'"समोसा is Banned!" : जगभरात विविध देशांमध्ये ह्या खाद्यपदार्थांवर बंदी आहे

“समोसा is Banned!” : जगभरात विविध देशांमध्ये ह्या खाद्यपदार्थांवर बंदी आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सरकारने एखाद्या वस्तूवर बंदी लागू केली, की सोशल मिडीयावर चर्चांचे वादळ येतं. बंदी योग्य की अयोग्य, त्याने व्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण होते अशा एक ना अनेक प्रश्नांचा काथ्याकूट होतो.

पण ह्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आपल्या हे माहिती नाहीये, की जगभरात अनेक खाद्यपदार्थ वेगवेगळ्या कारणांसाठी banned आहेत. थोडक्यात, या बंदीच्या विळख्यातून खाद्यपदार्थही सुटलेले नाहीत.

जगभरात अनेक देशांनी अनेक चित्रविचित्र कारणे देत अनेक खाद्यपदार्थांवर बंदी घातली आहे. जाणून घेऊ या – ह्या ‘बंदिस्त’ खाद्यपदार्थांपैकी काही:

सोमालिया : सामोसावर बंदी

सामोसा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग, वडापावाचा लहान भाऊ मानावा असा हा पदार्थ कित्येकांच्या मोस्ट फेव्हरेट डिशेशच्या यादीमध्ये सर्वोच्च स्थानावर असेल, पण सोमालिया मध्ये मात्र सामोसा खाण्यावर चक्क बंदी आहे.

 

banned-food-marathipizza01

या देशातील ‘अल-शबाब’ या संघटनेने सामोसा बंदीचा हा फतवा जाहीर केला आहे.

त्यांच्या मते, सामोसाची तीन टोके म्हणजे ख्रिश्चन धर्मातील पवित्र क्रॉसचे प्रतिक आहे. तसेच इस्लाम धर्मात तीन टोकांचा पदार्थ खाणे वर्ज्य आहे असेही यांचे म्हणणे आहे!

फ्रांस: प्राथमिक शाळांमध्ये केचअपवर बंदी

आपल्या समोर कोणताही तळलेला शाकाहारी पदार्थ ठेवला, की लागलीच आपण मागणी करतो केचअपची, कारण त्याशिवाय या तळलेलल्या पदार्थांचा आस्वाद घेण्यात मजा नाही.

 

tomato ketchup inmarathi
postoast.com

 

अनेक पदार्थांना अधिक रुचकर करणारा असा हा केचअप फ्रांसमधील प्राथमिक शाळांमध्ये वापरण्यास मनाई आहे.

त्यांच्या मते, लहान मुलांना ते ज्या देशात राहतात त्या फ्रेंच खाद्यपदार्थांच्या मूळ चवीची ओळख असायला हवी. लहान मुलांना आपल्या खाद्यपदार्थांची ओढ असायला हवी, मात्र केचअपचा वापर केल्याने मूळ चव नष्ट होते, म्हणून ही बंदी!

फ्रांसमधे देखील संस्कृती रक्षक आहेत वाटतं! 😀

अमेरिकेमध्ये किंडर एग्ज विकण्यास बंदी!

हे प्रोडक्ट दिसलं, की घरातलंल्या लहानग्या पोराने त्याचा हट्ट धरलाच समजा…चॉकलेट असणाऱ्या या पदार्थाच्या लाजवाब स्वादामुळे आजही या प्रोडक्टची क्रेझ तशीच कायम आहे.

 

banned-food-marathipizza03

अमेरिकेत हेच प्रोडक्ट, “किंडर एग्ज” या नावाने ओळखले जाते.

या किंडर एग्जमध्ये एक लहान प्लास्टीकचे खेळणे असते. समज नसणारी लहान मुले, या खेळण्याला देखील खायचा पदार्थ समजून गिळतील – या चिंतेने अमेरीमध्ये किंडर एग्ज विकण्यास बंदी घालण्यात आली होती.

आता मात्र अनेक वर्षांनी पुन्हा हा पदार्थ तइथे विकला जाऊ लागला आहे.

सिंगापूर: डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन च्युईंगम चघळण्यास मनाई

 

banned-food-marathipizza04

 

डॉक्टरांनी च्युईंगम चघळण्याचा सल्ला दिला आहे, त्याच व्यक्ती डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन दाखवून च्युईंगम खरेदी करू शकतात.

च्युईंगम चघळल्यास, तब्बल ५००-१००० डॉलर्स (३२,०००-६५,००० रुपये)  इतका दंड आकाराला जातो. बहुतेक या आणि अशा अनेक नियमांमुळेच सिंगापूर इतके स्वच्छ आहे…!

 

जगातील बहुतांश देशांमध्ये ‘भांग’ वर बंदी !

 

banned-food-marathipizza05

 

अनेक देशांमध्ये भांग या पदार्थाकडे एक अंमली पदार्थ, म्हणून पाहिले जाते. ज्यामुळे भारतात “भगवान शंकराचं प्रिय पेय” म्हणून प्रसिद्ध असलेली भंग, अनेक देशांत banned आहे.

कॅलीफोर्निया : कच्चे बदाम banned !

 

banned-food-marathipizza06

 

कॅलिफोर्नियामध्ये हे सिद्ध करण्यात आले आहे, की कच्च्या बदामांचे निर्जंतुकीकरण न केल्याने त्यातील सूक्ष्मजीवांमुळे मनुष्य आजारी पडू शकतो.

कॅलिफोर्नियामध्ये कच्चे बदाम खाल्ल्याने कित्येक लोकांना ताप, जुलाब आणि पोटदुखीसारखे आजार सुरु झाले. याच कारणामुळे कॅलिफोर्निया मध्ये कच्चे बदाम विकण्यावर बंदी आहे.

याला काही अपवाद आहेत.

 

माउंटेन ड्यू वर जगभरातील अनेक देशांमध्ये बंदी आहे

 

banned-food-marathipizza07

माउंटेन ड्यू ड्रिंकचे अतिसेवन केल्याने स्मरणशक्तीला धोका पोचू शकतो, तसेच त्याचा मेंदू आणि आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो असे एका निरीक्षणातून सिद्ध करण्यात आले होते.

याच कारणामुळे माउंटेन ड्यू वर जगभरातील अनेक देशांनी बंदी घातली आहे.

 

अमेरिका आणि कॅनडामध्ये कच्च्या दुधावर (पास्चराइज्ड न केलेल्या) आणि डेअरी प्रोडक्टवर बंदी आहे

 

banned-food-marathipizza08

 

पास्चराइज्ड न केलेले अथवा ज्याला आपण कच्चे दुध म्हणतो, अशा दुधाचे सेवन करणे म्हणजे जंतूंना आपल्या शरीरात प्रवेश करून देणे आणि रोगांना आमंत्रण देणे – असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

त्यांनी केलेल्या निरीक्षणाच्या आधारावर अमेरिका आणि कॅनडामध्ये पास्चराइज्ड न केलेले दुध आणि डेअरी प्रोडक्ट विकण्यास मनाई आहे, परंतु याउलट युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडातील अनेक देशांमध्ये मात्र कच्चे दुध आरोग्यास उत्तम असल्याचे मानले जाते.

थोडक्यात – लोक उगाच आपल्या देशाला नवं ठेवतात! 😉 हे जगच आहे बंदीशाळा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?