' शेगावला जाताय? मग गजानन महाराजांच्या दर्शनासह या ठिकाणांना भेट द्याच! – InMarathi

शेगावला जाताय? मग गजानन महाराजांच्या दर्शनासह या ठिकाणांना भेट द्याच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

लेखक – अभिजित पानसे 

देशातील शिस्तबद्ध ,स्वच्छतेबाबत विलक्षण आग्रही, नियमांची अंमलबजावणी आणि मनुष्यबळ याबाबतीत सर्वोत्तम असे देवस्थान कोणते असेल तर ते शेगाव च्या गजानन महाराजांचं स्थान.

शेगावचे श्री गजानन महाराज, हे लाखो करोडो भाविकांचे श्रद्धा स्थान, त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थानांमध्ये गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविक गर्दी करतात.

महाराज दिगंबर वृत्तीचे सिद्ध कोटीचे साधू होते. सतत भ्रमण करणे, जागा मिळेल त्या जागी राहणे, मिळेल ते खाणे अशी त्यांची दिनचर्या चरित्रातून स्पष्ट होते. भक्तांवर आलेली संकटे दूर करून त्यांना देवाचा साक्षात्कार करून दिल्याची अनेक उदाहरणे त्यांच्या चरित्रात सामील आहेत.

 

Gajanan Maharaj InMarathi

 

कुठेही पैशाकरिता वखवखलेपणा नाही. विकतच्या दर्शनाचे वेगवेगळे ‘पॅकेजेस’ नाहीत. सर्वांसाठी एकच रांग.

दर एक ते दोन तासांनी सेवेकरी जीवणूनाशक स्प्रे ने मंदिर आवारातील सर्व भाग पुसतात आणि जमीन सारवतात. पण या मंदिराची, संस्थेची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे येथील उत्स्फूर्त सेवेकरी. volunteers. मनुष्यबळ स्वतःहून इथे सेवा द्यायला गावातील, परगावातील लोक येतात त्यातही वर्ष-वर्ष वेटिंग लिस्ट असते.

 

shegaon-inmarathi06

 

पण शेगावला लोक गेले की प्रमुख समाधी मंदिर, पारायण गृह आणि आनंद सागर या ठिकाणीच ९०% लोक जातात. गजानन महाराजांसंबंधित आणखी ५ जागा शेगाव ला प्रमुख मंदिराच्या जवळच आहे याची बहुतेकांना कल्पना नसते. पोथीत किंवा गोष्टीरूपी पुस्तकात या ठिकाणांचा उल्लेख आढळतो.

१. मोटेंचं शिव मंदिर :-

हे शंकर आणि विष्णू मंदिर आहे. याचा जीर्णोद्धार संस्थानाने केला आहे. त्यामुळे आता हे मंदिर सुंदर स्थापत्याने परिपूर्ण आहे. या मंदिराचे महत्व म्हणजे;

 

shegaon-inmarathi

 

पोथीत उल्लेख आढळतो की, गजानन महाराजांनी घोड्याच्या पायात झोपून त्याला शांत केले, किर्तनकाराला समज दिली ती याच मंदिरात.
आत गेल्यावरच महाराजांचा अप्रतिम मूळ फोटो, पादुका समोर दिसतात. शेजारी गाभाऱ्यात शिवपिंडी आणि बाजूला उजवीकडे विष्णू मूर्ती.
मंदिरात मूळ मंदिराचा फोटो ही आहे.

शेगाव चे मूळ नाव ‘शिवगाव’ होते ते याच ग्रामदैवत शिवमंदिरावरून पडले होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

२. महाराजांचे प्रगट स्थळ :-

बहुतेक जण शेगावला येऊन समाधी मंदिरातील दर्शन घेतात. पण पहिल्या अध्यायात गजानन महाराजांचे सर्व प्रथम दर्शन, भेट बंकटलालास होते त्याबद्दल वाचूनही बहुतेक लोक त्या जागी जात नाहीत वा ती जागा अजूनही गावात आहे यबद्दल अनभिज्ञ असतात.

मोटेंच्या शिवमंदिरापासून मूळ रस्त्यावरून समोर जात उजवीकडे वळल्यावर सरळ गेल्यास किंवा कोणाला प्रकट स्थळाबद्दल विचारल्यास तो रस्ता दाखवू शकतो. थोड्याच अंतरावर ते प्रकट स्थळ येतं.

 

shegaon-inmarathi01

एक मस्त बहरलेला भलामोठा वटवृक्ष इथे आहे. समोर प्रकट स्थळाची जागा आणि त्याबद्दल माहिती आहे. शेजारीच एक मोठा हॉल आहे ज्यात चित्ररूपी चरित्र मांडले आहे.

काही वर्षांपासून संस्थानाने या जागेचं नीट बांधकाम केलंय. आता इथेही सेवेकरी असतात. पण तरीही आधीची जागाच जास्त नैसर्गिक वाटायची.

३. बंकटलालचा वाडा :-

 

shegaon-inmarathi02

प्रकट स्थळापासून मूळ रस्त्यावर येऊन पुढे जाताना कोणाही गावकऱ्याला विचारल्यास तो ही जागा दाखवेल. इथे मूळ वाड्याच्या जागी एक सभागृह बांधले आहे. आत महाराजांचा फोटो, पादुका आणि बंकटलालच्या वडिलांची हातात तराजू घेतलेली प्रीतिकृती आहे.

पाचेक वर्षापर्यंत लागूनच पडक्या स्थितीतला जुना वाडाही होता. लाकडाचे जुने नक्षीकाम स्पष्ट दिसायचे. आता तो संपुर्ण पाडून तिथे मोकळी जागा आहे.

४. हनुमान, शीतला माता मंदिर :-

 

shegaon-inmarathi03

 

काही अंतरावरच हे मंदिर आहे. इथेच महाराजांनी, पाटील बंधूंनी त्यांना उसाने मारल्यावर त्यानी हाताने उस पिळून मुलांना रस पाजला होता. इथे या चवथ्या जागी पोचल्यावर काही पावलांवरच मंदिराचा मागचा भाग येतो.

हे सुद्धा संस्थानाच्या अखत्यारीत असल्याने इथेही महाराजनचा फोटो, आणि सेवेकरी असतात. जुन्या मंदिराचा मूळ फोटो, येथील इतिहासाची माहिती दिली आहे.

५.  जुने शिवमंदिर :-

 

shegaon-inmarathi04

 

प्रमुख मंदिराजवळील महाप्रसाद गृहाकडे जाताना एक जुने शिव मंदिर आहे. हेमाडपंथी नसलेले पण मोठ्या खांबांचे पुरातन आणि वेगळा ‘फील’ देणारे हे मंदिर आहे.

याबद्दल फार कमी लोकांना माहिती असल्याने इथे नेहमी शांतता आणि शांती असते. हे मंदिर संस्थानाच्या अखत्यारीत नाही. त्यामुळे येथील स्थापत्य इतर चार स्थानांप्रमाणे नसल्याने येथे मूळ ‘फ्लेवर’ जाणवतो.

 

Gajanan Maharaj 2 InMarathi

 

शेगाव ला जाणाऱ्यांनी किमान एकदा तरी या ५ जागांना भेट दिली तरीही संपूर्ण यात्रेला वेगळा ‘टच’ येईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लेखक चित्रपट, क्रीडा समीक्षक आहेत. विविध वृत्तपत्र, मासिकांमध्ये त्यांचे समीक्षणपर लेख प्रसिद्ध होत असतात.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com |वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com |त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?