' महादेव वाघाचं कातडं का परिधान करतात? शिवपुराणातील एक रोचक कथा! – InMarathi

महादेव वाघाचं कातडं का परिधान करतात? शिवपुराणातील एक रोचक कथा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विश्वाचे कर्ता-धर्ता, सर्वशक्तिमान, ब्रम्हांडाचे रचेता शिवशंकर, भोलेनाथ, महादेव ह्यांची मनोभावे आराधना केली जाते. भारतातल्या सगळ्याच राज्यात शिवशंकराचे भक्त आढळतात. मग ते महाराष्ट्र असो वा उत्तर प्रदेश.

महाशिवरात्रीला प्रत्येक राज्यात साजरा केला जाणारा उत्सव हा नेत्रदिपक असतो. महादेवाची पुजा, नैवेद्य, रात्रभर चालणारा उत्सव, मंदिरापुढे लागलेली लांब रांग, भोलेनाथाचा गजर…

 

महाशिवरात्रीच्या उत्सावाचा हा अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच हवा. मात्र ही आराधना केवळ एकाच दिवसापुरती नव्हे तर वर्षाच्या प्रत्येक दिवशी केली जाते.

देशभरात असलेली शंकराची मंदिरं पाहण्यासाठी पर्यटकही गर्दी करतात.

 

mahadev-inmarathi01

तेहतीस कोटी देवांमध्ये प्रत्येकाचे स्वतंत्र वैशिष्ठ्य आहे हे नक्की. मात्र महादेवाची प्रतिमा कायमच भक्तांना भुरळ घालते.

महादेवाचे रुप, पोषाख, कधी हास्य तर कधी तांडव या सगळ्याच गोष्टी भक्तांना नेहमीच आकर्षित करतात. महादेवाच्या कथां ऐकूनच आपण प्रभावित होतो.

 

mahadev-inmarathi03

 

महादेव हे इतर देवांपेक्षा खूप वेगळे आहेत. त्यांना नाही सुरवात आहे नाही अंत, ते अनादी-अनंत असे आहेत.

इतर देव हे स्वर्गात वास करतात, तर शिव हे हिमालयातील बर्फाच्या डोंगररांगात राहतात. हातात त्रिशूळ, गळ्यात साप, डोक्यावर गंगा आणि अंगात वाघाचं कातड…अशी आहे शिवाची वेशभूषा.

 

mahadev-inmarathi07

पण तुम्ही कधी विचार केला आहे की, महादेव हे नेहेमी वाघाचं कातड का घालत असतील. हा प्रश्न अनेकांना पडतो, घरात तो थोरामोठ्यांना विचारलाही जातो.

मात्र तुम्हाला त्याचं ठोस कारण माहित आहे का? याच उत्तर नाही असं असेल, तर अनेकवर्षांपासून तुम्हाला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर आज सापडणार आहे.

तर ह्यामागेदेखील एक कहाणी आहे. शिव पुराणानुसार एकदा महादेव दाट जंगलात नग्न अवस्थेत भटकत होते. फिरता फिरता ते जंगलात वसलेल्या एका गावात जाऊन पोहोचले.

त्यांना असं नग्न अवस्थेत बघून गावातील सर्व स्त्रिया त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागल्या. पण शंकरजी तर आहेतच भोळे. त्यांना ही गोष्ट कळाली नाही आणि ते गावात तसेच फिरत राहिले.

 

mahadev-inmarathi02

मात्र त्यांची अशी वागणूक त्या गावातील साधू-संतांना पटली नाही, ते शिवजींवर संतापले. कारण अद्याप त्यांनी महादेवाला ओळखले नव्हते.

कोण ही व्यक्ती आपल्या गावात नग्नरुपात फिरतीय? अशी चर्चा सुरु झाली. त्यातच गावातील स्त्रिया त्यांच्यावर भाळल्याने तर समस्त पुरुष मंडळींना तर त्यांच्यावरचा राग असह्य झाला.

आपल्या गावात आलेल्या या व्यक्तीला त्यांनी धडा शिकविण्याचा निश्चय केला. अर्थातच याबद्दल भगवान शंकरांना काहीच कल्पना नव्हती.

त्यांनी महादेवाच्या रस्त्यात एक खड्डा खणला. शंकरजी आपल्याच विचारात मग्न असल्याने त्यांना तो खड्डा दिसला नाही आणि चालता चालता शिवजी त्यात पडले,

एवढं होवूनही साधुंचा राग शांत झाला नाही. त्यानंतर साधूंनी त्या खड्ड्यात एक वाघ सोडला. पण त्यांना नव्हते माहित की आपण ज्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांनीच ह्या सृष्टीचे निर्माण केले आहे.

महादेवांनी काही क्षणातच त्या वाघाला मारले आणि त्याचे कातडे परिधान केले.

 

mahadev-inmarathi

 

शिवजीचे हे रूप बघून त्या साधू-संतांना कळून चुकले होते की आपण ज्या मान्युष्याला मारण्याचा प्रयत्न करत होतो, तो कुठला साधारण मनुष्य नसून साक्षात भगवान शिवशंकर आहे.

 

mahadev-inmarathi04

 

वाघाच्या कातडीला अश्या प्रकारे परिधान करणे हे विजयाचे प्रतिक बनलं आणि ते कातडीसोबतंच हे नातं नेहमी करिता आपल्या शंकरजीसोबत जुळलं.

महादेव, शिवशंकर ह्यांच्यासंबंधी शिवपुराणात अनेक कथा-कहाण्या आहेत. त्यापैकीच ही एक!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?