' विमानांचा रंग पांढराच का असतो? जाणून घ्या त्यामागील वैज्ञानिक कारणे

विमानांचा रंग पांढराच का असतो? जाणून घ्या त्यामागील वैज्ञानिक कारणे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगभरातील जवळपास सर्वच प्रवासी आणि माल वाहतूक करणारी विमाने ही पांढऱ्या रंगाची असतात. अशी खूप कमी विमाने असतात जी विविधरंगी किंवा रंगीबेरंगी असतात.

कधी तुमच्या डोक्यात हा विचार आला आहे का, की ही विमाने नेहमी पांढऱ्या रंगाचीच का असतात? विमानसेवा देणारी कंपनी इतर सर्व गोष्टींवर बराच खर्च करते. तर मग आपल्या विमानांना रंगीत आणि अधिक आकर्षक का बनवत नाही?

 

airplanes-inmarathi01
sarcasmlol.com

 

पण विमान पांढऱ्या रंगाचे असणे, ह्यामागे अनेक महत्वाची कारणे आहेत. त्यातील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे पांढरा रंग हा सूर्याच्या प्रकाशाला सर्वात चांगल्या प्रकारे परावर्तीत करू शकतो.

इतर गडद रंग असं करू शकत नाहीत. काळा किंवा इतर कुठलाही गडद रंग सूर्यप्रकाश परावर्तित करत नाहीत. परावर्तित होण्याचे प्रमाण फारच कमी असते.

 

airplanes-inmarathi08

 

आपण उन्हाळ्यात पांढरे कपडे घालणे पसंत करतो. कारण पंधरा रंग सूर्याच्या उष्णतेला परावर्तीत करतो. हेच तथ्य विमानाच्या बाबतीत सुद्धा वापरले जाते.

जर विमानाला कुठलाही गडद रंग दिला गेला, तर तो रंग सूर्याची उष्णता जास्त प्रमाणत शोषून घेईल. त्यामुळे विमानातील यंत्रणेवर याचा परिणाम होतो. ही यंत्रणा खराब होण्याची संभावना वाढते.

 

airplanes-inmarathi04

 

विमानांना पांढरा रंग देण्यामागे केवळ हे एकच कारण नाही. पांढऱ्या रंगामुळे विमानावरील कुठलाही क्रॅक, डेंट किंवा इतर गोष्टी सहजपणे दिसून येतात. छोट्यात छोटी बाब सुद्धा वेळीच लक्षात येणे आवश्यक आहे.

विमानातील एखादा छोटासा क्रॅक देखील दुर्घटनेचे कारण ठरू शकतो.  

पांढऱ्या रंगामुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान लवकर दिसून येते. हे स्पष्टपणे दिसणे अतिशय महत्वाचे असते. म्हणून विमानाला पांढरा रंग असणे फायद्याचे आहे.

 

airplanes-inmarathi
allindiaroundup.com

 

तसेच जर कधी कुठले विमान दुर्घटनाग्रस्त झाले, तर त्याच्या पांढऱ्या रंगामुळे ते समुद्र, जंगल किंवा जमिनीवर स्पष्टपणे दिसू शकते. रात्रीच्या काळोखात देखील पांढऱ्या विमानाला बघणे सहज सोपे आहे.

तसेच जर विमानाच्या कुठल्याही भागातून तेल गळती होत असेल, तर ते देखील त्याच्या पांढऱ्या रंगामुळे सहज नजरेस पडते.

ही तर झाली विमान पांढरे असण्याची वैज्ञानिक कारणे! पण त्यासोबतच विमानाचा रंग पांढरा असण्यामागे काही व्यावहारिक कारणे देखील आहेत. विमानांचा रंग पांढरा असणे विमान कंपनीसाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरते.

 

airplanes-inmarathi05
businessinsider.in

 

विमान फारच मोठ्या आकाराचे असते. त्यामुळे त्याला पेंट करणे म्हणजे काही सोपे काम नाही. कुठल्याही जम्बोजेट प्लेनला पेंट करण्यासाठी विमान कंपनीला खूप खर्च करावा लागतो. तसेच ह्यासाठी खूप वेळ देखील लागतो.

विमानाला सतत ऊन, वारा, पाऊस ह्यांचा मारा सहन करावा लागतो. ह्यात जर विमानाला इतर कुठला रंग दिला गेला तर तो खूप लवकर फिक्कट पडायला लागतो.

म्हणजेच, रंगीत विमानाचे आकर्षक रूप टिकवणे फारच खर्चिक आणि वेळखाऊ ठरते.

कारण कुठलाच रंग उन, वारा आणि पाऊस ह्यांचा मारा सहन करून जास्त काळ टिकू शकत नाही. मग अशात त्याला वारंवार पेंट करण्याची गरज पडते. याउलट पांढरा रंग हा बराच काळ टिकून राहतो.

 

airplanes-inmarathi02
diretodapista.blogspot.in

 

रंगबेरंगी रंगात रंगलेलं आणि विविधी कलाकृती असलेलं विमान जर विकायला काढलं, तर त्याची किंमत पांढऱ्या विमानाच्या तुलनेत कमी असते. म्हणून विमान कंपनी विमानाचा रंग पांढराच ठेवतात.

आता जेव्हा केव्हा तुम्ही विमानात बसाल तेव्हा त्या विमानाच्या पांढऱ्या रंगामागे इतकी सगळी कारणे असतात हे तुमच्या नक्की लक्षात येईल.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?