' २०० लोकांच्या हत्येला 'हा' कुख्यात गुन्हेगार होता कारणीभूत - वाचा त्याचा प्रवास!

२०० लोकांच्या हत्येला ‘हा’ कुख्यात गुन्हेगार होता कारणीभूत – वाचा त्याचा प्रवास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

गुन्हेगारीच्या कथांनी आपल्या गप्पांचा भाग व्यापलेला असतो. अनेक गुन्हेगारांच्या सुरस कथा सांगण्यात अनेक लोक पारंगत असतात. त्याची गुन्हे करण्याची पद्धत, चित्तथरारक पाठलाग आणि अजून कितीतरी गोष्टी!

प्रत्येक गुन्हेगराची गुन्हा करण्याची पद्धत देखील वेगवगेळी होती. याच गुन्हेगारांपैकी एक अल कॅपोन हा होता.

अल कॅपोनचा जन्म १७ जानेवारी १८९९ रोजी न्यूयॉर्कच्या ब्रूकलिन येथे झाला होता. अवघ्या वयाच्या २७ व्या वर्षीच अल्फोन्से ग्राफिक कॅपोन अमेरिकेच्या सर्वात खतरनाक गुंडाच्या रूपात प्रसिद्ध झाला होता.

 

 Al-Capone.Inmarathi
cloudfront.net

 

१९२० चे पूर्ण दशक आणि १९३० चे सुरुवातीच्या वर्षांमध्ये अमेरिकेत दारू, सेक्स आणि ब्लॅकमेलिंगचा धंदा खूप जोरात चालू होता. एका गरीब प्रवाश्याच्या रूपामध्ये शिकागोला आलेला कॅपोन देखील याच धंद्याशी जोडला गेला.

असे म्हटले जाते की, कॅपोन हा २०० लोकांच्या हत्येला जबाबदार होता. पण कॅपोन आपल्या घरामध्ये एक खूपच वेगळा माणूस होता.

कोलंबियाई वकील आणि पत्रकार डॅनियल सॅमपर पिझानो याबद्दल म्हणतात की,

 

al capone inmarathi

 

“खूप कमी लोकांना माहित आहे की, हा गुन्हेगार माणूस एक कौटुंबिक व्यक्ती आणि एक चांगला नवरा देखील होता.”

ते मानतात की, कुटुंबामध्ये जबाबदार माणूस आणि समाजाचा शत्रू असे दोन चेहरे अल कॅपोनचे दोन विरोधाभास चेहरे आहेत. समाचार पिझानोने आपले नवीन पुस्तक ‘कॅमस वाय फामास’ हे कॅपोनच्या चरित्रावर लिहिले आहे.

 

Al Capone.Inmarathi1

 

शाळा सोडून गुन्हेगारी जगताकडे वळला 

आपल्या या पुस्तकामध्ये पिजानो लिहतात की, कॅपोन हा लहानपणीच शाळा सोडून गुन्हेगारी  जगाशी जोडला गेला. पण कॅपोनचे कुटुंबीय याबद्दल एक वेगळीच गोष्ट सांगतात.

देयिरद्रे मेरी कॅपोन ही म्हणते की, त्याने पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यांना चांगले शिक्षण मिळाले होते. त्यामुळे त्यांनी व्यवसाय करण्याचे ठरवले आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले. त्यांनी शेकडो लोकांना आपल्या येथे कामाला ठेवले. एखादा अडाणी माणूस असे क्वचितच करू शकतो.

पिझानो म्हणतात की,

“सुरुवातीला तो एका छोट्याशा गुन्हेगारी समूहाशी जोडला गेला. त्याच्याबरोबर अजून कितीतरी लोक काम करत होते आणि तो त्यांना खूप सारे पैसे देखील देत असे. त्याचे लोक त्यावेळी एका आठवड्यामध्ये २०० डॉलरपर्यंत कमवत होते. ही १९२० च्या दशकातील सर्वात जास्त रक्कम होती.”

 

Al Capone.Inmarathi2

 

आयर्लंडमध्ये झाले मेईशी लग्न 

देयिरद्रे मेरी कॅपोनने सांगितले की,

“अल कॅपोनचे नाव तेव्हा संपूर्ण अमेरिकेमध्ये ओळखले जात होते. ते एफबीआयच्या हिटलिस्टमध्ये होते. पण लोकांना त्यांच्या कुटुंबियांविषयी आणि यांच्याबरोबर ३० वर्ष राहिलेल्या त्यांच्या पत्नी जोसफिन कफलिन (मेई कफलिन) च्याविषयी खूप कमी माहिती आहे.”

“१९१८ मध्ये या दोघांचे लग्न झाले होते. त्यानंतर ते शिकागोला गेले. तिथून त्यांना एका वेश्यालयच्या सिक्युरिटी गार्डची नोकरीची ऑफर मिळाली होती.

१९ व्या शतकाच्या शेवटी आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला गरिबीला वैतागून आयर्लंड आणि इटलीचे कितीतरी लोक अमेरिकेला पोहोचले होते. कॅपोन आणि त्यांची पत्नी यामधीच एक होते. त्याची पत्नी मेई आयरिश होती.”

 

Al Capone.Inmarathi3
fbi.gov

 

कॅपोनवर कितीतरी टीव्ही सिरियल्स आणि चित्रपट बनलेले आहेत. एका लढाईच्या दरम्यान त्यांच्या चेहऱ्यावर जखम झाली होती. १७ वर्षाच्या वयामध्ये एकदा काम करण्याच्या दरम्यान त्याने एका स्त्रीला तू खूप सुंदर आहेस, एखाद्या बाहुलीसारखी, असे म्हटले होते.

त्यावेळी फ्रँक गॅलूसियो या तिच्या भावाने जो तेथील स्थानिक गुंडा  होता, त्याच्याबरोबर त्याची मारामारी झाली आणि त्याच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर दोन कट्स पडले होते.

कॅपोनने जेव्हा मेईशी लग्न केले, त्यावेळी मेई लहान होती, म्हणजेच त्यासाठी त्यांना आपल्या आई – वडिलांकडून परवानगी घ्यायची होती.

पण काही पुस्तकांमध्ये असे लिहिले आहे की, लग्नाच्या अगोदरच मेईने एका मुलाला जन्म दिला होता. पण देयिरद्रे मेरी कॅपोन म्हणते की, असे काहीही नव्हते. ती सांगते की, “सोन्नी हा मेईचा मुलगा नव्हता.” पण हा मुलगा त्या कुटुंबामध्ये कसा आला याचे उत्तर तिच्याकडे देखील नाही.

 

Al Capone.Inmarathi4

 

पुस्तकानुसार, कॅपोन आणि त्याची पत्नी यांना एकमेकांवर पूर्ण विश्वास होता. पण या गोष्टीचा काहीही पुरावा नाही की, मेईला कॅपोन  हा बाहेरच्या जगतातील एक कुख्यात गुंड आहे आणि त्याने मोठमोठे गुन्हे केले आहेत हे माहीत होते की नव्हते.

देयिरद्रे मेरी कॅपोन लिहिते की, मेईला कॅपोन बाहेरच्या जगामध्ये करत असलेल्या गुन्ह्यांची काहीच कल्पना नव्हती. त्या काळामध्ये पुरुष बाहेरच्या कोणत्याच गोष्टी घरामध्ये आणत नसत.

 

al capone family inmarathu

 

कराच्या चोरीसाठी त्याला आठ वर्ष जेलमध्ये जावे लागले होते आणि तिथूनच त्याचे गुन्हे हे वाढत गेले.

कालांतराने कॅपोन हा एक अट्टल गुन्हेगार झाला आणि लोकांमध्ये त्याच्याबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले. कॅपोनबद्दल नेमकी माहिती सध्या कोणाकडेच नाही असे यावरून म्हणावे लागले, कारण यामध्ये प्रत्येकजण आपापली वेगवेगळी मते मांडून शक्यता व्यक्त करत आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?