'"आधुनिक" विक्रम वेताळ : गुन्हेगार-पोलिसामधील थरारक वैचारिक द्वंद्व

“आधुनिक” विक्रम वेताळ : गुन्हेगार-पोलिसामधील थरारक वैचारिक द्वंद्व

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : अनिरुद्ध प्रभू

===

माणसाला चांगलं-वाईट यांच्यात सगळ्या गोष्टींचं वर्गीकरण करण्यात फार रस यापेक्षा घाई असते.

समोरच्या कृतीला चागले किंवा वाईट ठरवण्याची ज्याची त्याची पद्धत किवा संज्ञा वेगळी असते, पण तरीही हे चांगले ते वाईट अश्या तत्सम गोष्टी करण्यापासून जवळपास कोणी ही स्वत: ला थंबवत नाही.

पण बऱ्याच वेळा आपल्या समोर जे दिसतं, घडतं किवा येतं त्याच दृश्य वस्तूवर, गोष्टींवर अवलंबून राहून आपण ती गोष्ट वा घटना चांगली का वाईट हे ठरवून मोकळे होतो.

बऱ्याचवेळा आपल्या समजुतीपेक्षा समोरची घटना बरोबर विरुद्ध किवा अर्धसत्य अशीही असू शकते याचा अंदाजही आपल्या गावी नसतो.

सामान्यतः काळ्या आणि पांढऱ्या मधल्या या वर्गीकरणात दरवेळी आपण करतो ते वर्गीकरण बरोबर असेलच याचे ग्वाही आपणाला देता येते का?

समोर घडणाऱ्या किंवा ज्यावर आपली दृढ श्रद्धा किंवा विश्वास आहे अशा समजुतीने आपण सगळ्यांचं वर्गीकरण करता येतं का?

अश्याच प्रश्नांना अजून गडद करत जाणारा तमिळ चित्रपटसृष्टीतला एक उत्तम चित्रपट म्हणजे ‘विक्रम वेधा’ …!

 

vikram vedha inmarathi
www.iflicks.in

 

‘विक्रम वेधा’ ही आजच्या काळातील विक्रम वेताळाची गोष्ट आहे. ज्या प्रमाणे पूर्वी त्या वेताळाचा मागे विक्रम लागला होता त्याचप्रमाणे आज या वेधाच्या (वेताळाच्या) मागे विक्रम लागलाय.

तो विक्रम राजा होता आणि हा पोलीस इन्स्पेक्टर हाच काय तो फरक. आजच्याही विक्रमला काहीही करून वेधाला पकडायचयं. हा वेधा त्याच्या शहरातला सगळ्यात मोठा gangstar आहे.

विक्रमने आधीच त्याच्या बराचशा गुंडांना ठार केलयं आणि तो आता वेधाच्या मागे आहे.

एका परिपूर्ण योजनेसह तो या आजच्या वेताळाला पकडायाला निघतो आणि कथेमध्ये ट्वीस्ट येतो.

स्वतः वेधा विक्रम समोर संमर्पण करतो. मग पुन्हा पूर्वीसारखा प्रश्न- उत्तराचा खेळ चालू होतो. हळूहळू या खेळाच्या गतीस विक्रम समोर काही प्रश्न पडतात.

त्या प्रश्नांची उत्तरे त्यालाच नव्हेतर आपल्यालाही महत्वाची वाटू लागतात. चांगले / वाईट किवा काळ्या-पांढऱ्यातला फरक आपल्या

आकलनशक्ती समोर संभ्रम निर्माण करू लागतो आणि विक्रम सह आपल्याला पडलेले अनेक प्रश्न अजून गडद करत कथानक पुढे सरकते.

आर.माधवन आणि विजय सेतुपती यांनी अनुक्रमे विक्रम आणि वेधा च्या भूमिकेत जान टाकली आहे. अभिनय म्हणजे काय असतो यासाठी हा चित्रपट नक्कीच महत्वाचा आहे.

 

vikram vedha 2 inmarathi
dnaindia.com

 

श्रद्धा श्रीनाथ प्रतिशयत gangstar ची वकिल आणि त्याला गजाआड करू पाहणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टरची बायको या द्वंदातली ‘प्रिया’ छन साकारते.

कथेच्या पार्श्वाभूमिवरच विक्रम आणि प्रिया मधलं प्रेम खूप छान पद्धतीनं रंगवलय.

प्रेम, हरीश पेटाडी, कथिर सगळेजण आपापली कामे चोख बजावतात. या सगळ्या मोठ्या स्टार्स च्या मध्ये छोटीशी भूमिका असेना पण वरलक्ष्मि शरथकुमार भाव खाते.

हा चित्रपट मनात ठसा उमटवतो कारण आहे ते पुष्कर-गायत्री या पती- पत्नीच्या कथेचं आणि दिग्दर्शनाचं.

मुळात आपण दिग्दर्शित करत असलेल्या कथेचा लेखक स्वतः दिग्दर्शक असेल तर त्याचा फायदा मिळतो हे सत्य आहे आणि तो इथे चित्रपट पाहताना जाणवतो.

पी. एम. विनोदच्या फ्रेम्स एकीकडे प्रचंड बोलक्या तर दुसरीकडे संभ्रम निर्माण करणाऱ्या अश्या दोहोंत काम आदि कथेला असचं करतात. मूळ कथेत  सॅम सी. एस. च संगीत अजून जान टाकते.

पण या सगळ्या पेक्षा एक गोष्ट या चित्रपटाला अजून वेगळा बनवते ती म्हणजे या चित्रपटाची संहिता, त्यामागचा विचार.

 

vikram vedha 4 inmarathi
onlookersmedia.in

 

विक्रम वेधाचं स्वत:चं असं तत्वज्ञान आहे. काळ्या आणि पांढ-या मधली रेषा जीला आपण ग्रे म्हणतो., त्याची स्वत:ची अशी कोणतीही बाजू नसते, ना चांगली ना वाईट.

याच ग्रे शेड ला हा चित्रपट जास्त प्रकाशात आणतो.

आपण फक्त दिसण्या-या किंवा आपल्या आकलन शक्तीच्यानुसार ग्राह्य समजल्या जाणा-या गोष्टींच्या सहाय्याने प्रत्येक गोष्ट चांगली का वाईट हे ठरवू शकत नाहित हे जरा जास्त गडद पणे स्पष्ट होतं.

या वेगळ्या विषयामुळे नि त्या दिलेल्या विशेष हाताळणी मुळे हा चित्रपट तमिळ चित्रपटसृष्टीतल्या महत्वाच्या चित्रपटांच्या यादीत आपलं स्थान निश्चित करतो हे मात्र खरं.

 

vikram vedha scene inmarathi
play.google.com

 

सध्या हॉटस्टार ह्या प्लॅटफॉर्म वर हा सिनेमा उपलब्ध आहे, त्यामुळे ऑनलाइन घरबसल्या ह्या अप्रतिम सिनेमाचा आनंद तुम्ही घेऊ शकता!

तुम्ही जर हा सिनेमा पाहिला असेल आणि त्यावर तुमची काही स्वतःची मतं किंवा थेयरी असतील तर आम्हाला अवश्य कमेंट सेक्शन मध्ये कळवा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?