' मॅकडॉनल्ड: या चविष्ठ व्यवसायाची खमंग कहाणी तुम्हालाही नव्या व्यवसायाचं बळ देईल – InMarathi

मॅकडॉनल्ड: या चविष्ठ व्यवसायाची खमंग कहाणी तुम्हालाही नव्या व्यवसायाचं बळ देईल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मॅकडोनल्ड हे नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं.

आपल्या आवडत्या मॅकडीचे बर्गर, मिल्कशेक्स, फ्रेंच फ्राईज हे सर्व डोळ्यांसमोर येतं… तरुण पिढीचा मॅकडी हाच आवडता कट्टा आहे.

मॅकडोनल्डमध्ये आपल्याला वेगवगेळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. तसेच, मित्रांबरोबर येथे घालवलेला वेळ काही वेगळाच असतो.

कुणी परीक्षेमध्ये पास झालेला असो किंवा कुणाचा वाढदिवस असो किंवा इतर कोणते कारण असो. या सगळ्याचे सेलिब्रेशन करण्यासाठी हीच जागा निवडली जाते. मॅकडोनाल्ड मधील वातावरण देखील खूप चांगले असते.

 

Facts about Mcdonalds.Inmarathi
easterneye.eu

 

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मॅकडोनल्ड आजकाल खूप आवडीचे झाले आहे.

मॅकडोनल्डमधील सर्व्हिस देखील खूप चांगली असते. ग्राहकांकडे चांगल्याप्रकारे लक्ष देखील दिले जाते. येथे सेल्फ सर्व्हिस असल्यामुळे आपल्याला वेटरसाठी ताटकळत राहण्याची गरज देखील भासत नाही.

आपल्याला मुंबईमध्ये खूप ठिकाणी मॅकडोनाल्डच्या फ्रेन्चायझी दिसून येतात आणि या फ्रेन्चायझी यशस्वीपणे चालवल्या देखील जात आहेत.

ग्राहकांचे समाधान हेच मुख्य ध्येय मॅकडोनाल्डचे असते.

आज आपण याच मॅकडोनाल्डविषयी काही तथ्य जाणून घेणार आहोत, जी कदाचित तुम्ही यापूर्वी ऐकली नसतील..

१. कॅलिफोर्नियाच्या सॅन बर्नार्डिनो येथील दोन भाऊ डिक आणि मॅक मॅकडोनाल्ड यांनी पहिले मॅकडोनाल्डचे रेस्टॉरंट चालवले होते.

१९५४ मध्ये रे क्रोक याने त्या रेस्टॉरंटला भेट दिली आणि तो त्यांच्या कार्यक्षमतेवर आणि पदार्थांवर प्रभावित झाला आणि त्यांच्यासमोर पूर्ण अमेरिकेत मॅकडोनाल्डचे रेस्टॉरंट बनवण्याची कल्पना मांडली.

 

Facts about Mcdonalds.Inmarathi1
dailyherald.com

 

२. १९५८ पर्यंत मॅकडोनाल्डने जवळपास १० कोटी हॅम्बर्गर्स विकले आणि त्यांचा यामध्ये खूप चांगला जम बसला. या संकल्पनेमुळे त्यांच्या नफ्यामध्ये देखील वाढ झाली.

३. क्रोकने एकदा आपल्या चार व्यावसायिक उद्धिष्टांची माहिती दिली, “जर प्रत्येकवेळी गुणवत्ता, सेवा, स्वच्छता आणि मूल्य यांची साथ मला मिळाली असती, तर मी त्यां दोघांसोबत अटलांटिक महासागरावर पण पूल बांधला असता.”

४. मॅकडोनाल्डचे ११९ देशांमध्ये सुमारे ३६२५८ रेस्टॉरंट आहेत. त्यातील २९५४४ ह्या फ्रेन्चायझी आहेत. मॅकडोनाल्डमध्ये दररोज जवळपास ६९ मिलियन म्हणजेच जवळजवळ ७ कोटी लोकांना सेवा दिली जाते.

 

Facts about Mcdonalds.Inmarathi2
thehindu.com

 

५. गेल्या वर्षांपासून ते आतापर्यंत ३५० मॅकडोनल्डचे रेस्टॉरंट बंद करण्यात आलेली आहेत. मुख्यतः अमेरिका आणि चीनमधील ही रेस्टॉरंट बंद करण्यात आलेली आहेत. मॅकडोनल्डचा जवळपास ३२ टक्के नफा हा अमेरिकेमधून येतो.

६. ४० टक्के नफा हा युरोपमधून येतो. जास्तकरून युनायटेड किंग्डम, फ्रान्स, रशिया आणि जर्मनीमधून मॅकडोनल्ड नफा कमावत आहे. २३ टक्के नफा हा आशिया / पॅसिफिक, मध्य पूर्व आणि आफ्रिकामधून येतो.

७. २०१४  मध्ये मॅकडोनाल्डची अमेरिकेमधील विक्री ही २.१ टक्क्यांनी घसरली होती आणि २७.४ बिलियन डॉलर्सपर्यंत घसरण झाली होती.

 

Facts about Mcdonalds.Inmarathi3
bigdipper.in

 

८. गेल्यावर्षी अमेरिकेमधील मॅकडोनाल्डच्या ग्राहकांची संख्या चार टक्क्यांपेक्षा जास्तने घटली होती. मॅकडोनाल्डमध्ये एकूण जवळपास ४ लाख २० हजार कर्मचारी आहेत.

९.  ८० हजारांपेक्षा जास्त लोक हे मॅकडोनल्डच्या “हॅम्बर्गर विद्यापीठ” या शिकागोच्या वेस्टर्न सबर्ब मध्ये असलेल्या प्रशिक्षण केंद्रामधून पदवीधर झालेले आहेत.

१०. मॅकडोनल्ड आपल्या ९० हजार कर्मचाऱ्यांना दर तासाला ९.९० डॉलर्स म्हणजेच जवळपास ६०० रुपये या हिशोबाने वेतन देते. सध्या सरासरी या कर्मचाऱ्यांचे दर तासाचे वेतन  ९.०१ डॉलर म्हणजेच जवळपास ५५० रुपये आहे.

 

Facts about Mcdonalds.Inmarathi4
businessinsider.in

 

असे हे मॅकडोनल्ड आपल्याला वाटते, तितक्या सहज एवढे मोठे बनले नाही. पण आज हे आपल्या पदार्थांमुळे आणि त्यांच्या चवीमुळे लोकांच्या मनामध्ये घर करून बसले आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?