' ही ७ माणसे देखील प्रिया प्रकाश सारखीच इंटरनेटवर झटपट प्रसिद्ध झाली होती.

ही ७ माणसे देखील प्रिया प्रकाश सारखीच इंटरनेटवर झटपट प्रसिद्ध झाली होती.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

इंटरनेट एक असे साधन आहे, जिथून खूप कमी वेळामध्ये कोणतीही गोष्ट एकदम झपाट्याने पसरली जाते. त्यासाठी कधी – कधी लोकांना जास्त मेहनत देखील करावी लागत नाही.

एखाद्या माणसाला शून्यातून ‘फेमस सेलिब्रिटी’ बनवण्यापर्यंत आणि सेलेब्रिटीला पुन्हा जमिनीवर आणण्यापर्यंतचे काम इंटरनेट आणि सोशल मीडिया सहज करू शकते.

सध्या एक व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत होता. कोणता तो तुम्हाला समजलाच असेल. हो, तुम्ही जो विचार करत आहात, तो अगदी बरोबर आहे. आम्ही  प्रिया प्रकाश वारेर हिच्या गाण्याबद्दल बोलत आहोत. या गाण्यातील तिच्या २६ सेकंदाच्या व्हिडीओने  मीडियावर नुसता धुमाकूळ घातलेला आहे.  ‘ओरु अदार लव्ह’ या मल्याळम चित्रपटामधील हे एक गाणे आहे. त्यामध्ये हा सीन आहे.

 

priya-prakash-varier-inmarathi

 

या चित्रपटाच्या माध्यमातून ती या मल्याळम चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. पण हा चित्रपट येण्यापूर्वीच ती एवढी लोकप्रिय झाली की, या चित्रपटाचे आता वेगळे प्रमोशन करण्याची गरज दिग्दर्शकाला किंवा निर्मात्याला भासणार नाही, असेच वाटत होते.

एकदा दिवसांमध्येच प्रियाच्या या व्हिडीओने तिच्या फॉलो अर्समध्ये प्रचंड वाढ केली आहे. मोठमोठ्या दिग्गज सेलिब्रिटींना देखील आता ती या लोकप्रियतेमध्ये मागे टाकत चालली होती. फेसबुक सुरु केल्यावर फक्त तीचा व्हिडिओ आणि त्याच्यावर तयार करण्यात आलेले मिम्स हेच काय ते संपूर्ण वॉलवर दिसत होते.

 

priya-prakash-inmarathi
instagram

एका दिवसात एवढे लोकप्रिय होणारे लोक खूप कमी प्रमाणात या जगामध्ये आहेत. हिची व्हिडीओ व्हायरल होताच, कितीतरी सिंगल असलेल्या मुलांच्या क्रश बदलल्या. आज आपण जगातील अशाच काही लोकांबद्दल जाणून घेऊया, जे खूप कमी वेळामध्ये इंटरनेटवर फेमस झाले.

१. ली मिनवेई

 

People's who became famous on internet in short time.Inmarathi
hindustantimes.com

ली मिनवेई हा सिंगापूर विमानतळावरील एक सुरक्षा रक्षक आहे. त्याचे अविश्वसनीय सुंदर दिसणारे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले. त्याच्या सुंदर आणि विलोभनीय दिसण्यामुळे तो इंटरनेटवर खूप कमी काळामध्ये प्रसिद्ध झाला होता. पण दिसायला खरंच खूप सुंदर आणि आकर्षक होता.

२. Zeddie लिटल

 

People's who became famous on internet in short time.Inmarathi1
timenewsfeed.files.wordpress.com

Zeddie लिटल याच्या इंटरनेटवर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे तो प्रसिद्ध झाला होता. तो जेव्हा एका मॅरेथॉनमध्ये धावत होता, त्यावेळी कुणीतरी त्याचे वेगवेगळे फोटो काढून इंटरनेटवर पोस्ट केले आणि काही वेळेतच त्याने खळबळ माजवली होती. काही क्षणातच त्याने या फोटोंमुळे कितीतरी मुलींचे हृदय चोरले होते.

३. ओमर बोरकान अल गाला

 

People's who became famous on internet in short time.Inmarathi2
elpopular.pe

ओमर बोरकान अल गाला हा इंटरनेटकवर प्रसिद्ध होण्यामागे एक अद्वितीय आणि मनोरंजक कथा आहे. त्याच्या सुंदर आणि मोहक दिसण्यामुळे त्याला सौदी अरेबियातून काढून टाकण्यात आले होते आणि ह्याच कारणामुळे तो खूप कमी वेळामध्ये इंटरनेटवर प्रसिद्ध झाला होता.

४. इरविन रँडले

 

People's who became famous on internet in short time.Inmarathi3
nollywoodgists.com

इरविन रँडले हा एक अमेरिकन शिक्षक आणि फॅशन मॉडेल आहे. त्याने त्याच्या पर्सनल सोशल मीडिया अकाउंटवर टाकलेले फोटो व्हायरल गेल्यामुळे तो लोकप्रिय झाला होता. इंटरनेटवर तो त्याच्या स्टायलिश फोटोंमुळे प्रसिद्ध आहे. ज्याच्यामुळे त्याला  ‘मिस्टर स्टिल अवर ग्रैंडमा’ हे शीर्षक मिळाले.

५. पिएत्रो बोसेली 

 

People's who became famous on internet in short time.Inmarathi4
imgur.com

पिएत्रो बोसेली हा एक गणित शिक्षक होता. तो जेव्हा मुलांना शिकवत होता, तेव्हा त्याच्या एक विद्यार्थ्याने त्याचा फोटो काढला आणि पोस्ट केला. याच फोटोवरून तो इंटरनेटवर जबरदस्त फेमस झाला होता. आता त्याने स्वतःचे  यशस्वी मॉडेलिंग करियर घडवले आहे.

६. जेरेमी मेरेक्स 

 

People's who became famous on internet in short time.Inmarathi5
cbsla.files.wordpress.com

जेरेमी मेरेक्स  याला ‘मुगशॉट बॉय’ म्हणून ओळखले जाते. त्याला अटक झाली होती आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील झाली होती. तथापि, त्याचे काही फोटो हे इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते आणि तो खूप कमी वेळामध्ये लोकप्रिय झाला होता. आज जेरेमी मेरेक्स हा एक यशस्वी मॉडेल आहे आणि हे सर्व इंटरनेटमुळे शक्य झाले.

७. सारा सीराईट

 

People's who became famous on internet in short time.Inmarathi6
wordpress.com

सारा सीराईट ही एक ‘मुगशॉट’ कैदी होती. ती तिच्या चांगल्या आणि मोहक दिसण्यामुळे प्रसिद्ध झाली होती. तिच्या चाहत्यांनी तिला ‘Prison Bae’ असे नाव दिले होते.

अशी ही जगातील काही मंडळी अगदी सहजरित्या इंटरनेटवर खूप कमी वेळामध्ये लोकप्रिय झाली होती. त्यांना यासाठी काही वेगळे करण्याची गरज देखील भासली नाही. लोकांमध्ये असलेल्या त्यांच्याबद्दलच्या प्रेमामुळे हे सर्व शक्य झाले.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?