' “या” संकटाला तोंड देण्यासाठी प्रत्येक भारतीयाने तयार राहिले पाहिजे! – InMarathi

“या” संकटाला तोंड देण्यासाठी प्रत्येक भारतीयाने तयार राहिले पाहिजे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

ही घटना आहे २०१८ ची, पण आपण आजही त्यातून काही बोध घेतला आहे का? आधीच दोन महायुद्ध झाली असून तिसरं महायुद्ध हे पाण्याच्या मुद्यावरून होणार असल्याची भाकितं आपण ऐकली असतीलच तरी आपण त्याकडे तितक्या गांभीर्याने बघतोय का?

हे प्रश्न आपण स्वतःला एकदातरी विचारायला हवेत कारण आपल्याला मुबलक पाण्याचा वापर करता येतो म्हणून!

त्यावेळेस भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले जात होते. भारतीय क्रिकेट टीम जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन ह्या ठिकाणी पोहोचली तेव्हा त्यांना तेथे एका विशिष्ट नियमाचे पालन करायला सांगितले गेले.

तो नियम म्हणजे, कुठलाही खेळाडू २ मिनिटांपेक्षा जास्त वेळ अंघोळ करणार नाही!

त्यानंतर अनेक भारतीयांनी ह्या नियमाची खिल्ली देखील उडविली. पण जरा विचार करा, की कुठल्या देशावर अशी परिस्थिती येण्याचे कारण काय असावे जेणेकरून त्यांना अंघोळी संबंधी देखील कायदे बनवावे लागत होते.

 

capetown-inmarathi01
googleusercontent.com

 

पाणी हेच जीवन आहे, हे आपल्याला लहानपणीपासून शिकवले जात आहे. पण तरीही आपण अजूनही यातून काहीही शिकलो आहे असं वाटत नाही. कारण आपण आजही तेवढेच पाणी वाया घालवतो, विनाकारण नळ सुरु ठेवतो. पाण्यचे महत्व हे अजूनही आपल्याला समजलेले दिसत नाही…

पण कदाचित हा लेख वाचून तरी आपले डोळे उघडतील आणि पाणी किती मौल्यवान आहे हे आपल्याला कळेल.

 

capetown-inmarathi04
capetownetc.com

 

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन येथे भीषण कोरडा दुष्काळ पडायची वेळ आली. त्यांच्याकडे पाण्याची एवढी कमतरता झाली की, अंघोळ आणि शौचालयात फ्लश करण्यासाठी देखील तिथल्या सरकारला कायदे बनवावे लागले.

खाली दिलेल्या फोटोज वरून तुम्हाला तिथे सध्या काय परिस्थिती आहे याची जाणीव नक्की होईल.

 

south africa drought 2 inmarathi
phys.org

 

केपटाऊन येथे तेंव्हाच्या परिस्थितीत पाणी संपण्याचे संकेत दिसू लागले. तेतेह जलवायू परिवर्तनमुळे तीन वर्षांपासून दुष्काळ पडला होता. त्यामुळे तिथे पाण्याची खूप कमतरता भासू लागली.

आता येथे एका दिवसाकरिता ४५० मिलियन एवढच पाणी वापरता येईल असे नियम आखण्यात आले आहेत. आणि जर का ही मर्यादा पार झाली तर ‘डे झीरो’ लागू करण्यात येणार आहे.

 

south africa drought inmarathi
phys.org

 

‘डे झीरो’ही पाणी वाचविण्याची एक पद्धती आहे. ज्यात पाणी वाचविण्याच्या अनुषंगाने जवळपास ७५ % घरांच्या पाण्याची सप्लाय बंद करण्यात येईल. ज्यामुळे जवळजवळ १० लाखहून अधिक घरांना पाणी मिळणार नाही. ‘डे झीरो’ मध्ये हॉस्पिटल आणि शाळांना सुट देण्यात आली आहे.

 

capetown-inmarathi0102
timeslive.co.za

 

या दरम्यान शहरात २०० वॉटर कनेक्शन पॉइंट बनविण्यात येईल. जिथून प्रत्येक व्यक्ती केवळ २५ लिटर पाणी भरू शकतो. कनेक्शन वर पाण्यासाठी मारामारी होऊ नये म्हणून तिथे पोलीस आणि सेनेचे जवान देखील राहणार आहेत.

 

Saving-Water inmarathi
letsolo

 

पाणी वाचविण्याच्या अनुषंगाने येथे फेब्रुवारी महिन्यात प्रती व्यक्ती पाणी खर्च करण्याची देखील एक सीमा आखण्यात आली आहे. ज्यानुसार एक व्यक्ती एका दिवसाला ८७ ते ५० लिटर पाणी खर्च करू शकतो.

 

day zero inmarathi
national post

 

तसेच येथे लोकांना असाही सल्ला देण्यात आला की, त्यांनी टॉयलेटमध्ये फ्लश करण्यासाठी टाकी चा वापर करू नये, कमीत कमी पाणी सोडावे. तसेच एका आठवड्यात दोनपेक्षा जास्त वेळ अंघोळ न करण्याचा सल्ला देखील देण्यात आला होता.

१९७७ सालानंतर केप टाऊन येथे दरवर्षी ५०८ मिलीमीटर एवढ्याच पावसाची नोंद करण्यात आली आहे. पण मागील पाच वर्षांत येथे केवळ १५३ मिमी, २२१ मिमी, ३२७ मिमी पाऊस झाला आहे. जे अतिशय चिंताजनक आहे.

 

capetown-inmarathi06
enca.com

 

पाऊस कमी झाल्याने मागील पाच वर्षात येथील शेतीवर देखील याचा मोठा परिणाम झाला आहे. येथे पाण्याची एवढी कमतरता झाली आहे की, सध्या येथे समुद्राचं पाणी फिल्टर करून वापरण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एवढच नाही तर त्यांचा नाल्यातील पाणी देखील साफ करून वापरण्याचा विचार आहे.

आता या सगळ्या चित्रावरून आपण सुद्धा असे काही मार्ग अवलंबले पाहिजेत ज्याणेकरून पाण्याचा अपव्यव हा कमीत कमी होईल आणि आपल्या पुढच्या पिढीला पाण्याच्या समस्या भोगाव्या लागणार नाहीत!

 

water inmarathi
sika ireland

 

आज केपटाऊन ची अशी परिस्थिती आहे. ती आपल्यावर ओढ्विण्यापर्यंत आपण वाट बघणार आहोत का? आताही वेळ गेलेली नाही, जर आपलं केप टाऊन होण्यापासून वाचवायचं असेल तर पाण्याची बचत आणि पुनर्वापर करायला शिका.

पाणी आहे म्हणून जीवन आहे आणि जीवन आहे म्हणून आपण आहोत… हे विसरता कामा नये…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?