' निर्भय: आत्मनिर्भर भारताची क्षेपणास्त्र निर्मितीची नवी पहाट – InMarathi

निर्भय: आत्मनिर्भर भारताची क्षेपणास्त्र निर्मितीची नवी पहाट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक – श्रीनिवास देशमुख 

तारीख २६ जानेवारी १९५०. भारताच्या पहिले अध्यक्ष, डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी दिल्लीच्या विविध रस्त्यांवरून प्रवास करत Irwin Amphitheatre, म्हणजेच आताचे ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडाभूमी गाठली.

भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येथेच जवळपास ३००० लष्करी अधिकारी आणि १०० विमाने संचलन केले. १९५० ते १९५४ या काळात हे संचलन दिल्लीच्या विविध भागात झाले.

 

first-republic-day-parade-26-jan-1950-inmarathi
s3.india.com

१९५५ पासून राजपथ हेच संचलनासाठी निश्चित करण्यात आले.

हे संचलन आपल्या देशाच्या परराष्ट्र नीतीचा एक अविभाज्य भाग आहे. तसेच भारताचे लष्करी सामर्थ्य, भारताची विविधता याचेही दर्शन या संचलनातून होते.

या वर्षीचे प्रजासत्ताक दिनाचे संचलन बऱ्याच कारणांनी खास होते. ASEAN ध्वज, ASEAN नेते, २० वर्षानंतर ITBP चा सहभाग, BSFच्या उंटांचा सहभाग, नौसेनेचे विक्रांत, रुद्र हेलिकॉप्टर आणि निर्भय cruise क्षेपणास्त्र. निर्भय cruise क्षेपणास्त्र येणाऱ्या काळात भारतीय लष्करी शक्तीला बलशाली करणार आहे.

या श्रेणीतल्या स्वदेशी क्षेपणास्त्र बनवण्याच्या जिद्दीत ही भारताची प्रथम पावले आहेत.

या तंत्रज्ञानात असलेल्या क्लिष्टपणामुळे, भारत काही मुठभर देशांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. असफलता हाती लागूनसुद्धा DRDO ने खचून ना जाता, निर्भयचे सफलतापूर्वक उड्डाण करून दाखवत, देशाच्या सामरिक शक्तीला एक नवे बळ दिले आहे. ते कसे ?

आपण ‘Credible Minimum Deterrence’ हे लष्करी धोरण पाळतो. याचाच अर्थ म्हणजे आपण आधी आण्विक शक्तीचा प्रयोग करणार नाही. पण, जर आपल्यावर कोणी तो केला तर आपल्याकडे शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी आवश्यक ते लष्करी सामर्थ्य आणि सामग्री पाहिजे.

 

RepublicDay-Parade-2013-inmarathi
defenceforumindia.com

म्हणूनच, आपल्याकडे काही विशिष्ट cruise आणि ballistic क्षेपणास्त्र आहेत. भारताने जरी जागतिक दर्जाच्या ballistic आणि tactical क्षेपणास्त्रे बनवली असली, तरी स्वदेशी cruise क्षेपणास्त्रे बनवण्यात भारताला बरीच वाट बघावी लागली आणि अपयशसुद्धा पचवावे लागले.

Cruise क्षेपणास्त्र म्हणजे नेमके काय? Ballistic क्षेपणास्त्रा पेक्षा काही वेगळं आहे का?

हो, cruise आणि ballistic क्षेपणास्त्रे हे क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. Ballistic क्षेपणास्त्र जमिनीवरून अथवा समुद्रातून सोडता येते. ही क्षेपणास्त्र एका विशिष्ट उंचीवर जाऊन अंडाकृती (Ellipsoid) पथात उडते. अशी क्षेपणास्त्रे वजनदार असतात आणि आण्विक अस्त्रे किंवा एकापेक्षा अधिक payload दूरवर वाहून नेऊ शकतात.

 

agni Ballistic missile InMarathi

 

यांचे पुढील वर्गीकरण म्हणजे short range ballistic क्षेपणास्त्र, medium range ballistic क्षेपणास्त्र (MRBM/ IRBM), long range strategic ballistic क्षेपणास्त्र आणि आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (Inter-continental ballistic क्षेपणास्त्र/ ICBM). याची उदाहरण म्हणजे आपले अग्नी क्षेपणास्त्रे !

Cruise क्षेपणास्त्र जमीन, हवा आणि पाणी (पाणबुडी/जहाज) येथून सोडता येतात. यांना स्वतःचे इंजिन आणि पंख असतात. यांचा संचार पृथ्वीच्या वातावरणात होतो.

 

cruise-missile-inmarathi
realclear.com

Ballistic क्षेपणास्त्र रडारमध्ये पकडल्या जाऊ शकतात, पण Cruise क्षेपणास्त्र त्यांच्या पृथ्वीच्या पृष्ठभागाला समांतर व अत्यंत कमी उंचीवरून उडण्याच्या क्षमतेमुळे (Terrain hugging flight) रडारमध्ये सापडत नाही. यांचे वर्गीकरण म्हणजे सबसॉनिक (ध्वनिच्या हवेतील वेगापेक्षा कमी वेग), सुपरसॉनिक (ध्वनिच्या हवेतील वेगापेक्षा अधिक वेगवान) आणि हायपरसॉनिक (ध्वनिच्या हवेतील वेगापेक्षा ५-१० पट).

नाझी जर्मनीचे V-१ आणि V-२ क्षेपणास्त्र म्हणजे जगातील पहिल्या Cruise क्षेपणास्त्रs. आपल्याकडे असणारे Brahmos, अमेरिकेचे Tomhawk, तसेच रशियाचे Kalibr याच प्रकारात मोडते.

निर्भय आणि कोल्ड स्टार्ट धोरण:

MTCR अंतर्गत असेलेले तंत्रज्ञानाचे दार अग्नीच्या सफल परीक्षणामुळे १९८९ साली बंद झाले. अमेरिकेने जगातील इतर राष्ट्रांवर दबाव आणत आपल्या देशाला या तंत्रज्ञानापासून दूर ठेवले. त्यातच सोविएट रशियाचे पतन झाल्यामुळे स्वदेशी तंत्रज्ञान निर्माण करणे जिकरीचे झाले. अजून धोका म्हणजे चीनने पाकिस्तानला Cruise क्षेपणास्त्र बनवण्याचे तंत्रज्ञान देऊ केले. पाकिस्तानचे बाबर म्हणजे तेच.

चीनच्या क्षेपणास्त्रावर पाकिस्तानचे नाव! स्वदेशी बनावटीचे लांब पल्ल्याचे Cruise क्षेपणास्त्र म्हणजे MTCR कराराला मुहतोड जवाब!

त्यात सुद्धा विघ्न आले. मार्च १२, २०१३ ला पहिलीच चाचणी हुकली. दुसरी चाचणी झाली १७ ऑक्टोबर, २०१४. ज्यात यश आले. तिसरी चाचणी (ऑक्टोबर १६, २०१५) पुन्हा हुकली. डिसेंबर २०१६ ला पुन्हा तेच! नोव्हेंबर २०१७ ला यश आले. निर्भय सबसोनिक प्रकारातले ७५०-१००० किमी पर्यंत मारा करू शकणारे, ज्यात आण्विक हल्लासुद्धा आहे, असे क्षेपणास्त्र आहे.

 

Nirbhay_cruise_missile-inmarathi
ssl.cf3.rackcdn.com

२९० किमी पल्ला असणार्या Brahmosच्या पुढे निर्भय असणार आहे. Brahmos हे शत्रूला चकित करण्यासाठी होईल तर निर्भय शत्रूला जोराचा हिसका देण्यासाठी होईल.

निर्भय शत्रू प्रदेशावर घिरट्या घालून आपले लक्ष्य भेदू शकते. घिरट्या घालण्याच्या या क्षमतेला ‘Loitering’ असे संबोधतात. निर्भय ज्यावेळेस घिरट्या घेत असेल, तेव्हा लष्करी अधिकारी निर्णय घेऊ शकतील की शत्रूभेद करायचा का नाही. याचा उपयोग कूटनीती आणि शत्रूला अडकित्त्यात धरण्यासाठी नक्कीच होऊ शकतो.

निर्भयच्या यशामुळे २०२२ नंतर आपली सर्व क्षेपणासत्र स्वदेशी असतील. येणाऱ्या काळात निर्भय पाणबुडीतून आणि आकाशातूनसुद्धा सोडता येणार आहे.

 

nirbhay-test-1 inmarathi

निर्भय सबसोनिक आहे. म्हणजे हे जास्त दूरपर्यंत जाऊ शकते आणि जास्ती दारुगोळा म्हणजेच paylod घेऊ शकते. Fire and Forget क्षमतेमुळे याच्या उड्डाणाला ठप्प किंवा याच्या मारक शक्तीला बाधित करता येत नाही. १०० मीटर किंवा त्यापेक्षा कमी उंचीवर हे उड्डाण घेऊ शकते (Tree Top क्षेपणास्त्र).

निर्भयने भारताच्या मारक क्षमतेला एक स्वस्त पर्याय दिला आहे. कारण, येणाऱ्या काळात निर्भय पाणबुडीतून, विमानातून ,जहाजातून आणि जमिनीवरूनसुद्धा सोडता येणार आहे.

निर्भय लाहोर, इस्लामाबाद, पेशावर, रावलपिंडी आणि कराची या शहरांवर हल्ला करू शकते. पाकिस्तानला काबूत ठेवण्य्साठी तयार झालेल्या कोल्ड स्टार्ट धोरणात निर्भय मोठी भूमिका बजावू शकते. कारण, एक तर हे रडारमध्ये सापडणार नाही. दोन, कमी वेळात लक्ष्य भेदू शकते (कोल्ड स्टार्ट धोरणात लष्कराची हळू जमवाजमव होते).

 

nirbhay-test-inmarathi
moneycontrol.com

तो पर्यत लष्कराचे विभिन्न अंग दुसरी फेररचना करू शकते. तीन, सबसोनिक असल्यामुळे दूरपर्यंत मोठा हल्ला, जसे पाकिस्तानचे महत्वाचे लष्करी ठाणे अथवा आण्विक ठाणे उडवू शकते. चार, पुढे कधी Surgical strike झाली तर थल सेनेसाठी रस्ता मोकळा करायला निर्भयचा उपयोग होऊ शकतो. यामुळेच, निर्भयला ‘force multiplier’ म्हणायला काही हरकत नाही.

आता शांततावादी जपानसुद्धा चीनच्या दादागिरीला आणि दक्षिण कोरियाच्या परीक्षणाला कंटाळून स्वतःचे Cruise क्षेपणास्त्र बनवण्याच्या विचारात आहे. यावरून ह्या वर्गातील क्षेपणास्त्र किती महत्वाचे आहे हे कळते.

===

InMarathi.com | वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com |त्या मतांशी सहमत असेलच असं नाही.आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?