' डोळा मारणारी “प्रिया”, एक मार्केटिंग ट्रिक! – InMarathi

डोळा मारणारी “प्रिया”, एक मार्केटिंग ट्रिक!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लेखक – ओंकार कामत

===

काल पासून एक डोळा मारणाऱ्या मुलीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. निरागसता, त्यांची केमिस्ट्री, अभिनय सगळं चांगलं आहे अगदी आवडण्यासारखं. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, वायरल मार्केटिंग सगळं पोरींन एका दमात करून दाखवलं. काल तिचे साडे चार लाख फॉलोवर झाले इन्स्टाग्राम वर, आज ७ लाख आहेत. दोन दिवसात १०-१२ लाख होतील. यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.

 

instagram

जिथं धिंचाक पूजा आणि दिपक कलाल सारख्याना एवढा डोक्यावर घेतात तिथं एका अभिनेत्रीला ती फेम मिळणं यात नवल नाही.

आयुष्याचा कुठला दिवस तिथून पुढचं आयुष्य बदलेल हे सांगता येत नाही. पण मी ही गोष्ट सुद्धा नशीबावरती नेणार नाही. ही वेळे येण्यासाठी तिने किती कष्ट घेतले असतील, तिचं किती डेडिकेशन आहे कामासाठी हे माहीत नसताना नशीबावरती ही गोष्ट नेली तर त्या कष्टाचा अपमान होईल. बाकी फेसबुक इन्स्टाग्राम हे ह्या साठीच आहे. ह्यावरून क्रांती होईल, अवेअरनेस येईल (अपवाद वगळता) काय तरी वेगळा घडेल असं समजणारे माझ्या सारखे मूर्ख थोडे दिवसात शहाणे होतील, सुधारतील.

फेसबुक हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे, बदल घडवण्याचं नव्हे. आपले विचार फक्त मांडत राहावं, लोकांना विचार करायला प्रवृत्त करणे ही खूप महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. ती फेसबुक वरून थोड्या प्रमाणात होते.

एक पूर्ण रिकामा तरुण वर्ग ज्याच्या कडे सध्या कुठली दंगल नाही किंवा सिनेमा बंद पडायला नाही किंवा येणारी निवडणूक नाही जिथं त्याचा वेळ जाईल व दिवसभर काम करून थकून घरी येऊन थोडं मनोरंजन हवं असलेला वर्ग, ह्या दोन वर्गांना मी फेसबुकचा ग्राहक समजतो.

 

facebook-inmarathi
userscontent2.emaze.com

हे दोन्ही वर्ग बदलात सक्रिय होऊ शकत नाहीत, एक इच्छा नाही म्हणून आणि एक वेळ नाही म्हणून. असो, थोडक्यात गोष्ट व्हायरल होणं ह्यात आश्चर्य काही नाही हे सांगत होतो.

सोशल नेटवर्किंगचा कायम समाजाच्या अनेक थरांनी त्यांच्या सोयीनुसार गैरवापर केलाय. मग तो राजकीय पक्षांच्या दुसऱ्यांच्या निगेटिव्ह मार्केटिंगसाठी केला असेल किंवा एखादी संघटना बांधण्यात केला असेल किंवा एखादी दंगल भडकवण्यात केला असेल किंवा कॅज्युअल डेटिंग, हुकप वैगेरे वैगेरे.

तसाच एक अजून गैरवापर, आज त्या मुलीचे ११८ इन्स्टाग्राम अकाउंट मी बघितले, कदाचित त्या पेक्षा जास्त असतील. काल मी मित्राला बोललो होतो हिचे फेक अकाउंट येणार पण इतके येतील याची कल्पना नव्हती. त्यातले १०-१२ तर ऑफिशियल  म्हणून आहेत.

एका मल्याळी चित्रपटातील गाण्यात हा झक्कास अभिनय या मुलीने केला आहे.

दोन दिवसात ह्यातले बरेच अकाउंट हजारो फोल्लोवर्स मिळवणार. नंतर ह्याच अकाउंट वरून तिचे फोटो डिलिट करून, अकाउंटचे नाव बदलून ते विकले जाणार.

कविता, फोटोग्राफी, नवीन फूड शॉप वैगेरे अशी अकाउंट विकत घेतात कारण आधीपासून फोल्लोवर्स असले की त्यांना मार्केटिंग आणि ब्रँडिंगला फायदा होतो. ही एक पैसे मिळवायची पद्धत आहे. लोकांना सध्या जी गोष्ट बघायची आहे, ती गोष्ट त्यांना दाखवायची. म्हणून वाटलं पोरींन मार्केटिंगलाच डोळा मारला.

आता हा पैसा कुणाचा, कुणी दिला आणि का दिला. तर हा पैसा आपलाच आहे किंवा इथं पैसा म्हणजेच आपण आहोत. आपण एखाद्या दुकानात जाऊन एखादी गोष्ट विकत घेतो, तेव्हा आपण त्या वस्तूच्या मुल्याएवढे पैसे देतो. आज अकाउंट विकत घेणाऱ्याला त्या बदल्यात काय मिळणार आहे, तर आपला वेळ आणि डेटा.

भविष्यात सोन्या चांदी पेक्षा जास्त किंमत ही डेटा म्हणजे ‘आपली माहिती’ असणार.

जेव्हा आपण कुठली तरी गोष्ट उपभोगतो आणि त्या बदल्यात काही देत नाही तेव्हा आपण त्याच्या साठी प्रॉडक्ट असतो. त्यामुळे सोशल नेटवर्किंग फुकट वापरतो हा आपला गैरसमज आहे. बाकी आपला बहुमूल्य वेळ ज्याची आपल्याला किंमत कळली नाही. त्यामुळे आपल्या खिशातला गेला असला तरी आपल्याला जाणवला नाही, म्हणून आपल्याला दुःख नाही.

तिच्या फेसबुक पेज वरती, मी आज मेलो तरी चालेल कारण आज मी स्वर्ग बघितला वैगेरे रिव्हिव वाचले. खूप जणांची आज ती क्रश झाली, कुणाची वहिनी झाली, कुणी झाकीर खानच्या भाषेत “सख्त लौंडा” झाले.

 

thelastbencherz.com

झाकीर खानने सुद्धा आज पोस्ट केली की जे गद्दार होते ते निघून गेले सक्त लोंडा अजून तसाच आहे. सांगण्याचा उद्देश की खूप जणांनी झाल्या गोष्टींची दखल घेतली. असो, तिच्या प्रेमात पडलेले लोकं मला आवडले. पण याचं समाजानं आज त्यांच्या विचारांच्या दोन बाजू मांडल्या.

आपण व्हॅलेंटाईन डे ला होणारा विरोध बघतचं आहोत. अश्या वेळी एक व्हिडिओ पसरतो आणि लोकं भरभरून प्रेम करतात. ते प्रेम व्यक्त करायला कविता करतात, चित्र काढतात आणि जमेल त्या कलेने व्यक्त होतात. आपल्याला एखादी गोष्ट आवडते आणि आपण त्याच्या प्रेमात पडतो. मला ताजमहाल, ऐतिहासिक वास्तू आवडतात. मी त्याच्या सुद्धा प्रेमात पडतो म्हणून मी तिथंच राहणार नाही ते आवडते म्हणून! असचं एक निरागस चेहरा आणि त्यावरचे बोलके भाव याच्या प्रेमात सर्व वयाचे लोक पडले.

मी एकही पोस्ट नाही बघितली ज्यामध्ये ह्या प्रसंगाला कोणीतरी चूक म्हणतय किंवा मुलगी अशी करत आहे म्हणून चिंता व्यक्त करतंय.

मी माझ्या गर्लफ्रेंडला म्हणालो, “मस्त दिसते ना ती” तर तिने पण एन्जॉय केला प्रसंग. आपण प्रेम एवढं निखळ, निर्मळ, निस्वार्थी, निरागस आणि लिबरल ठेवून प्रेमाला विरोध करणाऱ्यांना एक प्रकारचा विरोध दर्शविला.

आपल्याला दोन प्रकारचे प्रेम होत असतात. एक व्यक्ती म्हणून जे मी माझ्या प्रेयसीवर प्रेम करतो, आणि दुसरं म्हणजे मला कुणाचे काही गुण आवडतात ज्यांच्या मी प्रेमात पडतो.

इथं वय, जेंडर वैगेरे येत नाही, जसं मी ताजमहालच्या प्रेमात पडलो तसंच ह्या मुलीच्या सुद्धा पडलो. खरं सांगायचं तर अजून एक ‘आम्ही ढोलकर’चं गाणं व्हायरल झालंय, ते पण दोन दिवसात खूप लाईक्स घेईल. तिच्या आवाजाच्या प्रेमात पडलो. असंच आयुष्य आहे, हे क्षण जगताना संस्कृतीचं ओझं वाटता कामा नये. समाज बदलत असतो आणि तो असावा.

 

hindustantimes.com

आज पुरुष धोतर किंवा स्त्रिया नऊ वारी नाही ना नेसत रोज. उद्या ह्यामुळे पण कुणालातरी संस्कृती धोक्यात आहे असं वाटेल. पण बदल ही कायम होत राहणारी गोष्ट आहे आणि ती सर्व बाबतीत होते आणि व्हावी सुद्धा.

ह्याच समाजानं अजून एक बाजू दाखवली. तिच्या जुन्या फोटो बरोबर नवीन फोटो व्हायरल करून, अजून सुद्धा आवडली का, असा अर्थ निघत होता त्यातून. समजा आपल्या सगळ्यांची बुद्धी गेली, एकदम विचारांची कोरी पाटी झाली किंवा कोणता तरी असा एखादा ग्रह असेल जिथं एखादी काळी, कुरूप, जाड, टकली व्यक्ती त्यांची ब्युटी आयकॉन असेल. सुंदरता म्हणजे गोरा असणं किंवा अश्या बऱ्याच गोष्टीमध्ये का मोजता.

 

priya-p-inmarathi
youtube.com

तिची कला आवडली, हावभाव आवडले तर करा प्रेम एकदम अभिमानानं, कशाला आत लपलेला रेसिस्ट बाहेर काढायचा. आज जसं नॉर्थ-साऊथ न बघता तिच्या वरती प्रेम केला तसंच जात, धर्म, भाषा, राज्य नबघता प्रेम करत रहा. प्रेमासारख्या पवित्र गोष्टीला मानवनिर्मित निरर्थक संकल्पनेत जखडू नका.

बाकी दोन समाजाच्या बाजूनी हे पुन्हा सिद्ध होतंय की खांद्यावरती घेऊन नाचणारे पण आपणच आहोत आणि जोरात खाली अपटवणारे पण आपणच आहोत.

असो, अश्या खूप गोष्टी आहेत. अजून खूप बोलता येईल. सध्या डोळा मारताना तिला बघू. शब्द काय बोलणार, आँखे उससे ज्यादा बाते करती है.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात.आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?