'एक अत्यंत दुर्दैवी विमान अपघात: फुटबॉलच्या इतिहासातली भळभळती जखम

एक अत्यंत दुर्दैवी विमान अपघात: फुटबॉलच्या इतिहासातली भळभळती जखम

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

फुटबॉल हा खेळ संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. भारतामध्येही आता क्रिकेटबरोबर फुलबॉल हा खेळ देखील लोकांना आवडू लागला आहे. इंडियन सुपर लीग म्हणजेच आयएसएलमुळे आता भारतामध्येच घराघरात फुटबॉल हा खेळ पोहोचला आहे.

त्यातूनच लहान मुले आणि तरुण याकडे आकर्षिले जात आहेत. रोनाल्डो, मेसी यांसारखे दिग्गज फुटबॉलपटू भारतीयांचे फेव्हरेट खेळाडू आहेत.

 

Manchester uniteds busby babes.Inmarathi
minutemediacdn.com

फुटबॉलमध्ये प्रत्येक टीमचे स्वतःचे असे एक होम ग्राउंड असते. जसे आपल्या येथे कोलकाता शहरातील मोहन बागान फुटबॉल क्लबचे स्वतःचे मोहन बागान ग्राउंड आहे. तसेच मॅनचेस्टर युनायटेडचे होम ग्राउंड ओल्ड टेफ्रॉर्ड आहे. हे स्टेडियम मॅनचेस्टरच्या खेळाडूंचे आणि फुटबॉल रसिकांचे खास स्थान आहे.

एक काळ असा देखील होता, जेव्हा या स्टेडियमला वेगवेगळ्या भागांत विभागण्यात आले होते आणि प्रत्येकाला इंग्रजीचे एक अक्षर नाव म्हणून देण्यात आले होते. जसे, ए स्टॅन्ड, बी स्टॅन्ड, सी स्टॅन्ड अशाप्रकारे याची नावे होती.

यामधील आज फक्त ‘के’ स्टॅन्ड आपल्या जुन्या नावाने ओळखले जाते. मॅनचेस्टर मधील लोक या स्टेडियममध्ये आपल्या टीमसाठी गाणे गाऊन आणि इतर काही करून त्यांनी या स्टेडियमला देखील खूप प्रसिद्ध केले होते.

या स्टेडियमच्या ‘के’ स्टॅन्डच्या एका कोन्यावर एक घड्याळ १९६० पासून लावण्यात आलेले आहे आणि तेव्हापासूनच दरवर्षी ६ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजून ४  मिनिटांवर हे घड्याळ थांबवण्यात येते.

जेव्हा हे घड्याळ थांबते, तेव्हा इतिहासातील एक अशी वेळ तयार होती. जी खूपच दुःखदायक घटनेची आठवण करून देते.

 

Manchester uniteds busby babes.Inmarathi1
wikimedia.org

६ फेब्रुवारी १९५८ च्या दुपारी तीन वाजून चार मिनिटांवर एका विमान अपघातामध्ये  मॅनचेस्टर युनायटेडच्या ऐतिहासिक ‘बस्बी बेब्स’ संघाच्या आठ खेळाडूंचा मृत्यू झाला होता.

या खेळाडूंबरोबरच आठ फुटबॉल जर्नलिस्ट, विमानाच्या क्रू मधील दोन माणसे, एक फुटबॉल चाहता आणि एक ट्रॅव्हल एजंट यांचादेखील मृत्यू झाला होता. या अपघातामध्ये एका झटक्यात २३ जणांना आपले प्राण गमवावे लागले.

जगभरामध्ये या अपघाताला म्यूनिक प्लेन क्रॅशच्या नावाने ओळखले जाते. म्यूनिक ऑलम्पिकवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आधीपर्यंत हा म्यूनिकच्या खेळच्या इतिहासातील सर्वात दुःखद घटना होती.

दुसऱ्या फुटबॉल संघांसारखेच मॅनचेस्टर युनायटेडच्या संघामध्ये जास्तकरून तेच खेळाडू असायचे, जे दुसऱ्या क्लबसाठी खेळत – खेळत येथे पोहोचले होते.

पण सर अलेक्झांडर मॅथ्यू बस्बी क्लब मॅनेजर बनल्यानंतर परिस्थिती बदलली. क्लबने आपली युथ टीम (ज्युनियर टीम) चे काही सक्षम खेळाडू शोधून आपल्या या क्लबमध्ये त्यांना ट्रेन करण्याकडे लक्ष दिले.

 

Manchester uniteds busby babes.Inmarathi2
leaguemanagers.co

अशा प्रकारे सरासरी २१ – २२ वय असलेला एक खूपच प्रतिभावान संघ तयार झाला. ज्याला मॅनचेस्टर इव्हिनिंग न्यूजसाठी काम करणाऱ्या खेळाचे पत्रकार टॉम जॅक्सनने बस्बी बेब्स म्हणणे सुरु केले. या संघाने १९५५ ते १९५७ च्या दरम्यान बहुतेक इंग्लिश चॅम्पियनशिप जिंकल्या.

 मॅनचेस्टर युनायटेडचा भाग होणे कोणत्याही खेळाडूला खास बनवते. पण जे प्रेम बस्बी बेब्स यांना मिळत होते, ते फुटबॉल इतिहासातील खूप कमी संघाना मिळाले असेल.

टीम मॅनेजर बस्बी हे आपल्या संघाला खूप पुढे घेऊन जाऊ इच्छित होते. त्यासाठी ते इंग्लिश लीगशी भांडले आणि संघाला १९५७ मध्ये युरोपियन कप खेळण्यासाठी घेऊन गेले.

हा क्लब सेमी फायनलमध्ये आपला नेहमीचा शत्रू संघ रियल मॅड्रिडकडून हरला. पण मॅनचेस्टर युनायटेड हा पहिला इंग्लिश क्लब होता, जो ब्रिटनमधून बाहेर जाऊन चॅम्पियनशिप खेळला

बस्बी हे इंग्लिश लीगला जास्त नाराज देखील करू इच्छित नव्हते, त्यामुळॆ त्यांनी हे ठरवले की, टीम होम मॅच आणि युरोपियन कपच्या मॅच एकत्रित खेळेल. त्यामुळे या संघाला सारखा प्रवास देखील करावा लागत होता.

 

Manchester uniteds busby babes.Inmarathi3
oldtraffordfaithful.com

१९५८ मध्ये युरोपियन कप अशाप्रकारचे खेळला गेला. आठवड्याच्या मध्यात युरोपियन कपच्या मॅच होत असत आणि शनिवारी इंग्लिश लीगच्या मॅच होत असत. यावेळी संघ सहज क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचला देखील होता.

त्यांची क्वार्टर फाइनलची मॅच ३ – ३ ने टाय झाली. पण गेल्या मॅचच्या पॉईंट्सच्या जोरावर मॅनचेस्टर युनायटेड पुढे गेले आणि त्यांच्या विरोधात असलेली टीम रेड स्टार बेलग्राड युरो कपमधून बाहेर झाली.

असे असूनही या दोन्ही संघामध्ये मैत्री झाली आणि त्यांनी हॉटेलला जाऊन खूप पार्टी केली.

पण त्यांचे हे मैत्रीचे नाते फार काळ टिकले नाही.

सकाळी या संघाला लवकरात लवकर मॅनचेस्टरला पोहचायचे होते. त्यावळी सर्व खेळाडू आपापले सामान घेऊन चार्टर्ड विमानामध्ये बसले. त्यांच्याबरोबर काही फुटबॉल पत्रकार आणि मॅनचेस्टरचे फॅन्स देखील येत होते.

या संघाचे खेळाडू जॉन बेरीचा पासपोर्ट विमानतळावर हरवला, त्यामुळे हे विमान एक तास उशिराने उडाले.

 

Manchester uniteds busby babes.Inmarathi4
flughafen-riem.de

हे विमान ब्रिटिश युरोपियन एअरलाईन्सचे एअर स्पीड अँबेसेडर २ होते. हे एक नवीन विमान होते, पण ते बेलगार्डपासून मॅनचेस्टरपर्यंतचे अंतर कापू शकत नव्हते. त्यामुळे दुपारी सव्वा दोन वाजता म्यूनिकमध्ये इंधन घेण्यासाठी उतरले.

म्यूनिकमध्ये त्यावेळी बर्फ पडलेला होता आणि वातावरण खूप थंड होते. अशावेळी अँबेसेडर सीरिजमधील विमानांना उड्डाण घेण्यात समस्या येत असे.

या विमानाने देखील दोनवेळा उड्डाण करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर थोड्या वेळाने बर्फ पडू लागला आणि सर्व प्रवासी विमानातून उतरवले गेले.

पण विमानाच्या क्रूने परत एकदा उड्डाण करण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले. या विमानाचे दोन्ही वैमानिक हे एअरफोर्सचे होते. त्यांना आपल्या अनुभवावर विश्वास होता. दुपारी ३ वाजून ३ मिनिटांनी परत एकदा म्यूनिक विमानतळाच्या बर्फाने झाकलेल्या धावपट्टीवर विमान धावू लागले.

 

Manchester uniteds busby babes.Inmarathi5
evrensel.net

वैमानिकाने विमानाला हळू-हळू स्पीड देऊन उड्डाण भरण्याचा प्रयत्न केला.

पण एक मिनिटापर्यंत धावपट्टीवर धावल्यानंतर देखील विमान हवेमध्ये उडाले नाही आणि जवळपास दोन किलोमीटर लांब असलेली ही धावपट्टी फेस तोडून एका घराला जाऊन धडकले आणि खूप मोठा स्फोट झाला.

यामध्ये २० लोकांचा जागच्या जागी मृत्यू झाला आणि ३ लोकांचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला.

या मरणाऱ्या लोकांमध्ये आठ पत्रकार देखील होते, ज्यामध्ये मॅनचेस्टर इव्हिनिंग न्यूजचा एक पत्रकार देखील होता. ज्याने या संघाला बस्बी बेब्स नाव दिले होते, म्हणजेच यामध्ये पत्रकार टॉम जॅक्सनचा देखील मृत्यू झाला होता. फक्त विमानात बसलेले जेम्स बस्बी हे वाचले.

 

Manchester uniteds busby babes.Inmarathi6
titan24.com

या घटनेची दुःखद आठवण म्हणून म्यूनिख विमानतळावर फुटबॉल फिल्डसारखे स्मारक बांधण्यात आलेले आहे.

बेलगार्डच्या ज्या मॅजेस्टिक हॉटेलमध्ये बस्बी बेब्सने शेवटचे जेवण केले होते, तिथे १५ खेळाडूंनी साइन केलेला मेन्यू ठेवण्यात आलेला आहे. याच १५ पैकी आठ खेळाडूंना यामध्ये जीव गमवावा लागला होता.

असा हा अपघात खूपच भयानक आणि दुःखद होता. यासाठी संपूर्ण जगामधून आजही  हळहळ व्यक्त केली जाते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?