' राष्ट्रपतींचा पगार किती असतो? त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात? वाचा… – InMarathi

राष्ट्रपतींचा पगार किती असतो? त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात? वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात राष्ट्रपती पद हे देशातील सर्वात अभिमानाचे पद असते. राष्ट्रपती हे देशाचे पहिले नागरिक असतात. आता देशाचे पहिले नागरिक आणि एवढे महत्वाचे पद, मग त्यांना तश्या सुविधा तर मिळणारच.

पण आपण नेहेमी राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती ह्यांच्या बाबत बातम्यांमध्येच ऐकले आहे. त्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि पगार ह्याबाबत आपल्याला कदाचित तेवढी माहिती नसेल.

तुम्हाला माहित आहे राष्ट्रपतींना किती पगार मिळतो?

 

सध्याचे आपल्या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आपल्या देशाचे १४ वे राष्ट्रपती आहेत. तसे तर राष्ट्रपती, पंतप्रधान हे  देशाच्या सेवेकरिता काम करत असतात. तरी त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून पगार दिला जातो.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांना दर महिन्याला ५ लाख रुपये पगार दिला जातो.

ह्याआधीचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी ह्यांना १.५ लाख रुपये प्रति महिना पगार दिला जायचा. पण हा पगार इतर पदाधिकाऱ्यांच्या तुलनेत खूप कमी होता.

सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर कॅबिनेट सचिवचा पाफ्गर २.५ लाख प्रति महिना आणि केंद्र सरकार सचिवचा पगार २.२५ लाख प्रति महिना झाला. पण राष्ट्रपतीचा पगार मात्र १.५ एवढाच राहिला.

 

Rashtrapati-Bhavan InMarathi

ह्यानुसार केंद्र कर्मचाऱ्याचे वेतन हे राष्ट्रपतीच्या वेतनापेक्षा १ लाखाने अधिक झाले. राष्ट्रपती पदाच्या प्रतिष्ठेकरिता हे चुकीचे होते. एखद्या सरकारी कर्मचाऱ्याचा पगार राष्ट्र्पतीपेक्षा अधिक असणे हे चुकीचे होते.

ह्यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्राच्या सर्वोच्च व्यक्तीच्या पगारात ७ व्या वेतन आयोगानुसार २०० पटीने वाढ करण्यात आली आहे.

ज्यानंतर राष्ट्रपतीचा पगार हा १.५ लाखावरून ५ लाख प्रति महिना एवढा झाला. तर उपराष्ट्रपतीच्या पगारात देखील वाद करण्यात आली आहे. उपराष्ट्रपतीचा आधीचा पगार १.२५ लाख प्रति महिना एवढा होता तो आता ३.५ लाख प्रति महिना करण्यात आला आहे.

 

ramnathkovind-inmarathi01
dailypost.in

ह्याचा फायदा माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी ह्यांना देखील झाला. त्यांना सेवानिवृत्ती नंतर १.५ लाख रुपये प्रति महिना पेन्शनच्या स्वरुपात दिले जातात.

तर राष्ट्रपतीच्या बायकोला ३० हजार रुपये सेक्रेटेरियल मदत देखील दिली जाते. त्यासोबतच माजी राष्ट्रपती, मृत राष्ट्रपती तसेच माजी उपराष्ट्रपती, मृत उप राष्ट्रपती ह्यांच्या पत्नी आणि पूर्व राज्यपाल ह्यांच्या पेन्शनमध्ये देखील वाढ करण्याचा विचार सुरु आहे.

ह्याआधी २००८ साली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, राज्यपाल ह्यांच्या पगारात तीन पट वाढ करण्यात आली होती. त्याआधी पर्यंत राष्ट्रपतीचा पगार हा ५० हजार प्रति महिना एवढा होता. तर उप राष्ट्रपतीचा ४० हजार आणि राज्यपाल ह्यांचा पगार ३६ हजार रुपये प्रति महिना एवढा होता.

 

Rashtrapati-Bhavan from 3 inside

राष्ट्रपतीला मिळणाऱ्या सुविधा :

राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च पद आहे. त्यामुळे त्यांना तश्या सर्वोच्च सुविधा देखील देण्यात येतात. भारताचे राष्ट्रपती पदावर असताना राष्ट्रपती भवनात राहतात. तिथे त्यांना सर्व सुख-सोयी पुरविल्या जातात.

राष्ट्रपती भवन हे भारताच्या व्हॉइसरॉय यांच्यासाठी इंग्रजांनी बनविलेले भवन आहे. १९५० पर्यंत याला व्हॉइसरॉय हाउस म्हटले जायचे.

पण त्यानंतर पासून हे देशाच्या राष्ट्रपतीचे अधिकृत निवासस्थान आहे. येथे राष्ट्रपतीला खाणे-पिणे, नोकर-चाकर, इत्यादी सर्व सुविधा पुरवल्या जातात. यावर भारत सरकार वर्षाला २२.५ कोटी रुपये खर्च करते.

 

Rashtrapati-Bhavan from 4 inside

 

प्रजासत्ताक दिनापासून म्हणजेच २६ जानेवारी १९५० पासून देशाला आजपर्यंत १७ जणांनी या पदवारापले नाव नोंदवले आहे, (परंतु कार्यकाळाप्रमाणे १४) राष्ट्रपतींची नावे आणि त्यांचा कार्यकाळ खालीलप्रमाणे –

 

# नाव पदग्रहण पद सोडले
डॉ. राजेंद्र प्रसाद
(१८८४-१९६३)
२६ जानेवारी १९५० १३ मे १९६२
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
(१८८८-१९७५)
१३ मे १९६२ १३ मे १९६७
झाकिर हुसेन
(१८९७-१९६९)
१३ मे १९६७ ३ मे १९६९
वराहगिरी वेंकट गिरी *
(१८९४-१९८०)
३ मे १९६९ २० जुलै १९६९
मोहम्मद हिदायतुल्ला *
(१९०५-१९९२)
२० जुलै १९६९ २४ ऑगस्ट १९६९
वराहगिरी वेंकट गिरी
(१८९४-१९८०)
२४ ऑगस्ट १९६९ २४ ऑगस्ट १९७४
फक्रुद्दीन अली अहमद
(१९०५-१९७७)
२४ ऑगस्ट १९७४ ११ फेब्रुवारी १९७७
बी.डी. जत्ती *
(१९१२-२००२)
११ फेब्रुवारी १९७७ २५ जुलै १९७७
नीलम संजीव रेड्डी
(१९१३-१९९६)
२५ जुलै १९७७ २५ जुलै १९८२
झैल सिंग
(१९१६-१९९४)
२५ जुलै १९८२ २५ जुलै १९८७
रामस्वामी वेंकटरमण
(१९१०-२००९)
२५ जुलै १९८७ २५ जुलै १९९२
शंकरदयाळ शर्मा
(१९१८-१९९९)
२५ जुलै १९९२ २५ जुलै १९९७
१० के.आर. नारायणन
(१९२०-२००५)
२५ जुलै १९९७ २५ जुलै २००२
११ डॉ. .पी.जे. अब्दुल कलाम
(जन्म १९३१)
२५ जुलै २००२ २५ जुलै २००७
१२ प्रतिभा पाटील
(जन्म १९३४)
२५ जुलै २००७ २५ जुलै २०१२
१३ प्रणव मुखर्जी
(जन्म १९३५)
२५ जुलै २०१२ २५ जुलै २०१७
१४ रामनाथ कोविंद २५ जुलै २०१७ विद्यमान

 

 

भारताच्या संविधानानुसार राष्ट्रपतीची निवड थेट नागरिकांद्वारे न होता संसदेच्या लोकसभा व राज्यसभा तसेच देशातील सर्व घटक राज्यांच्या विधान मंडळाच्या विधानसभा ह्या शाखांमधील निर्वाचित प्रतिनिधींमार्फत होते. राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. संसदेला महाभियोग चालवूनच, फक्त त्यांना मुदत संपायच्या आधी पदावरून दूर करता येते. नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवन हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?