भारतीय महिला पायलटचं उत्कृष्ट प्रसंगावधान, २६१ प्रवाशांचे प्राण वाचले
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
कोणत्याही लांब पल्ल्याच्या ठिकाणावर आरामात आणि जलदगतीने पोहचायचे दळणवळणाचे साधन म्हणजे विमान. विमान हे आपल्याला कमी वेळेमध्ये एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहचवते. पण विमानाचा प्रवास जेवढा सुखकर असतो, तेवढाच त्याचा अपघात त्याच्यापेक्षा कितीतरी भयानक असतो. विमानाच्या अपघातामध्ये लोकांना आपला जीव गमवावा लागतो. कधी – कधी तर त्यांचा थांगपत्ता देखील लागत नाही. त्यामुळे विमानाच्या पायलटना विमानाचा अपघात होऊ नये, यासाठी नेहमी सतर्क राहणे गरजेचे असते.
आपल्या समाजामध्ये स्त्रियांना काही गोष्टींमध्ये कमी लेखले जाते. स्त्रिया चांगल्याप्रकारे गाडी चालवू शकत नाहीत, असे देखील काही लोकांचे म्हणणे असते. पण हे अत्यंत चुकीचे आहे.
स्त्रियांनी जर ठरवले, तर त्या काहीही करू शकतात, कारण त्या खूप महत्त्वकांक्षी असतात. असेच काहीसे या महिन्याच्या सात तारखेला घडले आहे. एका महिला पायलटने प्रसंगावधान दाखवून विमानाचा होणारा मोठा अपघात टाळला आणि खूप लोकांचे प्राण वाचवले.

एका पायलट स्त्रीने खूप कमालीचे काम करून दाखवले आहे. या महिला पायलटचे नाव अनुपमा कोहली आहे आणि या स्त्रीमुळे एअर इंडिया विमान आणि विस्तारा विमान यांची हवेमध्ये होणारी धडक होऊन होणारा मोठा अपघात टळला होता.
दोन्ही विमानांमध्ये २६१ प्रवासी प्रवास करत होते आणि दोन्ही विमाने एकमेकांच्या १०० फूट जवळ येऊन पोहोचली होती.
जर त्यावेळी अनुपम यांनी कोणत्याही प्रकारची कृती केली नसती, तर ही विमाने एकमेकांना काही सेकंदाच्या आत धडकली होती.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या गोंधळाची जबाबदार असलेल्या हवाई वाहतूक नियंत्रकांना निलंबित केले गेले आहे.
ए – ३२० निओ (फ्लाइट नंबर युके ९९७ ) हे विमान पुण्यावरून दिल्लीला जात असताना एअर इंडियाचे एअरबस ए ३१९ (फ्लाइट नंबर एआय ६३१) हे विमान त्याचवेळी मुंबईहून भोपाळकडे जात होते. या दोन्ही विमानांच्या कॉकपीटमध्ये महिला वैमानिक होत्या.

सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार,
“ही विमाने एकमेकांपासून काही सेकंदांच्या अंतरावरच होती. एक विमान त्याच्या उडण्याच्या पातळीवरून खाली आले होते. हे विमान २९००० फूट उंचीवरून उडाले पाहिजे होते. पण ते आता २७१०० फुटांपर्यंत खाली आले होते आणि याच पाठीवरून एअर इंडियाचे विमान उलट दिशेने येत होते.
–
एटीसी आणि दुसऱ्या विमानाचे कॉकपीट यांच्यामध्ये त्याच्यावेळी काहीतरी गोंधळ उडाला होता. हा गोंधळ नेमका तेव्हा उडाला होता, जेव्हा त्या विमानाला महिला सह – वैमानिक कंट्रोल करत होत्या, कारण त्याचे कॅप्टन टॉयलेटला गेले होते. तसेच, एअर इंडिया विमानाच्या कॅप्टन या अनुपमा कोहली होत्या. त्यावेळी घडलेल्या कोणत्यातरी चुकीच्या संवादामुळे हा गोंधळ उडाला असेल.”

सूत्रांनी पुढे म्हटले की,
“अनुपमा कोहली यांनी जेव्हा पहिले की, विस्ताराचे विमान त्यांच्या दिशेने येत आहे, तेव्हा एटीसीने तुम्ही या पातळीवर का उडत आहात? असा प्रश्न विस्तारामधील महिला वैमानिकाला केला. तेव्हा तिने सांगितले की, आमही या पातळीवर नाही. पण मला या पातळीवर यायला सांगितले. ते तिच्यावर लक्ष ठेवत होते. जेव्हा दुसरे विमान एअर इंडियाच्या विमानाच्या डाव्या बाजूला एकदम जवळ जाऊन पोहचले, तेव्हा एटीसी कंट्रोलने वैमानिकाला हे समजावे यासाठी रेड लाईट पेटवली आणि आताच्या आता विमान वर न्या असे अनुपमा याना सांगण्यात आले. त्याचवेळी अनुपमा यांनी क्षणाचाही विलंब न करता, विमानाला त्या पातळीवरून वर नेले आणि उजवीकडे वळवले.”

डिजिसीएने या घटनेबद्दल ‘विस्तारा’ च्या दोन वैमानिकांवर कारवाई केली आहे. पण विस्तारा ने हे सांगितले आहे की, यामध्ये वैमानिकांनी चूक नाही. ते फक्त त्यांना मिळाल्या सूचनांचे पालन करत होते.
आपल्या २० वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर वरिष्ठ कमांडर अनुपमा कोहली यांनी एक मोठा अपघात होण्यापासून वाचवला होता. पण हे थोडे निराशाजनक आहे की, महाराष्ट्रामध्ये दोन विमान एकमेकांच्या खूप जवळ आलेल्याची घटना गेल्या १५ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा घडली आहे.
असेच काहीसे अमिरात बोईंग (सिंगापूर ते दुबई ) आणि इंडिगो ए – २०२० (हैदराबाद ते रायपूर ) यांच्या दरम्यान झाले होते. असे होणे खूपच भयानक आहे, त्यामुळे भविष्यात असे होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
With Reference. To Ur ” SHARING. OF UR ANY. INFORMATION ”
Why “Your Marathi.com” NOT GIVING DIRECT ACCESS TO SHARE
ANY.INFO ON” FACEBOOK; Twitter ;
WHATSAPP ;GMAIL.& E MAlLS A/Cs
Of. USER.
…….When.I AM HAVING. ALL THIS
RUNNING A/Cs ;THEN LIKE OTHERS;
I MUSTBE ABLE TO SHARE DIRECTLY
ANY INFO;BUT U R NOT ALLOWING.
THEN U ASK USER. TO GIVE
HIS. “EMAIL ID ; PASSWORD;”
Every Time Or Make -Problem When If Our” PASSWORD” is NOT
MATCHING IN Ur SYSTEM.
SO MANY TIMES I FIND LOT OF DIFFUCULTIES. ON UR. SITES
FOR. SHARING IMP – INFO.
PLZ U. MUST GIVE ME UR. REPLY.
Thanks
कृपया लेखातील मजकूर कॉपी-पेस्ट करू नका. लिंक शेअर करा. फेसबुक व्हाट्सअँप वर शेअर करण्यासाठी सोपे ऑप्शन्स दिले आहेत.