' तमिळनाडूने चक्क स्वीडन आणि डेन्मार्कला मागे टाकलंय, विकासाच्या एका मोठ्या टप्प्यावर!

तमिळनाडूने चक्क स्वीडन आणि डेन्मार्कला मागे टाकलंय, विकासाच्या एका मोठ्या टप्प्यावर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आज वीज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून गेलेली आहे. आज बहुतेक उपकरणे ही विजेवर चालतात. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वीज उपलब्ध करून देणे गरजेचे असते.

एवढेच काय, आपल्या देशातील रेल्वेदेखील विजेवरच चालते. त्यामुळे आज विजेची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे.

पवन हा वीजनिर्मिती करण्याचा फायदेशीर आणि पारंपारिक स्रोत आहे.

वीज ही पाण्यापासून, हवेपासून आणि कोळशापासून तयार करण्यात येते. भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात औष्णिक वीजनिर्मिती केली जाते.

भारताच्या तामिळनाडू या राज्याचे पवनऊर्जा निर्मिती क्षेत्र जगातील सर्वात अग्रणी क्षेत्र बनण्याकडे चाल करत आहे. पण हा पल्ला गाठण्यासाठी त्याला खूप आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.

 

wind-energy-inmarathi
bcdn.newshunt.com

अमेरिकेमध्ये असलेल्या इंस्टिट्यूट ऑफ एनर्जी इकॉनोमिक्स एंड फ़ाइनेंशियल एनेलिसिसच्या रिपोर्टनुसार, हा अंदाज लावण्यात आलॆला आहे की, २०२७ पर्यंत तामिळनाडूमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त ऊर्जेचे उत्पादन शून्य उत्सर्जन तंत्रज्ञानाने म्हणजेच विंड पॉवर आणि सौर ऊर्जेच्या सहाय्याने होऊ लागेल.

या अमेरीकास्थित प्रसिद्ध संस्थेचा संपूर्ण रिपोर्ट येथे वाचा.

सध्या तामिळनाडूकडे  ७.८५ गेगाव्हॅट पवन ऊर्जेची क्षमता आहे. ही क्षमता डेन्मार्क आणि स्वीडनपेक्षा जास्त आहे.

पण रिपोर्टनुसार, हा आकडा येणाऱ्या काळामध्ये डबल होईल. त्याचबरोबर सौर ऊर्जेच्या आकड्यामध्ये देखील कमालीची वाढ होईल आणि तो १३.५  गेगाव्हॅट पोहोचण्याची शक्यता आहे.

जर हा अंदाज बरोबर ठरला तर तामिळनाडू एकूण ऊर्जेच्या क्षमतेमधील ६७ टक्के भाग परत उपयोगात आणता येणाऱ्या ऊर्जेमध्ये होईल.

 

 

याचा अर्थ निघतो की, यातून राज्याला आपले कर्ज कमी करण्यामध्ये खूप मदत मिळेल. पण या ऊर्जेचा उपयोग करण्याच्या आधी तामिळनाडूला आपल्या पॉवर सेक्टरमध्ये मोठे बदल करण्याची गरज आहे.

तामिळनाडूची लोकसंख्या ही ऑस्ट्रेलियापेक्षा तीनपट जास्त आहे. तसेच त्याचे दरडोई उत्पन्न हे श्रीलंका आणि युक्रेनच्या जवळपास आहे.

एका अंदाजानुसार तामिळनाडूची जीडीपी वर्षाला सात टक्क्यांच्या दराने वाढेल. या वाढीमध्ये अक्षय ऊर्जा (रिन्यूएबल एनर्जी) एक महत्त्वाचे योगदान देईल.

पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेचा प्लांट पूर्णपणे स्थापित करणे आणि त्यांना उपयोगात आणण्यामध्ये जो खर्च होईल, तो कोळशापासून तयार होणाऱ्या ऊर्जेपेक्षा जास्त नसेल.

पण रिपोर्ट हे देखील सांगते की, तामिळनाडूला कोळसा आणि अणू ऊर्जेची आवश्यकता देखील राहील. त्यामुळे या योजनेमुळे राज्यावर आर्थिक भार देखील पडेल.

 

hs-heilbronn.de

नवीन कोळश्याच्या पॉवर प्लांटपासून वीज निर्मिती करण्याचा खर्च सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जेच्या डबल आहे.

निराशाजनक आर्थिक परिस्थितीतही २२.५ गेगाव्हॅट ऊर्जा कोळशाच्या पॉवर प्लांटची योजना आता चालू आहे.

असे असताना पारंपारिक उर्जेचे स्रोत वापरून उर्जेच्या बाबतीत सक्षम होत तामिळनाडू सारख्या राज्याने इतर राज्यांसाठी आदर्श घालून दिला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “तमिळनाडूने चक्क स्वीडन आणि डेन्मार्कला मागे टाकलंय, विकासाच्या एका मोठ्या टप्प्यावर!

  • March 9, 2018 at 6:47 pm
    Permalink

    लेख छान आहे परंतु थोडी सौर ऊर्जा तंत्रज्ञान बद्दल माहिती व आकडे हवे होते…

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?