तुम्हालाही बोटं मोडायला मजा वाटते ना, पण ते चांगलं की वाईट? मग हे नक्की वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपली मराठी भाषा फार मजेशीर आहे, सारख्याच शब्दांपासून वेगळे अर्थ निर्माण करण्यासाठी बहुधा ही अतिशय प्रभावशाली भाषा आहे.
एखाद्याच्या नावाने “बोटे मोडणे” या शब्दांचा अर्थ पूर्णपणे वेगळा होतो आणि तो तुम्हा जाणकारांना वेगळा सांगण्याची गरज नाही.

पण आज तुम्हाला शब्दशः “बोटे मोडणे” या सवयीच्या बऱ्या-वाईट परिणामांबद्दल या लेखातून माहिती सांगत आहोत.

दिवसभर आपण काम करत असतो, तेव्हा आपला जास्तीत वेळ हा कॉम्पुटरवर टायपिंग करण्यात जातो. तसेच  दिवसभर आपल्या मोबाईलवर चॅटिंग करत असतो.

ह्या सर्वातून जेव्हा केव्हा ब्रेक मिळतो आपण लगेच आपल्या हातांना आराम मिळावा म्हणून बोटं मोडतो. हो ना?

आपल्यापैकी जवळपास सर्वच हे करतात. जरा बोटं अकडल्यासारखी वाटली की लगेच आपण बोट मोडतो. आणि कधी कधी तर असच सहज बसल्या बसल्याही आपण बोट मोडत असतो. आपल्याला असं वाटत की ह्याने आपल्या हातांची आणि पायांची बोटे मोकळी होतात.

 

cracking fingers-inmarathi04
express.co.uk

पण हा निव्वळ एक गैरसमज आहे. खरेतर ह्याने आपल्या हात पायांची बोटे मोकळी होत नाहीत तर आपल्या हाडांवर वाईट परिणाम होऊ शकतो.

तुम्हाला आठवतं का लहानपणी जेव्हा आपण मजा म्हणून बोट मोडायचो तेव्हा आपली आजी आपल्याला रागवायची की, असे बोट मोडत नसतात. मग कुठेतरी असं देखील ऐकल होतं की बोट मोडणे हा एक अपशकून आहे. म्हणून बोट मोडू नये.

पण या सगळ्या सांगोपांग गोष्टी असल्या तरी यामागे एक वैज्ञानिक कारण आहे.

 

cracking fingers-inmarathi01
pressfrom.com

आपल्याला भलेही ही अंधश्रद्धा वाटत असली तरी बोट का मोडू नये ह्यामागे एक शास्त्रीय कारण देखील आहे.

बोटे मोडणं हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकत. डॉक्टरांच्या मते हाताची किंवा पायाची बोटं मोडल्याने आपल्या हाडांवर त्याचा वाईट परिणाम होतो. ह्याने त्यांच्यातील कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे ही सवय जेवढ्या लवकर सोडता येईल तेवढे चांगले.

 

cracking fingers-inmarathi02
thelallantop.com

आपली बोटं, गुडघा आणि कोपर ह्यांच्या जॉईन्टमध्ये एक विशिष्ट प्रकारचं लिक्विड असतं. ज्याला synovial fluid म्हणतात. हे लिक्विड आपल्या हाडांच्या जॉईन्टमध्ये ग्रीस प्रमाणे काम करते.

त्यासोबतच ह्यामुळे आपली हाडे एकमेकांशी घर्षण करत नाहीत. ह्या लिक्विडमध्ये असणारा वायू जसे की कार्बनडाय ऑक्साईड तिथे स्वतःसाठी जागा बनवतो. ज्यामुळे तिथे बबल्स तयार होतात. जेव्हा आपण बोट मोडतो तेव्हा हे बबल्स फुटतात. ह्यामुळेच बोट मोडल्यावर तो कुट-कुट आवाज येतो.

का दुसऱ्यांदा बोट मोडल्यावर आवाज येत नाही. असं का होत असेल?

 

cracking fingers-inmarathi03
squenter.cf

तर होत असं की, एकदा बोट मोडले की, ते बबल्स फुटून जातात आणि मग त्या लिक्विडमध्ये परत ते बबल्स तयार व्हायला १५-२० मिनिटे लागतात.

त्यामुळे आपण एकदा का बोटे मोडली की त्यानंतर बोटे मोडल्याचा आवाज येत नाही. मग तुम्ही कितीही वेळा ट्राय केलं तरी जोपर्यंत ते बबल्स पुन्हा तयार होत नाही तोपर्यंत आवाज येत नाही.

एका रिपोर्टनुसार आपले हाड हे एकमेकांसोबत लिगामेंटच्या सहाय्याने जुळलेली असतात. नेहमी असे बोटे मोडत राहिल्याने आपल्या हाडांतील लिक्विड कमी होऊ लागते, जर ते पूर्णपणे संपले तर त्यामुळे संधिवात होऊ शकतो. तसेच जर सांध्यांना नेहेमी ओढत राहिलं तर आपली हाडे सैल होऊ शकतात, त्यांची पकड ढिली होऊ शकते.

 

 

ह्यासंबंधी कॅलिफोर्निया विश्वविद्यालय तसेच इतर काही ठिकाणी देखील येथे संशोधन सुरु आहे. पण बोट मोडल्याने कुठला आजार होऊ शकतो हे अजूनही सिद्ध झालेले नाही. तरी ह्याच्या परिणाम तुमच्या हातांच्या आणि पायांच्या हाडांवर होऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तेव्हा ह्यानंतर बोट मोडताना जरा विचार करा…आणि मुख्य म्हणजे तुमचे असे मित्र मैत्रीण ज्यांना ही बोटे मोडण्याची सवय आहे त्यांना हा लेख नक्की शेअर करा. 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?