'"अज्ञात द्रविड"- हा राहुल द्रविडसुद्धा तुमच्या-आमच्या मनात बसायला हवा..!

“अज्ञात द्रविड”- हा राहुल द्रविडसुद्धा तुमच्या-आमच्या मनात बसायला हवा..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारताने २०१८ क्रिकेटचा “अंडर – १९” चा विश्वचषक जिंकला. यामध्ये सर्वच युवा क्रिकेटर्सने खूप चांगली कामगिरी केली. विशेष म्हणजे, हा भारतीय संघ या विश्वचषकाच्या स्पर्धेमध्ये एकही सामना हरला नाही. त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला दोनदा नमवून विश्वचषकावर आपले नाव कोरले.

या अंडर – १९ च्या  विश्वचषकामधून भारताला येणाऱ्या काळासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू मिळाले आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

पृथ्वी शॉ, कमलेश नागरकोटी, शुभमन गिल, मनज्योत कालरा, अनुकूल रॉय या खेळाडूंची जगभरातील दिग्गज क्रिकेट खेळाडूंनी प्रशंसा केली.

सध्या सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेत पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल पाहायला मिळतात. शुभमन उत्तम कामगिरी करताना सुद्धा दिसतोय. नव्या खेळाडूंमध्ये सध्या त्याची जोरदार चर्चा आहे.

 

shubman-gill-inmarathi

 

राहुल द्रविडने या युवा भारतीय संघाला मोलाचे मार्गदर्शन दिले होते आणि त्यांच्या या विश्वासावर हा युवा संघ खरा उतरला. या युवा संघाने देखील त्यांचे कोच राहुल द्रविड याची मनपूर्वक प्रशंसा केली.

या संघाचा कर्णधार पृथ्वी शॉने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना कोच द्रविडविषयी सांगितले होते की,

“ते एक लेजंड आहेत. त्यांनी आमच्यासाठी असे वातावरण निर्माण केले की, तुम्ही त्यांच्याशी मित्रासारखे बोलू शकता. ते नेहमी एखाद्या सामान्य माणसासारखे राहतात. जिंकल्यानंतर त्यांनी आम्हाला खूप मोठे काहीतरी केले आहे असे समजून गर्व बाळगण्यापेक्षा जमिनीवरच राहण्याचा सल्ला दिला.”

 

Rahul Dravid.Inmarathi1

 

पुढे पृथ्वी शॉ म्हणाला की,

“त्यांनी मला सांगितले, क्रिकेट पिचवर ओपनरचे योगदान सर्वात महत्त्वाचे असते, कारण योग्यप्रकारे फलंदाजी केल्यानंतरच एक मोठे लक्ष मिळवता येते. त्यामुळे तुझे स्थान हे प्रत्येक फॉर्मेटसाठी खूप महत्त्वाचे आहे.”

आज शॉ आणि गिलसारखे खेळाडू संघात असणं याचं श्रेय द्रविडला जातं…

आज आपण याच दिग्गज राहुल द्रविडबद्दल काही महत्त्वाच्या गोष्ट जाणून घेणार आहोत. भारतीय क्रिकेटमधील ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेला द्रविड दिग्गज खेळाडू आणि उत्तम प्रशिक्षक असूनही आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत.

१. राहुल द्रविड आपल्या मुलांबरोबर विज्ञान प्रदर्शनात रांग लावून जातो. त्याच्या व्हीआयपी स्टेटसचा वापर करून सरळ प्रवेश मिळवणे त्याला शक्य आहे, पण तो असे करत नाही. तो मुलांबरोबर स्वतः देखील सामान्य माणसांसारखा रांगेमध्ये उभा राहतो.

 

Rahul Dravid.Inmarathi2

 

२. एकदा जेव्हा तो त्याच्या गंभीर आजारी असलेल्या चाहत्याला भेटायला जाऊ शकला नाही, तेव्हा त्याने स्काईपवरून त्याच्याबरोबर जवळपास तासभर गप्पा मारल्या. आणि तो तिथे पोहोचू शकला नाही, म्हणून त्याने त्याची माफी देखील मागितली.

 

 

३. जेव्हा एका विद्यापीठाने द्रविडला मानद पदवी बहाल केली, तेव्हा त्याने त्या पदवीला स्वीकारले नाही, कारण त्याला वाटले की अशीच पदवी घेण्यापेक्षा त्याला अभ्यास करून पदवी घ्यायला पाहिजे.

 

rahul-dravid-marathipizza03

 

. एकदा द्रविड सामान्य माणसांसारखा इकोनॉमी क्लासमध्ये प्रवास करत होता, तेव्हा त्याचा ऑटोग्राफ घेण्यासाठी लोकांची गर्दी जमा झाली. तेव्हा राहुलने मोठ्या विनम्रतेने लोकांना सांगितले की, त्यांनी दुसऱ्या प्रवाश्यांना जाण्यासाठी रस्ता द्यावा, तो नंतर सर्वांना ऑटोग्राफ देईल आणि त्यांच्याबरोबर फोटो देखील काढेल.

 

Rahul Dravid.Inmarathi3

 

५. एका कोरा युजरने राहुलबरोबर झालेल्या मुलाखतीबद्दल लिहिले होते, “राहुल माझ्याशी हात मिळवताना म्हटला की, ‘हाय, मी राहुल, तुम्हाला भेटून चांगले वाटले.” त्याच्या या बोलण्यावर मला आश्चर्य वाटलं, कारण ज्या व्यक्तीला संपूर्ण देशातील आणि जगभरातील क्रिकेट रसिक ओळखतात. असा माणूस एखाद्या सामान्य माणसासारखा आपला परिचय देतोय.”

 

rahul-dravid-marathipizza04

 

६. आपल्या स्वतःच्या मालकीच्या कितीतरी गाड्या असूनही राहुल अनेकदा बंगळूरुमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करताना दिसून येतो.

 

Rahul Dravid.Inmarathi4

 

७. एकदा एका कॅफेमध्ये गेल्यानंतर राहुलने जेव्हा पाहिले की, तेथील सर्व वेटर व्यस्त आहेत. तेव्हा त्याने स्वतः काउंटरवर जाऊन आपली ऑर्डर दिली आणि पैसे दिल्यानंतर आपल्या सीटवर बसला.

 

Rahul Dravid.Inmarathi5

 

८. एकदा जेव्हा  राहुलला नेत्रहीन क्रिकेटर्सना सल्ला देण्यास सांगण्यात आले, तेव्हा त्याने दिलेल्या उत्तराने तेथे उपस्थित सर्वांची मने जिंकली. त्याने उत्तर दिले की, “हे नेत्रहीन खेळाडू माझ्यापेक्षाही चांगले आणि मोठे काम करत आहेत. मला वाटते की, मलाच यांच्याकडून सल्ला घेण्याची गरज आहे.”

 

Rahul-Dravid.Inmarathi6

 

९. राहुलने गो स्पोर्ट्स फाउंडेशन जॉईन केले आहे, जेणेकरून तो पॅरालंपियन आणि ऑलिम्पियनना मदत करू शकेल.

 

Rahul Dravid.Inmarathi7

 

१०. राहुल द्रविडच्या वडिलांच्या मृत्यूच्या एक दिवसानंतर जेव्हा फॅन्स त्याच्या घराबाहेर जमा झाले होते. तेव्हा देखील राहुल त्यांना भेटला होता, कारण ते लोक खूप दूरवरून आले होते. एवढेच नाही तर राहुलने त्यांच्या बरोबर फोटो देखील काढले.

 

sportskeeda.com

 

असा हा आपल्या सर्वांचा लाडका राहुल द्रविड जेवढा क्रिकेटच्या मैदानावर शांत असायचा आणि आपला संयम न तुटू देता फलंदाजी करायचा. तसाच तो खऱ्या जीवनात देखील एकदम शांत आणि सामान्य लोकांसारखे जीवन जगतो.

अशा या ‘डाऊन टू अर्थ’ व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?