' “रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये” अंधश्रद्धा की विज्ञान? वाचा याचं शास्त्रीय उत्तर – InMarathi

“रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये” अंधश्रद्धा की विज्ञान? वाचा याचं शास्त्रीय उत्तर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ट्रेकिंग करताना किंवा कुठे लांब पल्ला पायी पार करताना आपण बऱ्याच वेळा झाडाच्या खाली सावलीत आसरा घेतो! उन्हाचा तडाखा खूप असतो आणि चालून किंवा ट्रेकिंग करून दमल्याने थोडी विश्रांती म्हणून आपण सगळेच झाडाच्या सावलीचा आश्रय घेतो!

झाडं आपल्याला ऑक्सीजन, फळं फुलं देतात, खोडापासून बरेच फायदे आहेत, एकंदरच झाडं हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे!

 

झाडे ही आज मानवाच्या अस्तित्वासाठी किती महत्वाची आहेत हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही.

झाडे आपल्याला प्राणवायू देतात आणि आपण काय करतो तर त्यांना तोडून मोठमोठ्याल्या इमारती उभारतो, मेट्रो शहरं उभी करतो. आणि मग ग्लोबलवार्मिंग वाढली म्हणून “झाडे लावा झाडे जगवा” असं सांगत फिरतो…

 

tree-plantation-inmarathi
wildrangers.in

दिवसा आपण झाडाखाली आसरा घेतो किंवा थोडी विश्रांती म्हणून पहुडतो पण रात्री झाडाखाली झोपू नये असं तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल!

असो. आपला प्रश्न आहे की रात्री झाडाखाली का झोपू नये? अनेकांना ही एक अंधश्रद्धा वाटते पण ह्यामागे एक शास्त्रीय कारण देखील आहे.

सर्व सजीव श्वसनक्रिया करतात. ज्यात प्राणी ऑक्सिजन घेतात आणि कार्बनडायऑक्साईड बाहेर सोडतात. तर वनस्पती ह्या कार्बनडायऑक्साईड शोषतात आणि ऑक्सिजन सोडतात.

 

tree-excrete-inmarathi02
scienceabc.com

 

पण वनस्पतीमध्ये असा कुठला विशेष भाग किंवा अंग नसते ज्यामुळे ते श्वसन करतील. त्यांच्यात श्वसन हे पानांच्या मार्फत होत असते. पानांवर असणाऱ्या छिद्रातून म्हणजेच स्टोमॅटाच्या मदतीने ते श्वसन करतात.

हे तर सर्वांना माहित आहे की वनस्पती ह्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. ह्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण क्रिया असे म्हणतात.

ह्यात वनस्पती कार्बनडायऑक्साईड आणि पाण्याच्या मदतीने ऑक्सिजन बनवतात. ही क्रिया वनस्पतींच्या केवळ त्या भागांत होत असते जिथे क्लोरोफिल असेल. आणि तेही केवळ प्रकाशात शक्य असते. म्हणजेच रात्रीच्या वेळी वनस्पती ही क्रिया करत नाहीत. पण जशी आपली श्वसन क्रिया ही २४ तास सुरु असते तशीच वनस्पतींची देखील असते.

 

tree-inmarathi01
ck12.org

 

प्रकाश संश्लेषण ह्या प्रक्रीयेमुळेच वनस्पती या प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन तयार करतात आणि ते आपल्यासाठी वरदान ठरते.

पण रात्रीच्या वेळी वनस्पती ही क्रिया करत नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी ऑक्सिजन तयार होत नाही. वनस्पती ह्या प्राण्यांप्रमाणे इकडे तिकडे फिरू शकत नाहीत, हालचाल करू शकत नाहीत.

त्यामुळे त्यांना कमी उर्जेची गरज असते.

 

tree-excrete-inmarathi03
jagranjosh.com

 

श्वसन क्रियेत जो कार्बनडायऑक्साईड तयार होतो तो पानांच्या आत खालील भागांत जातो. ह्याच पानांत प्रकाश संश्लेषण क्रिया देखील होते.

त्यासाठी हवेतील कार्बनडायऑक्साईडचा वापर केला जातो. म्हणूनच आपण म्हणतो की वनस्पती कार्बनडायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडतात.

 

tree-excrete-inmarathi

 

पण रात्रीच्यावेळी ही क्रिया बंद होऊन जाते. तरीही श्वसन क्रिया ही निरंतर सुरु असते. तेव्हा ऑक्सिजन तयार होऊ शकत नाही.

हे होत असताना प्राण्याची श्वसनाची प्रक्रिया चालूच असते आणि त्यातून कार्बनडायऑक्साईड चे उत्सर्जन होत असते.

वनस्पती आणि प्राणी या दोन्ही प्रकारच्या सजीवांकडून एकाच वेळी होत असलेल्या कार्बनडायऑक्साईड च्या उत्सर्जनामुळे त्याचे हवेतील प्रमाण वाढत असते.

म्हणून रात्रीच्यावेळी झाडाखाली झोपू नये असे म्हटले जाते.

कारण जर रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपले तर कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण जास्त आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने आपल्याला हवा तेवढा ऑक्सिजन मिळत नाही.

ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणे, गुदमरणे अश्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे तुमचा जीव देखिल जाऊ शकतो.

 

tree-inmarathi02
flashwallpapers.com

 

पर्यावरणातील अनेक गोष्टींबद्दल काही समज गैरसमज आहेत. काही समज शास्त्रीय आहेत तर काही अशास्त्रीय. रात्री झाडांखाली झोपू नये हा असाच एक समज.

पण त्यामागील शास्त्रीय कारण लक्षात घेतले तर रात्री झाडाखाली झोपणे आरोग्यास हितकारक नसल्याचे लक्षात येते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?