'नामशेष होत असलेल्या पक्ष्यामुळे वाचलं ब्राझीलचं जंगल!

नामशेष होत असलेल्या पक्ष्यामुळे वाचलं ब्राझीलचं जंगल!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आयुष्य कोणत्या वेळी काय वळण घेईल कुणालाच माहित नसतं. आपण फक्त आपलं काम करत राहायचं आणि ते आपल्याला आपल्या ध्येयाकडे आपोआप घेऊन जातं. अगदी असंच झालंय अनिता स्टडर सोबत. पक्षीविद्यातज्ञ अनिता ह्यांना Forbe’s Black Bird ह्या पक्ष्याच्या अभ्यासासाठी ब्राझीलच्या जंगलात गेल्या होत्या. आधी कायद्याची विद्यार्थिनी…नंतर हॉटेल मध्ये waitress…आणि टॅक्सी चालक म्हणून काम केल्यावर अनितांनी पक्षीविद्यातज्ञ विषयात graduate होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय केवळ अनिताच नाही – एका नामशेष होऊ शकणाऱ्या पक्ष्याच्या प्रजातीस आणि अक्ख्या जंगलाच्या उत्थानास कारणीभूत ठरला!

 

anita-e-equipe

 

अनिता मूळच्या स्विझरलँड च्या. त्यांना 1981 साली Pera Talhada च्या जंगलात गेल्या असतांना Forbe’s Blackbird ह्या पक्षाने भुरळ पाडली. अनिताना त्यांच्या एका मार्गदर्शकाने त्यांचं हे वेड बघून त्यांना मास्टर्स साठी हा विषय उत्तम असल्याचं सांगितलं. पण जर करायचं असेल तर लवकरात लवकर हालचाली कराव्या लागतील नाहीतर येत्या दहा वर्षात हा पक्षी तर नामशेष होईलच त्यासोबत हे जंगल पण राहणार नाही. इथे जंगलातील पक्षांबरोबर काही दुर्मिळ वनस्पती सुद्धा नामशेष होण्याच्या धोका होता.

अनिता म्हणतात –

ती माझ्या तोंडावर बसलेली चपराक होती!

 

“जंगले वाचवा” हा नारा असलेल्या अनिता ह्यांची हीच परीक्षा होती. पक्ष्याचा अभ्यास करायचाय – पण तो संकटात आहे – त्याला वाचवायचं असेल – तर जंगल वाचवावं लागेल !

ज्या लोकांना मी माझ्या ह्या जंगल वाचवण्याच्या कल्पनेबद्दल सांगितलं त्यांनी प्रत्येक वेळी हे शक्य नाही. तुम्ही जंगल वाचवू शकत नाही असंच उत्तर दिलं. पण जेवढं ते ‘शक्य नाही’ म्हणायचे तेवढीच माझी इच्छा तीव्र होत जायची. कारण एक नव्या उमेदीची शास्त्रज्ञ म्हणून मी एका लोप पावत असलेल्या विषयावर अभ्यास कसा करू शकते? आता हा पक्षी नामशेष नं होणं माझी गरज बनली होती.

 

02-rolex-studer-ngsversion-1476448565023-adapt-945-1

 

अनितांनी कंबर कसली. वृक्षांच्या बिया, रोपटे आणि अजून नवनवीन प्रजातींच्या झाडांची रोपे मिळवू लागल्या. त्यांच्या आजपर्यंतच्या सगळ्या ज्ञानाच्या जोरावर त्यांनी Pedra Talhada जंगलाला वाचवण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यांनी हे सगळं एकटीनेच करायला सुरुवात केली का? अर्थातच, नाही. त्यांच्याकडे एक फौज होती – जवळच्या गावातली मुले.

स्टडर आणि मुलांनी मिळून ट्री क्लब काढले. आणि काम सुरु झाले.

 

07-rolex-studer-ngsversion-1476448560512-adapt-945-1

 

जागेच्या मालकांना जंगलाची जागा देणे हे फक्त आणि फक्त पैशे गमावण्यासारखं वाटू लागलं. पण एक पूर आला आणि ह्या विरळ जंगलांमुळे जवळपास 150 घरं उध्वस्त झाली. ह्यावरून जागेच्या मालकांनी धडा घेतला आणि ह्या कार्यात सहभागी झाले.

अनितांच्या कामाची व्यापकता बघून ब्राझीलच्या सरकारने 1989 साली, Pedra Talhada ह्या जंगलाचा 11000 एकर भाग हा जैविक विविधता आणि त्यांचं रक्षणासाठी राखीव ठेवन्याचा निर्णय घेतला. स्टडर ह्यांच्या मते हा त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दिवस होता!

हळूहळू 10,000 पेक्षा जास्त स्वयंसेवक ह्या संस्थेत कामाला आले. आणि ब्राझीलच्या 26 राज्यांमध्ये विविध ठिकाणी नर्सरी उघडण्यात आल्या आहेत. ह्या कामाला अजून मदत मिळावी, वृक्ष लागवाडीसोबत त्यांच्या वाढीसाठी अनिता ह्यांनी एक संस्था स्थापन केली तिचं नाव Nordesta Reforestation and Education Association आहे. ही संस्था वृक्षालागवाडीसोबत सौरऊर्जेचा सुद्धा पुरस्कार करते. सौर उर्जेतून बनलेल्या विजेचा पुरवठा ब्राझीलच्या गावांतील शाळांना आणि दवाखान्यांना होतो.

 

01-rolex-studer-ngsversion-1476448567253-adapt-885-1

 

ब्राझील मध्ये एकूण 60 लाख झाडांची लागवड झाली असून अनिता ह्यांच्या BlackBird ची भरभराट होत आहे. नर्सरी मध्ये स्थानिकांना रोजगार निर्मिती झाली आहे. एकूणच अनिता ह्यांचा प्रवास रोमांचक आहे त्याबद्दल त्यांचे शब्द:

सगळ्यात मोठ्ठं काही होतं तर ते म्हणजे ‘Multiplier effect’ – आम्ही लोकांना जोडत गेलो. अनेक मुलांवर आम्ही निसर्गाचे संस्कार केले. कित्येक मुलं ह्या संस्कारांचे प्रसारक बनलेत. ब्राझील मध्ये जागरूकता वाढवतायत. ह्याने झाडांना अजून महत्व वाढतंय आणि दिलं जातंय.

 

त्यांना त्यांच्या मास्टर्सच्या प्रोजेक्ट बद्दल विचारलं तर म्हणतात की,

जर BlackBird आणि जंगलांसाठी काही केलं नसतं तर मी ब्राझील मधली उत्कृष्ट पक्षीविद्यातज्ञ झाले असते. पण जंगलाचं रक्षण हे त्याहून ही मोठं आणि महत्वाचं काम होतं.

 

Image & story Source

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 47 posts and counting.See all posts by abhidnya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?