' विश्वचषक गाजवणारा क्रिकेटर धडपडतोय पोट भरण्यासाठी, वाचा संघर्ष-कथा… – InMarathi

विश्वचषक गाजवणारा क्रिकेटर धडपडतोय पोट भरण्यासाठी, वाचा संघर्ष-कथा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

क्रिकेट हा भारतीयांसाठी फक्त खेळ नाही, तर तो धर्म आहे. क्रिकेट म्हणजे भारतीयांचा श्वास आहे. क्रिकेट शिवाय जगण्याचा विचार केला जाऊच शकत नाही. अगदी गल्लीचा कोपरा, इमारतीची गच्ची अशा कुठल्याही ठिकाणी क्रिकेटचा खेळ रंगताना दिसतो.

स्पर्धात्मक क्रिकेट खेळणारा प्रत्येक खेळाडू, भारतासाठी खेळण्याचं स्वप्न पाहत असतो. एकदा तरी भारतीय संघात स्थान मिळावं अशी अपेक्षा करणं, किंवा खरं तर स्वप्न पाहणं हा प्रत्येक क्रिकेट खेळाडूच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतोच!

सचिन, सेहवाग, द्रविड, झहीर, धोनी, विराट, रोहित, बुमराह इत्यादी अनेक क्रिकेटर्स भारतीयांचे आदर्श असतात.

आपल्या देशाची जर्सी घालून देशासाठी विश्वचषक खेळणं हे तर प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न असतं. आणि ज्याचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरतं ते खरंच नशीबवान असतात.

आज तर क्रिकेट हा केवळ एक खेळ राहिला नसून एक करिअर ऑब्जेक्टिव्ह बनला आहे. एकदा का भारतीय क्रिकेट टीममध्ये सामील झालं तर तुमचं करिअरच बनून जातं.

क्रिकेट म्हंटलं की आपल्यासमोर उभे राहतात ते गावस्कर, तेंडुलकर, कपिल देव, विराट कोहली असे दमदार खेळाडू! आणि ते अगदी साहजिकच आहे, या खेळाडूंनी स्वतःच असं एक स्थान निर्माण केलं आहे!

पण असा कुणी खेळाडू आठवतोय का ज्याला हे एवढं स्टारडम कधीच मिळालं नाही, आणि त्याचं कर्तृत्व तेवढं मोठं असून देखील?

 

Cricket-generic-Getty-social InMarathi

 

तर हा असा एक खेळाडू आहे ज्याच्या विषयी आज आपण जाणून घेणार आहोत!

ज्याने केवळ भारताकडून केवळ विश्वचषकच खेळला नाही, तर त्या टूर्नामेंटचा तो हिरो देखील ठरला होता. पण आज तोच खेळाडू हलाखीचे जीवन जगत आहे.

 

bhalaji damor 1 InMarathi

हे ही वाचा – देशाची शान वाढवणाऱ्या या १२ खेळाडूंची दुर्लक्षित अवस्था भारतात खेळ का रुजत नाहीत हे दाखवते

एकीकडे जिथे महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली सारखे मोठे खेळाडू आपल्या खेळाच्या जोरावर आज देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. तिथेच एक असा खेळाडू देखील आहे जो अतिशय गरिबीत आपले जीवन जगत आहे.

आपल्या उपजीविकेसाठी म्हशी चारत फिरतो आहे.

 

bhalaji damor 2 InMarathi

 

आम्ही एका अशा क्रिकेटरबद्दल बोलत आहोत ज्याने भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तसेच त्यांनी अनेक रेकॉर्ड्स देखील आपल्या नावे केले.

ह्या खेळाडूचा शानदार खेळ बघून त्याच्या सोबतच्या खेळाडूंनी त्याला सचिन तेंडूलकर ह्या नावाने हाक मारण्यास सुरवात केली. हा खेळाडू म्हणजे भालाजी डामोर.

 

bhalaji damor 3 InMarathi

हे ही वाचा – ‘ह्या’ खेळाडूंनी देखील एकेकाळी देशासाठी पदक मिळविले होते, पण आज ते जगताहेत हलाखीचे जीवन

भालाजी डामोर हे एक असे खेळाडू होते, ज्यांनी १९९८ सालच्या वर्ल्डकपमध्ये एका ऑलराउंडर खेळाडूच्या रुपात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ह्याच खेळाडूच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारताने सेमी फायनल पर्यंतची मजल गाठली होती.

१९९८ च्या ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भालजी हे एक हिरो म्हणून समोर आले होते. ऑलराउंडर भालजी ह्यांच्या नावे नेत्रहीन क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट म्हणजेच १५० विकेट घेण्याचा रेकॉर्ड आहे.

भालजी डामोर यांनी एक फलंदाज म्हणून ३००० पेक्षा अधिक धावा काढल्या असून दुर्दैवाने सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे, सध्या त्यांचे मासिक वेतन हे केवळ ३००० रुपये इतकेच आहे!

 

bhalaji damor 4 InMarathi

 

गुजरातच्या एका साधारण शेतकरी कुटुंबातील नेत्रहीन भालजी ह्यांना वाटायचं की वर्ल्डकप नंतर त्याचं जीवन थोडं सुधारेल. पण तेवढं त्याचं नशीब कुठे होतं…

१९९८ च्या वर्ल्डकपला आज २२ वर्ष उलटली पण देशाचं नावं क्रिकेट विश्वात गाजवणारे भालाजी आजही त्याच परिस्थितीत आपले जीवन जगत आहेत. आजही त्यांना पोटाची खळगी भागविण्यासाठी म्हशी चारत फिरावे लागत आहे.

अंध असून सुद्धा त्यांनी आपल्या देशाच्या स्पोर्ट्स मध्ये इतके मोठे योगदान देऊन सुद्धा आज त्यांच्यावर ही वेळ येणं अत्यंत दुर्दैवी आहे! आज ज्या माणसाने दिसत नसूनही देशाला विश्वचषकात मोठं नाव मिळवून दिलं, त्याच्या हलाखीच्या परीस्थितीत लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं!

 

bhalaji-damor-inmarathi03

 

तत्कालीन राष्ट्रपती के नारायण यांनी देखील त्यांच्या उत्कृष्ट खेळाची प्रशंसा केली होती. आणि आज त्याच खेळाडूला एवढ्या हलाखीच्या परिस्थितीत जगावे लागत आहे. एवढंच नाही तर त्यांच्या पत्नी अनु ह्या देखील शेतात काम करून त्यांची मदत करतात.

आपल्या ह्या अवस्थेवर भालाजी म्हणतात की,

“गुजरात सरकारने त्यांची प्रशंसा तर केली पण त्यांना एक चांगली नोकरी देऊ शकले नाही.”

आज जिथे आपल्या देशात क्रिकेटला आणि क्रिकेटर्सला देखील अक्षरशः डोक्यावर घेतात. आणि त्याच्या जोरावर ते करोडो कमावतात एवढचं नाही तर त्यांना चांगल्या पदाची नोकरी देखील दिली जाते.

 

bhalji damor1 InMarathi

 

शिवाय याच बरोबर जे अजिबात चांगले खेळत नाही किंवा ज्यांची इमेज अजिबात चांगली नाही अशा खेळाडूंना सुद्धा जरी ते खेळत नसले तरी त्यांना त्यांचं उपजीविकेचं साधन मिळवून दिलं जातं!

पण मग भालाजी डामोर यांच्याच बाबतीत हे सगळं का शक्य झालं नाही किंवा अजूनही होत नाही हा प्रश्न सरकारला किंवा स्पोर्ट्स असोसिएशनच्या सदस्यांना विचारावासा वाटतो???

याच देशात एकेकाळचा उत्कृष्ट खेळाडू आज एक सन्मानाचे जीवन जगण्यासाठी संघर्ष करतो आहे, ही खरंच खूप दुर्दैवी गोष्ट आहे! आपल्या चॅम्पियन्सचा मान आपणच नाही ठेवला तर कोण ठेवणार?

===

हे ही वाचा – स्टार खेळाडूंचं IPL मधलं पहिलं मानधन… चौथ्या खेळाडूची कमाई ऐकून चक्रावून जाल!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?