' स्नायपर्स तब्बल तीन किलोमीटरवरून अचूक निशाणा कसा साधू शकतात? जाणून घ्या.. – InMarathi

स्नायपर्स तब्बल तीन किलोमीटरवरून अचूक निशाणा कसा साधू शकतात? जाणून घ्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रत्येक सैन्यामध्ये स्नायपरचे काम खूप महत्त्वाचे असते. स्नायपर शत्रूला कळू न देता त्यांच्यातील मुख्य अधिकाऱ्याला मारण्याचे काम करतो. प्रत्येक ठिकाणी त्याला स्वतःचा वेगवेगळा रोल असतो.

स्नायपरची नजर आणि कौशल्य कमालीचे असते. त्यामुळे स्नायपर हे प्रत्येक सैन्यामध्ये निवडकच असतात. त्यांचा निशाणा एकदम अचूक असतो, कारण त्यांना कधीही सहसा फायर करायची दुसरी संधी मिळत नाही. त्यामुळे ते खूप खास असतात.

 

Sniper.Inmarathi

 

कॅनडाच्या स्पेशल फोर्सच्या स्नायपरने २०१७ या वर्षी सर्वात जास्त अंतरावरून निशाणा धरून शत्रूला मारण्याचा नवीन वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. या सैनिकाने इराकच्या आयएसच्या एका सैनिकावर ३५४० मीटर एवढ्या अंतरावरून गोळी चालवली होती.

या आधी हा रेकॉर्ड ब्रिटिश स्नायपर क्रेग हॅरिसन याच्या नावावर होता. हॅरिसनने २००९ मध्ये अफगाणिस्तानात २४७५ मीटर अंतरावरून तालिबानच्या एका सैनिकाला मारले होते.

कॅनडाच्या आर्म्ड फोर्सकडे खूप लांबून शत्रूला मारण्याचे सर्वोत्तम पाच पैकी तीन रेकॉर्ड आहेत. पण यामध्ये प्रश्न हा निर्मण होतो की, कुणी तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून शत्रूवर अजून निशाणा कसा काय साधू शकतो? आपण याबद्दलच काही माहिती जाणून घेणार आहोत.

 

Sniper.Inmarathi1

योग्य हत्यार असणे गरजेचे असते 

कॅनडाच्या ज्या सैनिकाने आयएसच्या सैनिकावर गोळी चालवली होती, त्याने उंच ठिकाणावरून मॅकमिलन टॅक – ५० स्नायपर रायफल वापरली होती.

ही रायफल तयार करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, या रायफलची सर्वात प्रभावी फायरिंग रेंज १८०० मीटर आहे. म्हणेजच कॅनडाच्या त्या स्नायपरने रायफलच्या क्षमतेच्या दुपटीच्या अंतरावरून निशाणा साधला होता.

या कॅनडाच्या स्नायपरने मारलेली गोळी ७९२ मैल प्रति तास या वेगाने जात होती, जो वेग बोईंग ७४७ सारख्या कमर्शियल जेटपेक्षा जास्त आहे. या गोळीला आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचेपर्यंत फक्त १० सेकंदाचा वेळ लागला. इतक्या जलद गतीने त्या गोळीने आपल्या लक्ष्याला भेदले.

यूएस नेव्ही सील्स, फ्रेंच नेव्ही कमांडो यांच्याबरोबरच तुर्की, जॉर्जिया, दक्षिण आफ्रिका, जॉर्डन, इस्राईल आणि फिलिपिन्सचे काही विशेष दल देखील याच एम के १५ रायफलचा वापर करतात.

ब्रिटिश, जर्मन आणि आयरिश सैन्य सहसा एक्युरेसी इंटरनॅशनल आर्कटिक वॉयरफ़ेयर सीरिजच्या स्नायपर रायफल वापरतात. यूएस मरिन कॉप्स एम ४० चा वापर करतात.

 

Sniper.Inmarathi2

 

स्नायपरच्या यशामध्ये त्याचा सोबती किंवा स्पॉटरचे महत्त्वाचे योगदान असते. स्पॉटरचे काम स्नायपरला हे सांगायचे असते की, टार्गेट कुठे आहे आणि परिस्थिती कशी आहे.

स्पॉटर दुर्बिणीच्या साहाय्याने लक्ष्य शोधून काढतो आणि स्नायपर आपल्या रायफलवर लागलेल्या स्कोपवरून शत्रूवर निशाणा साधतो.

कितीतरी वेळा स्नायपर आणि स्पॉटर त्या भागाच्या जवळपास असतात, जिथे लढाई चालू असते. ते आपले हत्यार स्वतःच घेऊन जातात आणि शत्रूची वाट पाहत कितीतरी तास लपून राहिलेले असतात.

जर एखादा शॉट मिस झाला, तर लगेचच स्पॉटर परिस्थितीचा आढावा घेतो आणि स्नायपरला रीलोड करून निशाणा लावायला सांगतो. कधीतरी परिस्थितीमुळे मिशन रोखण्यासही सांगतो.

 

Sniper.Inmarathi3

 

स्पॉटर वेगाने जाणाऱ्या गोळीच्या मागे हवेमध्ये वाफेच्या बनणाऱ्या निशाणांवर नजर ठेवतो आणि खूप जड असलेले किट उचलण्यासाठी देखील स्नायपरची मदत करतो.

अनुभव आणि विज्ञान येते येथे कामाला 

योग्य निशाणा साधण्यामध्ये हवेची गती आणि वातावरणाची इतर परिस्थिती देखील महत्त्वाची असते.

कुठलीही टीम सर्वात अनुभवी स्नायपरलाच स्पॉटर बनवते, कारण तो हवेची गती, अंतर, परिसराची संरचना, गर्मी आणि निशाण्याला प्रभावित करणाऱ्या इतर गोष्टींचे आकलन करू शकेल.

 

Sniper.Inmarathi4

 

यानंतर स्नायपरचे काम सुरु होते. तो पोजिशन घेतो, आपला श्वास रोखून लक्ष्य आणि त्याच्यामधील अंतराचा आढावा घेतो. शस्त्र योग्यप्रकारे हाताळतो, त्यानंतर स्पॉटरच्या सल्ल्याकडे लक्ष देत फायर करतो.

कॅनडाच्या स्पेशल फोर्सच्या ज्या स्नायपरने सर्वात जास्त अंतरावरून आपले लक्ष्य भेदले, त्याला पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या गोलाकाराला देखील लक्षात ठेवायचे होते, कारण तो खूप दूर होता.

त्याला ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची होती की, अंतराबरोरच गोळीची उंची देखील घटेल, कारण तो एका इमारतीच्या उंच भागावरून गोळी चालवत होता.

इतक्या बारीक सारीक गोष्टींचा विचार स्नायपरला लक्ष्य भेदताना करायचा असतो. हा आपल्यासाठी मनोरंजनाचा विषय असेल, पण शत्रूशी दोन हात करताना हे स्नायापर सुद्धा तितकेच अवघड आणि जोखमीचे काम करत असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?