' छत्तीसगडमधले आदिवासी लोकं अशा पद्धतीने प्रेम व्यक्त करतात, वाचा! – InMarathi

छत्तीसगडमधले आदिवासी लोकं अशा पद्धतीने प्रेम व्यक्त करतात, वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

वॅलेन्टाइन डे म्हणजेच आजच्या पिढीचा प्रेम व्यक्त करण्याचा, प्रेम साजरे करण्याचा दिवस. दरवर्षी १४ फेब्रुवारीला येणारा हा वॅलेन्टाइन डे संत वॅलेन्टाइन यांच्या नावावर साजरा केला हतो. अर्थातच ही भारतीय नाही तर पाश्चात्य संस्कृती आहे. पण आज ही संस्कृती भारतीय तरुणांसाठी प्रेम व्यक्त करण्याची एक संधी बनली आहे. ती आता या अर्थाने भारतीयांसाठी पाश्चात्य राहिलेली नाही.

 

valentine-day-InMarathi

 

तरुण तरुणी मोठ्या उत्साहाने व्हॅलेंटाइन डे साजरा करतात. एवढच नाही तर वॅलेन्टाइन विक देखील साजरा केला जातो.

प्रेम व्यक्त करण्यची ही पाश्चात्य पद्धती जरी आज आपण अंगिकारली असली तरी आपली भारतीय संस्कृती देखील ह्यात काही मागे नाही. आपल्याकडे देखील अनेक पद्धतींनी प्रेम व्यक्त केले जाते, फरक एवढाच की त्याला वॅलेन्टाइन डे किंवा असे कुठलेही नाव दिले जात नाही.

भारताच्या दुर्गम भगत आजही अनेक आदिवासी जमाती राहतात. आज भलेही हे आदिवासी लोक इतर बाबतीत शहरातील किंवा गावातील लोकांच्या तुलनेत मागसेले असतील तरी ते प्रेमाच्या विषयात आपल्याही पुढे आहेत.

 

valentine day bastar tribe-inmarathi04

हे ही वाचा ५ रुपयात लग्न, ४०० रुपये महिना खर्च – डॉक्टर जोडप्याने कुपोषणाविरुद्ध छेडलं युद्ध!

वॅलेन्टाइन डे ज्या दिवशी संपूर्ण जगभर प्रेम व्यक्त केले जाते, तिथेच आदिवासी लोकांत नुसते प्रेम व्यक्त केले जात नाही तर त्यांचे लग्नही होते. ह्यावरून कळून येते हे आदिवासी प्रेमात आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. वॅलेन्टाइन डेच्या दिवशी प्रेम आणि लग्न हे दोन्ही होऊन जाते.

 

abuzmadiya InMarathi

 

भारतातील मध्यप्रदेशच्या बस्तर येथील आदिवासी जमातीत, प्रेमाची भेट स्वीकारणाऱ्या तरुणी त्या प्रेमींना आपला सोबती म्हणून निवडतात. छत्तीसगड येथील बस्तर जिल्ह्यातील आदिवासीदेखील आता वॅलेन्टाइन डेसाठी सज्ज असतात. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ते फुलांची मदत घेतात.

येथील अबुझमाडिया जमातीचे तरुण-तरुणी फुल देऊन तसेच मेळ्याच्या सुरवातीस बाना, टंगिया गपा देऊन आपला जीवनसाथी निवडल्याचे संकेत देतात.

 

aadiwasi 1 InMarathi

 

तर तरुणी तरुणांना आकर्षित करण्यासाठी वाड, बांगडी, नाडी, पट्टा इत्यादींचा आधार घेतात. धुरवा जमातीचे तरुण बांबूपासून बनलेल्या टोपल्या तसेच बांबूचे कंगवे तरुणींना भेट म्हणून देतात.

ह्याचा प्रतिसाद म्हणून तरुणी त्यांना चांदीसारख्या रंगाच्या पट्ट्या असलेल्या कुऱ्हाडी देतात. जर दोन्ही पक्षांनी भेटवस्तू स्वीकारली तर गावात जाऊन त्याचं मोठ्या उत्साहात लग्न लावून दिलं जातं.

 

aadiwasi 2 InMarathi

 

अबुजमाडिया जमातीच्या तरुणी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मोत्याच्या माळा प्रियकराच्या गळ्यात घालतात. एकदा माळ घातली की दोघांचं जमलं म्हणून समजा. ह्यानंतर दोघांचे लग्न लाऊन दिले जाते.

 

aadiwasi 3 InMarathi

 

हे केवळ वॅलेन्टाइन डे लाच नाही तर इतर कुठल्या प्रसंगावर देखील लग्न करू शकतात. पण प्रेमाचा महिना असल्याने सर्वात जास्त लग्न याच महिन्यात होतात. दिवसाचे औचित्य पालनाचे बंधन यांच्यात नाही, तसेच इतर दिवशी विवाह न करण्याची सक्तीही नाही!

स्त्री पुरुष संबंध म्हणजे निसर्गाने निहित केलेली अत्यंत सहज आणि स्वाभाविक प्रक्रिया आहे. 

त्या प्रक्रियेला कोणत्याही बंधनात न अडकवता मुक्तपणे स्वीकार करण्याची पद्धत भारतात अनेक आदिवासींच्या आचरणात आहे. त्यापैकी ही एक!

===

हे ही वाचा भटक्या विमुक्तांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी कॉर्पोरेट जॉबवर पाणी सोडणाऱ्या जोडप्याची कथा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

 आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?