' कृपाशंकर ते निरव मोदी : आता तरी भक्त शहाणे होणार का?

कृपाशंकर ते निरव मोदी : आता तरी भक्त शहाणे होणार का?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

भाजप/मोदी कट्टर समर्थक अजूनही कट्टर वास्तव समजू शकत नसतील तर कठीण आहे. इकडे मंत्री महोदय “मतदारांना भेटवस्तू” द्या म्हणतात. कृपाशंकरांवर योग्य केस फाईल होत नाही. तिकडे PNB अपहाराबद्दल मे २०१४ नंतर किमान ३ तक्रारी रजिस्टर होतात. खुद्द PMO आणि CBI कडे! पण त्यावर तसूभरही कार्यवाही होत नाही.

 

nirav-modi-inmarathi
smedia2.intoday.in

नीरव मोदी प्रकरण २०११ चं आहे, हे समर्थन प्रचंड हास्यास्पद आणि त्याहून अधिक तकलादू आहे. ह्या प्रकरणात थोडंसं गुगल केलं तर समोर येणारी वस्तुनिष्ठ माहिती डोक्याचा पार भुगा करणारी आहे.

PMO आणि CBI कडे ज्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली गेलीये, असा माणूस चक्क पंतप्रधानांच्या “CEO” फोटोमध्ये असतो. जानेवारी महिन्यात फरार होऊ शकतो.

ह्यातून दोन शक्यता दिसतात. एकतर PMO ह्यात active party आहे किंवा प्रकरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय. कोणती शक्यता अधिक भयावह आहे सांगता येत नाही. असभ्य मनमोहनसिंग काळात वेगळं काय होतं?!

 

pm-modi-with-nirav-modi_inmarathi
akm-img-a-in.tosshub.com

“मोदींच्या हेतुवर विश्वास ठेवा” पासून “कार्यवाही नक्की होणार!” पर्यंत सगळे तर्क देऊन झालेत. आज तर “सरकारवर टीका करण्याआधी हा विचार करा की आपण ही कुठे ना कुठे भ्रष्टाचार करत असतोच” इथपर्यंत मजल गेलीये.

And yet the damning questions are never answered.

शिवाय “मग फडणवीस-मोदी नाही तर कोण?” हे टिपिकल पालुपद आहेच. मुद्दा “तर मग २०१९ ला मत कुणाला देणार?” हा कधीच नसतो मित्रांनो. तो मुद्दा फक्त निवडणुकीच्या दिवशी. एरवी मात्र “सरकारवर सतत आणि प्रखर सकारात्मक दबाव ठेवणे” हा एकच मुद्दा असतो. “व्यवस्था परिवर्तन घडवून आणणे” हा एकच अजेंडा असायला पाहिजे.

भ्रष्टवादी म्हणून हिणावलेले लव्हासा सम्राट थेट गुरूस्थानी रूढ होतात – ते फक्त तोंडदेखलं नसतं – हे समजून घेता आलं पाहिजे.

अजित पवार ते थेट कृपाशंकर अन नीरव मोदी, एकामागे एक कितीतरी डोळे उघडणारी उदाहरणं घडत आहेत. एवढं होऊनसुद्धा कट्टर समर्थक अजूनही कट्टर वास्तव समजू शकत नसतील तर कठीण आहे.

शेवटी “आपली बांधिलकी कुणाशी?” हा प्रश्न आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 172 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?