'क्रिकेटमधील एक गमतीशीर कूटप्रश्न! याचं उत्तर ओळखा बरं!

क्रिकेटमधील एक गमतीशीर कूटप्रश्न! याचं उत्तर ओळखा बरं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

भारत हा देश क्रिकेटसाठी किंवा क्रिकेटप्रेमींसाठी जास्तच प्रसिद्ध आहे. अगदी भारताच्या प्रत्येक गल्लीत हा खेळ आवडीने खेळला जातो आणि पाहिलाही जातो.

क्रिकेटचे नियम अगदी सगळ्यांच्या तोंडावर असतात, पण आज आम्ही एक वेगळाच प्रश्न घेऊन आलोय.

तर प्रश्न असा आहे की –

 

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. कसोटी  मालिका २- १ हरल्यानंतर आता एकदिवसीय मालिका भारतीय संघ खेळत आहे. या एकदिवसीय ६ सामन्याच्या मालिकेमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला पाच सामन्यांमध्ये ४- १ या फरकाने नमवले आहे आणि त्याचबरोबर ही एकदिवसीय मालिका देखील आपल्या खिशामध्ये घातली आहे.

परवा झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला ७३ भवानी मात दिली. या सामन्यात रोहित शर्माने दणदणीत शतक ठोकले आणि कुलदीप यादवने चार विकेट्स काढल्या. यांच्या जोरावर हा भारताने विजय सहज मिळवला.

 

rohit-sharma-marathipizza04
sports.ndtv.com

क्रिकेट हा खेळ सगळीकडेच खूप लोकप्रिय आहे. भारतात तर या खेळाचे प्रस्थ जरा जास्तच आहेत, कारण भारतामध्ये खूप दिग्गज खेळाडू देखील तेवढेच होऊन गेले आहेत. त्यातलाच एक म्हणजे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर.

भारतातील लोक हा खेळ बघत नाहीत, तर तो एकप्रकारे जगतात. पण हा खेळ देखील कधी – कधी प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण करून जातो आणि त्याची उत्तरे आपल्याला शोधणे काहीवेळा कठीण जाते.

आज पण अशाच एका प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत, जो कदाचित तुमच्या मनामध्ये कधीतरी नक्की आला असेल, कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे आणि यामध्ये कोणताही अंदाज लावणे चुकीचे ठरते.

प्रत्येक खेळाचे आपापले काही नियम असतात, तसेच क्रिकेट या खेळाचे देखील स्वतःचे असे काही नियम आहेत. ज्याच्या आधारावरच आपल्याला याचे उत्तर मिळते. प्रश्न असा की,

जर फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकण्यासाठी एक धाव पाहिजे असेल आणि गोलंदाजी करणाऱ्या संघातील गोलंदाजाने जर वाईड बॉल टाकला आणि या वाईड बॉलवर फलंदाज स्टम्प आउट म्हणजेच स्टॅम्पिंग झाला तर ती विकेट गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या किंवा गोलंदाजाच्या खात्यात जाते का ?

 

Stumped on a wide ball.Inmarathi
imgci.com

तुम्हाला देखील या प्रश्नाने नक्कीच बुचकळ्यात पाडले असेल. कोरावर आलेल्या उत्तरानुसार असे समजते की, या प्रसंगामध्ये ती विकेट ग्राह्य धरला जात नाही.

ही गोलंदाजाने घेतलेली विकेट गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या किंवा गोलंदाजाच्या खात्यामध्ये जात नाही,  कारण यावेळी फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयासाठी १ धाव पाहिजे असते आणि गोलंदाज वाईड बॉल टाकतो.

यावेळी जेव्हा गोलंदाज वाईड बॉल टाकतो, त्यावेळी अतिरिक्त धावेच्या रूपामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला एक धाव अधिक मिळते.

त्यामुळे जेव्हा हा वाईड बॉल पडतो त्याचवेळी फलंदाजी करणारा संघ हा सामना जिंकतो, कारण फलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त एकाच धावेची गरज असते आणि ती धाव त्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी असते.

जेव्हा तो बॉल स्टम्पच्या पाठीमागे ट्रॅव्हल करून विकेटकिपरच्या हातात जाऊन तो विकेट्स उडवेपर्यंत सामना समोरील फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकलेला असतो.

त्यामुळे वाईड बॉल झाल्यांनंतरची कोणतीही क्रिया ग्राह्य धरली जात नाही आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला तो विकेट दिला जात नाही.

 

 

अशाच प्रकारचा एक प्रसंग १६ ऑगस्ट २०१० मध्ये ट्राय – सीरिजच्यावेळी  भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यामध्ये झाला होता. या सामन्यामध्ये श्रीलंकेचा संघ १७० धावांमध्येच कोलमडला आणि भारताला विजयासाठी १७१ धावांचे लक्ष गाठायचे होते. या सामन्यामध्ये भारताचा तडाखेबाज खेळाडू वीरेंद्र सेहवागने कमालीची इनिंग खेळली.

या सामन्यामध्ये तो ९९ धावांवर नाबाद राहिला. भारताला जिंकण्यासाठी जेव्हा १ धाव पाहिजे होती, त्यावेळी सेहवाग फलंदाजी करत होता आणि त्याला स्वतःचे शतक पूर्ण करण्यासाठी देखील १ धाव पाहिजे होती.

 

Stumped on a wide ball.Inmarathi1
quoracdn.net

त्यावेळी श्रीलंकेचा फिरकीपटू सूरज रणदिव हा गोलंदाजी करत होता. सूरज रणदिवने त्याचा पुढचा बॉल नो- बॉल टाकला आणि या नो – बॉलवर सेहवागने उत्तुंग फटका मारत बॉलला प्रेक्षकांमध्ये फेकत षटकार मारला आणि आपल्या शतकाचा आनंद साजरा करायला लागला.

 

पण हा त्याचा षटकार ग्राह्य धरला गेला नाही, कारण जेव्हा सूरज रणदिव हा नो – बॉल टाकतो, तेव्हा भारताला त्याची एक अतिरिक्त धाव मिळाली आणि तिथेच भारताचा विजय होऊन सामना संपला.

त्यामुळे जसे मी वर सांगितल्याप्रमाणे अशा प्रसंगी त्या नो – बॉलनंतर घडलेली कोणतीही कृती ग्राह्य धरली जात नाही. आणि त्या नो – बॉल किंवा वाईड  बॉलबरोबरच सामना संपला असे पंच घोषित करतात.

मग आता तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल, तर त्याचे उत्तर तुम्हाला यावरून नक्कीच मिळाले असेल, नाही का?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “क्रिकेटमधील एक गमतीशीर कूटप्रश्न! याचं उत्तर ओळखा बरं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?