' रामसेतूच्या निर्माणाची ग्वाही देणारं ठिकाण आज भुताटकीने पछाडलेलं आहे – InMarathi

रामसेतूच्या निर्माणाची ग्वाही देणारं ठिकाण आज भुताटकीने पछाडलेलं आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रत्येक शहराचा आणि देशाचा स्वतःचा असा इतिहास असतो. जसा आपल्या देशाला आहे. अगदी रामायण महाभारत काळापासून ते अलीकडचा म्हणजे आधुनिक काळापर्यंतचा असा आपला व्यापक इतिहास आहे. आपल्या देशातील अनेक शहरांचा गावांचा उल्लेख देखील ह्या ऐतिहासिक ग्रंथांमध्ये आढळतो.

 

dhanushkodi-inmarathi05

 

असेच एक शहर आहे ‘धनुषकोडी’ ज्याचा संबंध रामायणाशी आहे. दक्षिण भारतातील ह्या शहराचा उल्लेख रामायणात सापडतो. अनेक वर्षांपर्यंत येथे लोकवस्ती देखील होती. पण काही वर्षांआधी अचानकपणे आलेल्या एका वादळाने ह्या शहराचे अस्तित्वच पुसून टाकले.

कधी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेले हे शहर आज निर्मनुष्य रान बनले आहे.

 

dhanushkodi-inmarathi

 

धनुषकोडी हे शहर रामेश्वरम जिल्ह्यातील पम्बन द्वीपच्या दक्षिण-पूर्व किनाऱ्यावर आहे. रामेश्वरम येथून हे १५ किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर श्रीलंकेच्या तलाईमन्नार येथून हे २९ किलोमीटर दूर आहे.

 

dhanushkodi-inmarathi04

 

ही भारत आणि श्रीलंकेमधील एकमेव जमिनीवरची सीमा आहे. हा परिसर केवळ ४५ मीटरच्या क्षेत्रात पसरलेला असून जगातील सर्वात छोट्या सीमावर्ती ठिकाणांमध्ये ह्याचा समावेश होतो.

 

dhanushkodi-inmarathi03

 

पौराणिक कथांनुसार धनुषकोडी ह्या ठिकाणाचा उल्लेख रामायणात आढळतो. हे तेच ठिकाण आहे जिथून भगवान रामाने लंकेपर्यंतचा प्रवास करण्यासाठी रामसेतू बनविला होता. जो आजही येथे आहे. म्हणूनच हिंदू लोक ह्या ठिकाणाला एक धार्मिक स्थान म्हणून बघतात.

 

dhanushkodi-inmarathi07

 

भगवान रामाने रामेश्वरम ते लंका हे अंतर पार करण्यासाठी पुलाचे बांधकाम केले. तेव्हा त्यांनी आपल्या धनुष्याने ह्या पुलाची सुरवात करण्यासाठी येथे खूण केली होती. म्हणूनच ह्या ठिकाणाला धनुषकोडी हे नाव पडलं. धनुष्याचा शेवट असा ह्याचा अर्थ होतो.

२२ डिसेंबर १९६४ च्या रात्री ह्या ठिकाणी २० किलोमीटर/तासच्या वेगाने एक भानायक चक्रीवादळ आले. ह्यामुळे समुद्रात २० फुट उंच लाटा उसळल्या. पम्बन-धनुषकोडी पैसेंजर ट्रेन ह्यात वाहून गेली होती. ह्या दुर्घटनेत ११५ प्रवाश्यांचा मृत्यू झाला होता.

 

dhanushkodi-inmarathi02

 

यात भारत आणि पम्बन द्वीपला जोडणारा पम्बन पूल देखील वाहून गेला. ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे धनुषकोडी येथील ८०० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. ह्या भयानक चक्रीवादळाने संपूर्ण धनुषकोडीचे अस्तित्व समुद्राने गिळंकृत केले.

 

dhanushkodi-inmarathi06

 

हे चक्रीवादळ येण्याआधी धनुषकोडी येथे रेल्वे स्टेशन, श्रीलंकेला जाण्यासाठी फेरी सुविधा, मंदिर, धर्मशाळा, पोस्ट ऑफिस, रुग्णालय इत्यादी सर्व सुविधा होत्या.

 

dhanushkodi-inmarathi08

 

आता भलेही हे शहर कोणाच्या राहण्यायोग्य नसलं, तरी देखील काही हौशी पर्यटक आजही ह्या ठिकाणी भेट देतात. पण सायंकाळ नंतर येथे कोणीही थांबत नाही. मद्रास सरकारने ह्या ठिकाणाला घोस्ट टाऊन म्हणू घोषित केले आहे.

१९६४ च्या चक्रीवादळाआधी ‘बोट मेल एक्सप्रेस’ ही चेन्नई येथून एग्मोर व्हाया धनुषकोडी पर्यंत यायची. पण १९६४ मध्ये पम्बन ते धनुषकोडी पर्यंतची मीटर-गेज ब्रांच लाइन पूर्णपणे नष्ट झाली.

 

dhanushkodi-inmarathi01

 

जर आज आपण येथे जायचा विचार केला तर आपल्याला येथे केवळ ह्या शहराच्या उध्वस्ततेचे काही उर्वरित अवशेष बघायला मिळतील. पण येथे लावण्यात आलेल्या होर्डिग्सवर तुम्हाला ह्या शहराच्या उध्वस्त होण्याआधीचे काही चित्र देखील दिसतील.

असे हे पौराणिक शहर आज मद्रास सरकारने घोषित केलेले भूतांचे शहर म्हणून ओळखले जात आहे… हे खरंच ह्या शहराचं दुर्दैव आहे.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?