' मोकळा वेळ आहे? मग या ५ भन्नाट “शॉर्टफिल्म्स”बघायला अजिबात विसरू नका! – InMarathi

मोकळा वेळ आहे? मग या ५ भन्नाट “शॉर्टफिल्म्स”बघायला अजिबात विसरू नका!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शॉर्टफिल्म्स हा प्रकार आता काही नवीन राहीलेला नाही, कारण आता युट्यूब, नेटफ्लिक्स सारखे ऑनलाइन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म उपबद्ध झाल्याने शॉर्ट फिल्म्स हा प्रकार तसा बराच चर्चेचा आणि माहितीचा विषय झाला आहे!

पहिले शॉर्टफिल्म्स या फक्त फेस्टिव्हल्स किंवा एखाद्या समारंभातच दाखवल्या जायच्या, आणि त्यांचं प्रेक्षकवर्ग सुद्धा खूप खुंटलेला असायचा, अगदी भले ती शॉर्ट फिल्म कितीही इंटरनॅशनल फेस्टिव्हल फिरून आली असो!

 

short films inmarathi

 

 शॉर्टफिल्म विकत घ्यायला कुणीच डिस्ट्रिब्यूटर पुढे येत नसत, त्यामुळे कितीही चांगली कलाकृति असून सुद्धा ती कित्येक लोकांपर्यंत पोहोचत नसे!

पण गेल्या काही वर्षांपासून हे चित्र बदलताना दिसत आहे, आज या शॉर्टफिल्म्स पसंत करणारा असा एक स्वतंत्र प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे!

अनुराग कश्यप, नागराज मंजुळे, नावाजूद्दीन सिद्दीकी या अशा काही कलाकारांमुळे आणि दिग्दर्शकांमुळे अनेक शॉर्ट फिल्म्स बनत आहेत, लोकांपर्यंत पोहोचत आहेत, शॉर्टफिल्म स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत!

 

anuraag inmarathi

त्यामुळे एकंदरच आता या क्षेत्रात लोकं पैसा गुंतवायला सुद्धा मागे पुढे बघत नाहीत!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सनडान्स फेस्टिव्हल, कान्स फेस्टिव्हल अशा अनेक नावाजलेल्या फेस्टिव्हल्स मधून या शॉर्टफिल्म्स सिलेक्ट होऊन पारितोषिके मिळवत आहे!

 

short film festival inmarathi

राधिका आपटे हीची ‘अहल्या’ ही शॉर्टफिल्म किंवा जॅकी श्रोफ यांची ‘खुजली’ या शॉर्टफिल्म्स ची लोकांनी खूप प्रशंसा केली आहे, आणि आज युट्यूब सारख्या माध्यमातून ती फिल्म घराघरात पोहोचत आहे!

तीन तासांच्या चित्रपटात जे सांगता येत नाही ते कधीकधी ह्या काही मिनिटांच्या short films मध्ये सांगणं लोकांना जमतं. आणि ती short film खासंच होते. मोठमोठे अभिनेते आणि अभिनेत्री सुद्धा आजकाल short films कडे वळत आहेत. “थोडक्यात पण महत्वाचं” असा हा formula सध्या हिट आहे.

 

ahalya inmrathi

 

अशाच काही छानशा शॉर्ट फिल्म्स बद्दल आम्ही तुम्हाला काही रोचक गोष्टी सांगणार आहोत!

 

क्रिती – शिरीष कुंदर

२०१६ साली ही शॉर्ट फिल्म युट्यूब वर रिलीज झाली, प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान हिचा नवरा शिरीष कुंदर याने ही शॉर्टफिल्म दिग्दर्शित केली आहे!

शिरीष कुंदर याला मोठ्या पडद्यावर एकही चांगली हीट फिल्म न देता आल्याने त्याने त्याचा मोर्चा शॉर्टफिल्म कडे वळवला असावा अशी शक्यता वाटते!

एकंदरच ही शॉर्टफिल्म एक सायकोलॉजीकल थ्रीलर या प्रकारात मोडते, कथा वगैरे तरी बऱ्यापैकी जमून आलेली दिसते, पण सतत येणारे ट्विस्ट आणि कलाकारांचा अभिनय फारच अप्रतिम झाला आहे!

खरं काय खोटं काय? शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी suspense thriller शॉर्ट फिल्म. राधिका आपटे चा ग्लॅमरस लूक आणि मनोज वाजपेयींचा ताकदीचा अभिनय!

 

India Tomorrow – इम्तियाज अली

लव्ह आज कल, तमाशा,जब वी मेट, रॉकस्टार, हायवे सारखे सिनेमे करणारा बॉलीवूड मधला एक अत्यंत उमदा आणि संवेदनशील दिग्दर्शक इमतीयाज अली कुणाला ठाऊक नाही?

 

imitiaz ali inmarathi

ही शॉर्ट फिल्म त्यानेच दिग्दर्शित केली असून या शॉर्ट फिल्म मधून त्याने देहविक्रीच्या दलदलीत फसलेल्या बायका आणि त्यांच्या नजरेतून एक वेगळीच कहाणी आपल्यासमोर मांडली आहे!

एकापेक्षा एक हीट सिनेमे देणारा इमतीयाज शॉर्टफिल्म च्या दुनियेत सुद्धा त्यांची ओळख जपून आहे!

एखाद्याच्या वरवरच्या देखाव्याला भुलून judge करू नये. कुणात काय टॅलेंट असेल ह्याचा अंदाज देखाव्या वरून येत नसतो! एका स्टॉक ब्रोकर ला ह्या शिकवणीचा चांगलाच धडा शिकायला मिळतो…नक्की बघा!

 

OUCH – नीरज पांडे

संगळ्यांपेक्षा हटके विचार करणारे आणि अ वेनसडे, स्पेशल २६, बेबी, असे हटके चित्रपट करणारे लेखक दिग्दर्शक नीरज पांडे यांची शॉर्टफिल्म ‘आऊच’! खरतर शब्द  तसा विचित्र वाटतो ना, पण शॉर्ट फिल्म सुद्धा तशीच धमाल आहे!

 

neeraj pandey inmarathi

 

यात सुद्धा तुम्हाला मनोज वाजपेयी यांचा कमाल अभिनय बघायला मिळेल, त्याचबरोबर ही शॉर्टफिल्म्स हलक्या फुलक्या विनोद निर्मितीतून एक वेगळच समाजप्रबोधन करू पाहते! युट्यूब वर ही फिल्म बघायला चुकवू नका अशी ही शॉर्टफिल्म आहे!

 

 

The dinner – नीरज उधवाणी

तुम्ही लग्न करताय पण खरंच त्यात तुम्ही योग्य जोडी आहात का? वेळीच तपासुन घ्या आणि निर्णय घ्या!

 

 

आणि सगळ्यात शेवटी, the Masterpiece!

Interior CAFE Night – अधिराज बोस

अधिराज बॉस दिग्दर्शित ही शॉर्टफिल्म मम्हणजे निव्वळ काही मिनिटांत तुम्हाला भावुक करून डोळ्यातून पाणी आणणारी अशी शॉर्ट फिल्म आहे, आपलं प्रेम जेंव्हा दूर जातं त्यानंतर होणारा त्रास, भावनांची गुंतागुंत आणि या सगळ्यातून उलगडत जाणारे एक हळवे कथानक म्हणजे ही शॉर्टफिल्म!

नासिरद्दीन शाह आणि शेरनाज पटेल यांचा क्लास अभिनय बघायचा असल्यास ही शॉर्टफिल्म चुकवू नका! अवश्य बघाच!

 

 

हे नितांत सुंदर अनुभव कसे वाटले नक्की कळवा

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?