' हे आहे डोळ्यांची उघडझाप होण्यामागील शास्त्रीय कारण

हे आहे डोळ्यांची उघडझाप होण्यामागील शास्त्रीय कारण

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपण एका मिनिटांत किती वेळा डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करतो? कदाचित ह्याकडे आपण कधीही लक्ष दिले नसेल. तसं तर प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या गतीने पापण्यांची उघडझाप करत असतो. खरे तर डोळ्यांची उघडझाप होणे ही एक प्राकृतिक क्रिया आहे.

 

Image result for why we blink

एका फॅक्ट नुसार जेव्हाही आपण कुठली रंजक किंवा वेगळी गोष्ट बघत असतो तेव्हा आपल्या पापण्या खूप वेळा उघडझाप करतात.

जेव्हा आपले डोळे थकून जातात तेव्हा आपल्या डोळ्यांची उघडझाप करण्याची गती मंदावते. साधारण एक व्यक्ती एका मिनटांत जवळपास १५ वेळा डोळ्यांची उघडझाप करते. पण वेगवेगळ्या मानसिक स्थितीत, परिस्थितीनुसार आपल्या पापण्यांच्या उघडझाप होण्याची गती बदलत असते.

 

eyelid-twitching-inmarathi00
curejoy.com

डोळ्यांतील रेटीना आणि लेन्सवर नेहेमी ओलावा राहावा म्हणून आपले डोळे उघडझाप करतात.

२०१२ साली अमेरिकेचे प्रोसीडिंग्‍स ऑफ दी नॅशनल अकादमी ऑफ सायन्समध्ये सादर करण्यात आलेल्या रिसर्च पेपरनुसार जपानच्या ओसाका शहरात वैज्ञानिकांच्या एका टीमने माणसांच्या डोळ्यांच्या उघडझाप करण्यावर एक मोठा रिसर्च केला होता. ज्यानुसार जेव्हा आपण आपल्या डोळ्यांची उघडझाप करतो तेव्हा आपण आपल्या डोक्याला जरा विश्रांती देत असतो असे त्यांनी म्हटले आहे.

 

blink-eyes-inmarathi01
ayurmantra.com

भलेही डोळे मिटणे ही क्रिया १ सेकंदापेक्षा खूप कमी वेळाकरिता होत असली तरी डोळ्यांची उघडझाप झाल्याने आपल्या डोक्याला विश्रांती मिळते. सतत काम करत असलेला आपला मेंदू थकला की डोळे मिटल्याने त्याला विश्रांती मिळते आणि तो पुन्हा तेवढ्याच एकाग्रतेने काम करण्यास सुरवात करतो. डोळ्यांची उघडझाप केल्याने आपलं डोकं वारंवार रिफ्रेश होत राहतं. त्यामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी देखील चांगली होते.

 

blink-eyes-inmarathi04
canva.com

डोळ्यांची उघडझाप का होत असेल ह्यावर रिसर्च करण्यसाठी वैज्ञानिकांनी २० निरोगी लोकांना ब्रेन स्कॅनर लावून बसवले. त्यांच्या समोर टीव्हीवर प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कॉमेडी मालिका मिस्टर बिन चालवली. ह्या रिसर्च दरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने दिसून आली की त्या मालिकेदरम्यान जेव्हा जेव्हा ब्रेक आला तेव्हा तेव्हा हा सर्व लोकांनी आपले डोळे एकाच वेळी मिचकविले. टीव्ही बघणाऱ्या लोकांनी ज्यावेळी आपले डोळे मिचकावले त्या दरम्यान त्यांच्या डोक्याच्या त्या भागाची सक्रियता जरा मंदावली होती.

 

blink-eyes-inmarathi02
ayurhealth.info

वैज्ञानिकांच्या ह्या रिसर्चनुसार, डोळे मिचकावणे ह्याला आपलं डोक ब्रेक घेण्यासाठी एखाद्या डीफॉल्ट मोड प्रमाणे वापरतो. ह्याचा फायदा असा होतो की, जितक्यांदा आपण डोळे मिचकावतो, आपली एकाग्रता तेवढी जास्त वाढत जाते.

जर जास्त वेळेपर्यंत आपण डोळे मिचकावले नाही तर, आपण वाचत असलेले पुस्तक किंवा बघत असलेले दृश्य बघून आपण कंटाळतो. आणि त्यामुळे त्या गोष्टीला व्यवस्थितपणे समजून घेण्याची आपल्यातील क्षमता कमी होऊन जाते.

म्हणजेच जो व्यक्ती जेवढ्या जास्त वेळा आपल्या पापण्या मिचकावेल. त्याचं डोकं तेवढंच एकाग्र आणि सक्रीय असल्याचं मानलं जाऊ शकतं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?