' गॉडफादर : खिळवून ठेवणारे एक भयानक सूडनाट्य – InMarathi

गॉडफादर : खिळवून ठेवणारे एक भयानक सूडनाट्य

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखिका – ऍडव्होकेट. अंजली झारकर 

अलीकडचा साउथ मधला बाहुबलीच्या पाठोपाठ सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या विक्रम – वेधा चित्रपटातला विजय सेतुपथीने रंगवलेला खलनायक “वेधालम” जसा म्हणतो

“There is always an unthinkable perspective for any story”.

कहाणी जशी समाजातल्या अतिशय सज्जन, सभ्य माणसाची असते तशीच ती समाजात दुर्जन समजल्या जाणाऱ्या माणसाची ही असते आणि अशा सध्या सरळ सज्जन कहाण्यापेक्षा नियतीने केलेले अटळ वार झेलत जी दुर्जन माणसाची कहाणी बनते ती कायम लोकप्रिय राहते.

अशीच कहाणी होती GODFATHER ची! Godfather नावाच गारुड जनमाणसात अवतरून ४८ वर्षे उलटली. १९६९ साली प्रथम इंग्रजी भाषेत प्रकाशित झालेली ही कादंबरी.

 

The_Godfather_InMarathi

 

आजच्या पिढीला जी त्यावेळी जन्माला ही आलेली नव्हती तिला माहीत असलेल्या आणि बेहद आवडणाऱ्या पुस्तकांमध्ये Godfather चा सामावेश होतो. कदाचित उद्या येणाऱ्या ५० एक पिढ्यांना आवडणाऱ्या पुस्तकांमध्येही ती राहू शकेल. Godfather चे अनेक संवाद आज ही लोकांना तोंडपाठ असतात.

“मी त्याला अशी ऑफर देईल की ती तो नाकारूच शकणार नाही”, “सूड हा असा खाद्यपदार्थ आहे जो थंड असतनाच खायला चांगला लागतो”, “मित्राने तुमच्या चांगल्या गुणांविषयी सुद्धा शंका घ्यावी पण शत्रूने तुमच्या साध्या चुका ही मोठ्या करून दाखवाव्यात”.

 

The_Godfather_1 InMarathi

 

“तुमचे मित्र तुमच्या आसपास ठेवा आणि शत्रू त्यांच्याही पेक्षा जवळ”, “प्रत्येक मोठ्या ठरलेल्या नशीबाच्या मागे एक गुन्हा लपलेला असतो” असे कित्येक कोट्स आजही लोक सोशल मीडिया वर शेअर करत असतात.

Godfather ला कल्पनेतून प्रत्यक्षात जिवंत केलं आणि ठेवलं ते १९७२ साली आलेल्या त्याच्यावरच्या चित्रपटाने. सर्वाधिक गल्ला खेचलेला.

तीन ऑस्कर वर आपली मोहर कोरलेला ज्यात पुझो ला best adaptive screenplay साठी ऑस्कर मिळालं होत.

गँगस्टरवर जेव्हढे म्हणून काही सिनेमे बनवले गेले आहेतत्याच्या कॅटेगरी मधलाहा सगळ्यात संस्मरणीय ठरलेला. इतका की त्याची अमेरिकेच्या Library of congress च्या National film registry मध्ये जतन करून ठेवलेल्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कलात्मक दृष्ट्या उत्तम मानल्या गेलेल्या फिल्म मध्ये निवड झाली.

 

The Godfather.Inmarathi1
zimbio.com

तिच्या जन्माची कथा इतर कोणत्याही जगप्रसिद्ध कादंबरीच्या प्रसवकथेसारखीच विचित्र. जशी मुंबई ची “धारावी” त्याचप्रमाणे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील “हेल्स किचन” या नावाने धारावीपेक्षा बदनाम असणारा इलाका. त्या इलाक्यात गरीब इटालियन आई वडिलांच्या पोटी जन्मलेला मरिओपुझो.

जरी आजूबाजूचे वातावरण गुन्हेगारीकड झुकवणारे असले तरी त्याकडे न वळता त्याने चांगले शिक्षण घेवून अगोदर मिलिटरी आणि नंतर पत्रकारिता आणि शेवटी लेखक म्हणून आपले नशीब अजमावून पाहिले. पुझो ची Godfather पूर्वीची दोन पुस्तके सपशेल अपयशी ठरली होती.

 

Book-Review-The-Godfather-by-Mario-Puzo InMarathi

 

घरात बायको आणि पाच मुले यांना स्वत:च्या क्लर्क च्या नोकरीमधून आपण काहीही देवू शकणार नाही त्यासाठी काहीतरी अस लिहायला हव जे लोकांच्या काळजाचा ठाव घेईल या एकाअसहाय आणि जळत्या जाणीवेतून त्याने आपली तिसरी कादंबरी लिहायला घेतली पणया ही कादंबरीला कोणी प्रकाशक मिळेना.

ती छापायला कोणी तयार होईना. शेवटी न्यूयॉर्क च्या G. P. Putnam’s Sons यांनी ती कादंबरी छापायचे ठरवले. दुय्यम दर्जाच्या मासिकासाठी पत्रकारिता करीत असतानाच्या काळात त्याने अमेरिकेतील माफिया डॉन आणि माफिया कुटुंबाच्या बऱ्याच हकीकती ऐकल्या होत्या.

 

The Godfather.Inmarathi2
henryherbert.com

त्याच कथांचा धागा पकडून Godfather लिहिली गेली. प्रकाशनाआधी जिची संभावना एक छचोर झोपडपट्टी च्या पोराने लिहिलेली एक टुकार गुन्हेगारी कथा अशी केली जात होती तिने प्रकाशना नंतर सगळ्या उच्चभ्रू एलाईट क्लास कादंबऱ्या ना मागे टाकले.

न्युयॉर्क टाईम बेस्ट सेलर म्हणून तब्बल ६७ महिने Godfather प्रथम स्थानावर राहिली. प्रकाशात आल्यापासून कादंबरीच्या केवळ दोन वर्षात विक्रमी ९० लाख प्रती विकल्या गेल्या. आजहीबेस्ट सेलिंग च्या यादीत Godfather चा नंबर वरती लागतो.

सर्वसाधारणपणे सूडनाट्य हा कुठल्याही बेस्ट सेलर कादंबरीच्या यशाचा गाभा राहिलेला आहे. न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध तरीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी कॉर्लीऑन फॅमिली आणि तिचा कुटुंब प्रमुख डॉन व्हिटो कॉर्लीऑन आणि त्याची वारसदार मुले यांच्या भोवती असलेलं कादंबरीचं कथानक.

१९४५ साली न्यूयॉर्क शहरात खरोखरीच्या भडकलेल्या माफिया वॉर ची गडद पार्श्वभूमी या कथेच्या पाठीमागे आहे. न्यूयॉर्क शहरावरील गुन्हेगारी साम्राज्यावर हुकुमत गाजवणाऱ्या पाच माफिया फॅमिली आणि त्यांच्यामधील अंतिम विजयासाठी होणार युद्ध हाच या कादंबरीचा सारांश आहे.

पाच फॅमिली पैकी एक फॅमिलीला मध्यवर्ती ठेवून आणि तिच्या कुटुंब प्रमुखाला कादंबरी चे मुख्य पात्र ठेवून त्याच्या भोवती सगळी कथा पुझो ने रेखाटली.

 

The Godfather.Inmarathi3
popculture.com

डॉन व्हिटो कॉर्लीऑन ने अंमली पदार्थाच्या विक्रीस सरंक्षण देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यावर खुनी हल्ला होतो. त्याच्या गैरहजेरीत गोष्टी सुरळीत सुरु ठेवण्याची जबाबदारी डॉनचा कारभार सांभाळणारे त्याचे दोन सेनापती क्लेमेंझो आणि टेशिओ, डॉनचा भडक डोक्याचा थोरला मुलगा सांतिनो कॉर्लीऑन, डॉन ने अनाथ म्हणून सांभाळ केलेला.

नंतर फॅमिली चा प्रमुख सल्लागार झालेला वकील टॉम हेगन, प्रचंड घाबरट असा डॉन चा मधला मुलगा फ्रेडी आणि वडिलांचे कधीही न ऐकणारा त्यांच्या मर्जीविरुद्ध वागणारा आणि फॅमिली च्या बिझनेस पासून पूर्णपणे अलिप्त राहणारा धाकटा मुलगा मायकल यांच्यावर येवून पडते.

मात्र घटना अशा काही वळण घेतात ज्यामध्ये फॅमिली च्या बिझनेस पासून कटाक्षाने दूर राहणाऱ्या मायकलला खून केल्या प्रकरणी इटली मध्ये जावून तोंड लपवावे लागते, सांतीनो प्राणास मुकतो आणि प्राणघातक हल्ल्यामधून वाचलेल्या डॉनला स्वत: परत सूत्रे हातात घेवून सर्व माफिया फॅमिलीची बैठक बोलावून त्याच्यात स्वत:चा पराभव मान्य करावा लागतो.

वय झाल्यामुळे आपल्या साम्राज्याच्या भावी वारसदाराला तयार करून स्वत:ची नेस्तनाबूत झालेली सत्ता परत मिळवण्यासाठी डॉन कॉर्लीऑनज्या हुशारीने आणि संयमाने चक्रे फिरवतो त्याचा शेवट काय होतो हे मुळापासून वाचण्यासारखे आहे. शिवाय कादंबरीच्या ओघात अनेक पात्रे आणि त्यांची उपकथानके स्वतंत्रपणे भेटीस येत राहतात. पण त्यांची मूळ कादंबरीच्या प्लॉट बरोबर कुठेही नाळ तुटत नाही.

 

godfather gif साठी इमेज परिणाम

 

खरे पाहता Godfather ला poetic justice चं तत्व लागू पडत नाही तरी असेही लोक आहेत ज्यांनी अनेक वेळा ही कादंबरी वाचली आहे, अजूनही वाचतात. त्यांच्या पैकी मी एक आहे. मला माझ्या वकिली व्यवसायात stand होण्यासाठी या कादंबरीचा उपयोग झालाय. strange but truth!

कितीही वेळा वाचाल तरी अजून godfather हातातून आणि डोक्यातून सुटत नाही.

या कादंबरी मध्ये सकारात्मक मानवी भाव भावना, मुल्ये यांना फारस स्थान नाही. सगळे माफिया, त्यांच्या रक्तरंजित महत्वाकांक्षा, किडे मुंग्या सारखी मरणारी माणसे, लैंगिक शोषण यांनी पानेच्या पाने भरली आहेत तरीही Godfather इतकी यशस्वी का आहे या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलं तर अस लक्षात येईल की डॉन वेगवेगळ्या प्रकारचे असतात.

एक

“मैं उन चीजों की स्मगलिंग करता हुं जिनकी इझाजात सरकार नही देती. उन चीजों की नही जिनकी इझाजात जमीर नही देता”

असं म्हणणारा हाजी मस्तान. आणि एक “किसी की इतनी बद्दुआ लो के लोग दुवा में तुम्हारी मौत मांगे
अस सिद्ध करून दाखवणारा” दाउद इब्राहीम.

 

The Godfather.Inmarathi4
blogspot.in

डॉन कॉर्लीऑनचा प्रकार हा पहिल्या सारखा आहे. त्याची व्यक्तीरेखा तत्वनिष्ठ माफिया ची आहे.

And I refused to be a fool, dancing on the string held by all those bigshots. I don’t apologize – that’s my life

अस म्हणणारा हा नायक परिस्थितीच्या रेट्यामुळे, नशिबाच्या फेऱ्यात सर्वस्व हरपल्या नंतर सर्व शक्तीनिशी लढायला उभा ठाकलेला माफिया बनतो तरीही त्याच्या व्यक्तिमत्वाचे अनेक कंगोरे आहेत.

स्वत: शिकलेला नसून ही त्याला शिक्षणाबद्दल आदर आहे, त्याच्या कुटुंबाचे आणि कुटुंबात सामील झालेल्या हर एक व्यक्तीची (ती संख्या तशी फार मोठी आहे) त्याला काळजी आहे. विनाकारण सूडासाठी सूड, रक्तपातत्याला मान्य नाही मात्र लोकशाही सरकार असलेल्या देशात त्याचं स्वत:च सरकार आहे आणि तो त्या समांतर व्यवस्थेचा न्यायदाता आहे.

शिवाय स्वत:च्या सगळ्यात लहान मुलाला, मायकलला या युद्धात त्याच्या इच्छेविरुद्ध फक्त अटळ नियती म्हणून पडावं लागणं याचा त्याला एक बाप म्हणून खेद देखील वाटतो.

godfather gif साठी इमेज परिणाम

 

मायकल कॉर्लीऑन या कादंबरीचा आपल्या वडिलांसारखा तोडीस तोड नायक. कसलाही संबंध नसताना नशीब त्याला डॉनचा वारसा पुढे चालवायला भाग पाडते. चित्रपटात शेवटच्या भागात डॉन च्या मृत्यनंतर मायकल कॉर्लीऑन त्याच्या बहिणीच्या बाळाचा godfather म्हणून चर्च मध्ये baptise होण्यासाठी उभा राहिलेला असतो. त्यावेळी धीरगंभीर आवाजात तो चर्चचा फादर त्याला विचारतो

“maichael francis Rizzi , Do you renounce satan?”

मायकल उत्तर देतो

“I do renounce him”,

पुढचा प्रश्न येतो ,

“And all his works?”

उत्तर येतं

“I do renounce them”,

शेवटचा प्रश्न येतो

“And all his pomps?”

मायकल धीरगंभीर आवाजात बोलतो

“I do renounce them”

या प्रश्नोत्तराच्या पार्श्वभूमीवर मायकल चे हस्तक एक एक करत बर्झीनी, टाटाग्लिआ, मो ग्रीन अशी संपूर्ण माफिया clan जागोजागी गाठून त्यांना गोळ्या घालत न्यूयॉर्क वर निर्विवाद कॉर्लीऑन family च्या विजयाची मोहर उमटवत जाताना दिसतात.

अप्रतिम सीन! bollywood वाल्यानी godfather चे अनेक तुकडे अनेक चित्रपटात जागोजागी वापरलेत. त्यातून कल्पना घेवून अनेक माफिया मुव्ही आपल्याकडे साकारलेत पण तसे ते पांचट वाटतात. आक्खा godfather पचवणे ही म्हणजे ‘बस की बात नही’. त्यांनी“ गोविंदा, गोविंदा, गोविंदा, गोविंदा, गोविंsssssदा” म्हणत भजनी मंडळ बसवावं हेच अपेक्षित आहे.

 

The Godfather.Inmarathi5
news.com

Godfather मधील पात्रे आपल्याला आपल्या आयुष्यात जागोजागी भेटतील आणि खऱ्या आयुष्यातले अटळ नियतीचे वार सहन करताना त्याच्याविरुद्ध लढताना कदाचित स्वत:मध्ये हा डॉन व्हिटो कॉर्लीऑन, मायकल कॉर्लीऑन,एकदा तरी डोकावून पाहताना ही नक्की दिसेल.

जोपर्यंत देशोदेशीच्या उभारलेल्या समाजमान्य सिस्टीम मध्ये सर्वाना समान न्याय मिळत नाही त्या दिवसा पर्यंत कॉर्लीऑन साम्राज्याची ही कहाणी पुढची अनेक वर्षे वाचली जाणार यात शंका नाही!

===

InMarathi.com | वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com |त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?