत. पण तरी देखील परंपरेच्या बाबतीत अजूनही आपले विचार तेवढे आधुनिक झालेले नाही. ह्या नवरीने जे केलं आहे, ते खरच कौतुकास्पद आहे. आणि त्यासोबतच तिच्या कुटुंबीयांनी आणि सारसच्यांनी देखील तिला प्रोत्साहन करून देशासमोर एक उदाहरण ठेवले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?