' ह्या बेटावर पुरुषांना फिरायला जाण्यास सक्त मनाई आहे!

ह्या बेटावर पुरुषांना फिरायला जाण्यास सक्त मनाई आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजवर आपण मुलींची पार्टी, लेडीज नाईट, किटी पार्टी ह्याबाबत एकले असेल. पण आज आपण लेडीज बीच बद्दल जाणून घेणार आहोत. एक असं आयलंड तयार होणार आहे जिथे केवळ मुलीच जाऊ शकतात.

म्हणजे जगातील असे एक ठिकाण जिथे पुरूषांचं नाही तर महिलांचं वर्चस्व आहे. येथे पुरुषांच्या जाण्यावर चक्क बॅन आहे.

ऐकून खरं वाटणार नाही, पण या सुंदर, नयनरम्य आयलॅंडने तुम्हाला कितीही मोहात पाडलं तरी पुरुषांनो, तुम्हाला तिथे एन्ट्री नाही.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, असं काय झालं की पुरुषांनी तिथे बंदी घालण्यात आली? इतक्या सुंदर आयलॅंडचा अनुभव पुरुषांना का बरं घेता येत नाही?

चला तर, तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या लेखात शोधुयात.

Super-She InMarathi

 

हे आयलंड फिनलंडच्या बाल्टिक समुद्राजवळ आहे. ह्या आयलंडच नाव Super-She आयलंड आहे.

 

Super-She 1 InMarathi

 

हे आयलंड अमेरिकेच्या एक यशस्वी बिज़नेसवूमन क्रिस्टीना रॉथ ह्यांची शोधाचे फलित आहे. क्रिस्टीना यांना अनेक दिवसांपासून एका अश्या ठिकाणाचा शोध होता, जिथे केवळ आणि केवळ महिला स्वतंत्रपणे मजा करू शकतील.

आपले सर्व टेन्शन विसरून आपल्या जीवनातील काही क्षण स्वतःसाठी जगतील.

अनेक सार्वजनिक ठिकाणी पुरुषांचा वावर असल्याने महिला मनसोक्त वावरू शकत नाहीत. आपण कसे दिसतो, पुरुषांच्या नजरा आपल्याकडेच रोखल्या आहेत अशा अनेक कारणांमुळे महिलांना संकोच वाटतो.

 

kristina-roth InMarathi

 

ही बाब क्रिस्टीनाच्या मनात तेव्हा आली जेव्हा त्या कॅलीफोर्निया च्या कालाबसास येथील आश्रमात सुट्ट्या घालवत होत्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, तेथील महिलांचे लक्ष हे स्वतःपेक्षा जास्त तिथल्या पुरुषांवर होते.

 

Super-She 2 InMarathi

 

क्रिस्टीना ह्यांनी सांगितले की, त्यांच रिसोर्ट उघडण्यामागील मूळ हेतू पुरुषांविरोधी नाही. पण सध्या हे रिसोर्ट केवळ महिलांसाठीच आहे.

 

kristina-roth 1 InMarathi

 

क्रिस्टीनाने ८.४ एकर क्षेत्रफळ असलेले हे आयलंड सप्टेंबर २०१७ साली विकत घेतले होते. ह्या रिसोर्ट मध्ये ४ कॅबीन असून जिथे स्पा, सौना बाथ ह्यासोबतच इतरही काही सुविधा आहेत.

अर्थात या ठिकाणी जाण्यापुर्वी तुम्हाला बुकिंग करावे लागते. तुमची राहण्या-खाण्यासह इतर सर्व व्यवस्था या बुकिंगमध्ये केली जाते.

स्त्रीयांना हव्या त्या सुविध्या मिळाव्यात यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले जातात. या आयलॅंडवर अनेक मैत्रिणींचे ग्रुप्स धमाल करताना दिसून येतात. हवे ते कपडे परिधान करून मनसोक्त फोटो काढण्याची हौसही महिला या ठिकाणी पुरवतात.

Super-She 3 InMarathi

 

अश्याप्रकारे केवळ महिलांकरिता असलेले हे एक वेगळे आयलंड असणार आहे. जिथे महिला स्वतःच्या मर्जीने स्वतःसाठी काही वेळ घालवू शकतील.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?