' अंतराळात महिलांना जेव्हा पिरियड्स येत असतील तेव्हा काय होत असेल?

अंतराळात महिलांना जेव्हा पिरियड्स येत असतील तेव्हा काय होत असेल?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

महिलांना येणारी मासिक पाळी यावर आपल्याकडे मोकळेपणाने बोलण्यास नेहेमी टाळले जाते. त्याकडे नेहेमी दुर्लक्ष केले जाते.

पण दुर्लक्ष करण्याएवढी छोटी गोष्ट आहे का ही? पण ज्यांनी कधी हा अनुभवच घेतला नाही त्यांच्याकडून ह्या संबंधी संवेदनशीलतेची अपेक्षा करणे हेच मुळात चुकीचे.

 

First Period Traditions-inmarathi02

 

पण खरे पाहता मुली त्यांच्या मासिक पाळी दरम्यान ज्या काही समस्यांचा सामना करतात, त्यासाठी त्यांना खरच सॅलुट करायला हवा…

साधारण परीस्थितीत जर पिरियड्स एवढे त्रासदायक असतात तर विचार करा स्पेस म्हणजेच अंतराळात जर कुठल्या महिला अंतराळवीराला मासिक पाळी आली तर काय होत असेल?

अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने त्यांच्या समोर पिरियड्स दरम्यान नक्कीच अनेक समस्या उद्भवत असतील. मग अश्या वेळी ह्या महिला अंतराळवीर काय करत असतील?

ह्यासंबंधी CNN ने काही गायकनोलॉजिस्ट आणि संशोधकांशी यासंबंधी चर्चा केली. तेव्हा ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली.

 

women astronout-inmarathi02

हे ही वाचा – “पिझ्झा हट” ने केलाय चक्क अंतराळात एक रेकॉर्ड! वाचा जबरदस्त कहाणी!

प्रश्न : अंतराळात राहिल्याने शरीरावर तेथील परिस्थितीचा परिणाम होतो, तेव्हा महिलांच्या मासिक पाळीवर देखील याचा परिणाम जाणवत असेल?

उत्तर : हे अगदी चुकीचे आहे. अंतराळात भलेही शरीरावर काही परिणाम होत असेल पण त्याचा महिलांच्या मासिक पाळीशी काहीही संबंध नाही. जर महिला अंतराळवीराची तब्येत ठीक आहे तर तिला तिची मासिक पाळी अगदी वेळेवर येते.

प्रश्न : मग अश्यात अंतराळात जाणाऱ्या महिला आपल्यासोबत अनेक सॅनिटरी पॅड्स घेऊन जात असतील?

उत्तर : नाही. अश्यावेळी महिला अंतराळवीर स्वतःबरोबर अश्या काही औषधी घेऊन जाते ज्याने तिला पिरियड्स येणार नाहीत.

 

women astronout-inmarathi

 

प्रश्न : ही औषधे घेणे अंतराळात जाणाऱ्या महिलांसाठी महत्वाचे असते का?

उत्तर : नाही. अंतराळात केवळ अंतराळवीरच नाही तर त्यांच्यासोबत एक डॉक्टरांचा चमू देखील जात असतो. तेच त्यांना औषध घेण्याचा सल्ला देतात. पण जर त्यांना ह्या गोळ्या नसतील घ्यायच्या तर त्या सॅनिटरी पॅड्स देखील वापरू शकतात.

प्रश्न : अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने ब्लड क्लॉट तयार होत असतील ना? मग पिरियड्स मध्ये अंतराळात कसे राहू शकतो?

उत्तर : हे अगदी चुकीचे आहे. अंतराळात असे काहीही होत नाही. जसे साधारण मासिक पाळी असते तशीच ही असते. ह्यावेळी सॅनिटरी पॅड्स किंवा टॅम्पॉन वापरू शकतात.

 

 women-astronout-inmarathi03

 

प्रश्न : किती दिवसांपर्यंत त्यांना ह्या गोळ्या घ्याव्या लागतात?

उत्तर : यूरोपियन स्पेस एजेंसी च्या सामंथा क्रिस्टोफोरेटी ह्यांच्या नावे सर्वात जास्त दिवस म्हणजेच १९९ दिवस अंतराळात राहण्याचा रेकॉर्ड आहे. त्यानंतर मुळच्या भारतीय असलेल्या सुनिता विलियम्स ह्यांचा नंबर येतो. म्हणजे आतापर्यंत अंतराळात सर्वात जास्त साडे तीन महिने कुठलीही महिला अंतराळात राहिलेली आहे. पण जर मंगळावर माणसांना पाठवले तर तेथून परतण्यासाठी ३ वर्ष लागतील.

प्रश्न : मग एवढ्या कालावधीसाठी तर त्यांना अनेक गोळ्या न्याव्या लागतील?

उत्तर : जर असे झाले तर त्यासाठी जवळपास ११०० गोळ्या न्याव्या लागतील. म्हणून वर्षा जैन ज्या एक गायनकोलोजिस्ट आहेत, त्या किंग्स कॉलेज लंडन येथे यावर रिसर्च करत आहेत. त्या एक अशी गोळी बनविण्याच्या प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे खूप काळापर्यंत पिरियड्स ला थांबवता येईल.

 

women astronout-inmarathi01

हे ही वाचा – मृत अंतराळवीराच्या मृतदेहाचं जे केलं जाऊ शकतं, ते सामान्य व्यक्तींना सुचणारही नाही!

प्रश्न : पिरियड्स ला अश्या प्रकारे एवढ्या वेळापर्यंत थांबवणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्याने शरीरावर खूप विपरीत परिणाम होऊ शकतात.

उत्तर : नाही. महिलांसाठी अंतराळात अश्या प्रकारचे औषध घेणे हे फायद्याचेच आहे. ह्या गोळ्या अॅस्ट्रोजेन हार्मोन्स ला वाढवतात. ज्यामुळे हाड मजबूत होतात. ह्यामुळे अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्याने अंतराळवीरांना होणारा बोनलॉस महिलांना होत नाही…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “अंतराळात महिलांना जेव्हा पिरियड्स येत असतील तेव्हा काय होत असेल?

  • September 5, 2019 at 8:38 am
    Permalink

    So important. Blog

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?