तुम्ही मनापासून प्रेम करता, ती व्यक्ती खरंच त्या लायक आहे? १० कसोट्यांवर तपासा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

जेव्हा आपण कोणाला डेट करत असतो तेव्हा जर आपला पार्टनरही समजूतदार असेल तर ठीक नाहीतर अश्या प्रकारचे नाते जास्त काळ टिकू शकत नाही, किंवा त्याला टिकविण्यासाठी खूप तडजोड करावी लागते. मग अश्यात आपल्याला आपल्या नात्यात जे समाधान मिळायला हवे ते मिळत नाही. त्यातून, राग, भांडण ह्यासारख्या गोष्टी घडतात. पण तुम्ही ज्या मुलीवर/मुलावर प्रेम करत आहात ती व्यक्ती खरच तुमची लाइफ पार्टनर बनण्यायोग्य आहे का? हेही तेवढंच महत्वाचं.

म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी काही अश्या कसोट्या सांगणार आहोत, ज्या कसोट्यांवर तपासून तुम्ही हे जाणून घेऊ शकता की तुम्ही प्रेम करत असलेली व्यक्ती ही तुमच्यासाठी बेस्ट आहे की नाही…

१. ती व्यक्ती तुम्हाला नेहमी तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करत राहील. ती तुम्हाला कधीही कुठली गोष्ट करण्यसाठी फोर्स करणार नाही कारण तिला तुमच्यावर विश्वास असेल की तुम्ही स्वतः स्वतःसाठी निर्णय घेऊ शकता.

 

best girlfriend-inmarathi
wikihow.com

 

२. ती तुमच्यात मत्सर जागृत करण्यासाठी कुठलेही बालिश प्रयत्न करणार नाही. तिला तुमच्या आणि तिच्या नात्या संबंधी कुठलीही असुरक्षितता नसेल. तिला माहित असेल की ती तुमच्यासाठी काय आहे, आणि तिला ते सिद्ध करण्याची काही एक गरज नाही.

 

best girlfriend-inmarathi01
huffingtonpost.in

 

३. ती तुम्हाला कधीही असं दाखवणार नाही की, तुमच्या जीवनात तिच्याशिवाय अजून काहीच नाहीये. तिला केवळ तुमच्याकडून प्रेम आणि आदर हवा असेल, जो तीही तुम्हाला देईल. तिला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या इच्छा-आकांक्षांना बाजूला सारावे असं तिला कधीही वाटणार नाही.

 

best girlfriend-inmarathi02
askmen.com

 

४. तिला तुम्ही २४ तास तिच्याजवळच राहायला हवे असे वाटणार नाही. ती समजते की तुम्ही दोघेही वेगवेगळे आहात आणि तुम्हा दोघांचेही वेगेवेगळे जीवन आहे. त्यामुळे ती तुम्हाला कधी रिलेशनशिप मध्ये बंदिस्त करून ठेवणार नाही.

 

best girlfriend-inmarathi04
shutterstock.com

 

५. जेव्हा तुम्ही तिला तुमच्या मित्रमंडळी किंवा कुटुंबाला भेट करून देत असाल तेव्हा तुम्हाला काळजी वाटणार नाही. तुम्हाला माहित आहे की ती लोकांसमोर स्वतःला व्यवस्थित रीप्रेझेंट करू शकते. ती एवढी सुज्ञ आहे, की कोणाबरोबर कुठल्या विषयावर बोलायचे, कसे वागायचे हे तिला कळते.

 

best girlfriend-inmarathi03
sarcasm.co

 

६. ती स्वतःची काळजी घेऊ शकते. तिला कधीही कुठली अशी रिलेशनशिप नको असते जिथे ती शारीरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या कोणावर अवलंबून राहील. तर तिला एक अशी रिलेशनशिप हवी असेल ज्यात ती तुमची सोबत अनुभवू शकेल, आर्थिक जबाबदारी वाटू शकेल. जी आपल्या सोबतच्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचे बर्डन येऊ देणार नाही.

 

best girlfriend-inmarathi05
moneyunder30.com

 

७. बेडरूममध्ये ती कधीही लाजणार नाही. जर तिला कुठली गोष्ट पटत नसेल किंवा तिला ती करायची नसेल तर ती सरळ सरळ सांगेल. असहज परिस्थतीत काही न बोलता ते सहन करण्यापेक्षा ती त्यासबंधी स्पष्ट बोलणे पसंत करेल. ती एवढी समजूतदार असेल की रिलेशनशिपमध्ये ह्या गोष्टी समजून घेईल, त्यात काहीही वाईट नाही हे तिला माहित असेल. आणि ती नेहमी तुमच्यातलं प्रेम कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करेल.

 

 best-girlfriend-inmarathi06
greatist.com

 

८. कुठल्याही विषयावर तिचे स्पष्ट मत असेल. वाद टाळण्यासाठी किंवा प्रत्येकाला खुश ठेवण्यासाठी ती कधीही स्वतःला कमी दाखवणार नाही. पण याचा अर्थ हा मुळीच नाही की ती तिची मतं तुमच्यावर लादेल. ती चर्चा नक्की करेल पण त्या चर्चेदरम्यान असहमती झाल्यास त्याचे रुपांतर भांडणात होऊ देणार नाही.

 

best girlfriend-inmarathi07
mensxp.com

 

९. ती स्वतःच्या आयुष्याबाबत आणि तिच्या आकांक्षांबाबत अगदी स्पष्ट असेल. तिचे स्वतःचे काही ध्येय आणि ठोकताळे ठरवलेले असतात. आणि काहीही झाले तरी ती त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते.

 

best girlfriend-inmarathi08
insuranceup.it

 

१०. तुम्ही तिच्या सोबत असताना जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही ह्या जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहात, कारण ती इतर मुलींसारखी कुठल्याही मुलासोबत रिलेशनशिप मध्ये राहणारी नाही – तर तिचे स्वतःचे स्वतंत्र असे अस्तित्व आहे. ती स्वतः एकटी देखील राहू शकते, पण तरी ती तुमच्यासोबत आहे. म्हणजेच तिला तुम्ही आवडता, तिने तिच्या जीवनात तुम्हाला एक महत्वाचे स्थान दिले आहे.

 

best girlfriend-inmarathi09
bollywoodlife.com

 

भलेही ह्या सर्व क्वॉलिटीज तुम्हाला एकाच व्यक्तीच्या ठायी मिळणार नाहीत. पण प्रत्येक व्यक्तीत ह्यापैकी कुठली ना कुठली क्वॉलिटी नक्की असेल. त्यामुळे तुम्ही तिच्यातले काही वाईट गुण वगळता तिच्या चांगल्या गुणांकडे लक्ष द्या… कारण तीही तेच करते. असे केले तर नक्कीच तुमचे नाते टिकेल आणि तुम्ही तुमच्या साथीदारासोबत एक सुखी आणि समाधानी जीवन जगू शकाल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “तुम्ही मनापासून प्रेम करता, ती व्यक्ती खरंच त्या लायक आहे? १० कसोट्यांवर तपासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?