हे दोघे कमवत आहेत वर्षाला तब्बल दोन कोटी, फक्त निर्माल्य गोळा करून, वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
व्यवसाय करणे कधी सहज शक्य होत नाही, त्यासाठी खूप मेहनत आणि त्याचबरोबर पैशांचे पाठबळ असणे गरजेचे असते. व्यवसाय करण्याच्या नवनवीन कल्पना नेहमीच अनेक लोकांच्या डोक्यामध्ये येतात, काही त्यामध्ये यशस्वी होतात तर काही अयशस्वी होतात.
तुम्ही एखादा व्यवसाय करायचे ठरवले, तर तुम्हाला त्याच्यासाठी लागणारा खर्च आणि भविष्यात होणार फायदा व तोटा यांचा अंदाज लावणे गरजेचे आहे.
कधी – कधी लोक जास्त भांडवल लागणारा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत नाहीत. कारण जास्त भांडवल लागणाऱ्या व्यवसायामध्ये फायदा जरी जास्त असला, तरी त्याचे नुकसान देखील तेवढेच भारी पडू शकते.
त्यामुळे लोक कमी भांडवल लागणारा व्यवसाय सुरु करतात. पण व्यवसायाची कल्पना चांगली नसली, तर ते चालणे खूपच अवघड असते.
पण जर तुमच्या व्यवसायाची संकल्पना चांगली असेल, तर तुम्ही कमी भांडवलामध्ये खूप नफा मिळवू शकता. याचेच एक उत्तम उदाहरण कानपूरमधील दोन युवकांनी दिले आहे.
त्याच्या या भन्नाट कल्पनेमुळे खूप कमी भांडवलामध्ये त्यांनी एक व्यवसाय सुरु केला आणि ते आज कोटींमध्ये नफा मिळवत आहेत.
नदीमध्ये फेकली जाणारी फुले पाहून दोन मित्रांना एक अशी कल्पना सुचली, ज्याच्यामुळे त्यांचे आयुष्यच बदलले. कचऱ्यामध्ये फेकले जाणाऱ्या या फुलांच्या मदतीने त्यांनी एक कंपनी उभी केली. ज्या कंपनीची सध्याची उलाढाल वर्षाला जवळपास दोन कोटींची आहे.
त्यांनी ‘हेल्प अस ग्रीन’ नावाची कंपनी सुरु केली आहे. ‘हेल्प अस ग्रीन’ कंपनीबद्दल कंपनीचा फाउंडर अंकित अग्रवालने सांगितले कि, कानपुरपासून २५ किमी दूर असलेल्या भौंती गावामध्ये त्यांचे ऑफिस आहे.
पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत शहरातील २९ मंदिरांमधून दररोज जवळपास ८०० किलो टाकून दिलेली फुले एकत्र केली जातात आणि त्यांना अगरबत्ती आणि जैविक वर्मी कंपोस्टमध्ये बदलले जाते.
यामुळे नदी-नाल्यांमध्ये घाण पसरत नाही. यातूनच या कंपनीचा व्यवसाय सुरु झाला.
अंकितने याबद्दल सांगितले की,
“मी माझ्या मित्राबरोबर २०१४ मध्ये बिठूर (कानपुर ) मध्ये मकर संक्रातीच्या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर बनलेल्या मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी एकत्र निघालो होतो.
“गंगेच्या किनाऱ्यावर सडलेल्या फुलांना आणि त्याच्यामुळे अशुद्ध झालेल्या नदीचे पाणी पिताना लोंकाना पाहिलेले होते.
ही गोष्ट फक्त नदीमध्ये सडणाऱ्या फुलांचीच नाही, तर त्यावर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांची देखील आहे. जे पाण्यातील जीवनावर वाईट परिणाम करू करतात”
यापुढे सांगताना अंकित म्हणाला की,
“माझा मित्र गंगेकडे पाहताना मला म्हणाला, तुम्ही लोक यासाठी काही करत का नाहीत. तेव्हाच मनामध्ये एक कल्पना आली की, काहीतरी असे करूया ज्याच्यामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित होणे आणि लोकांना हे खराब पाणी पिण्यापासून वाचवणे ही दोन्ही कामे होतील. यानंतर आपल्या गंगेच्या तटावर शपथ घेतली की, आम्ही गंगेमध्ये टाकाऊ फुले पडू देणार नाही. यामुळे पंतप्रधान मोदींचे स्वच्छता अभियान देखील यशस्वी करता येईल.”
लोक वेडे म्हणत हसले होते.
अंकितने अकरावीमध्ये त्याच्याबरोबर शिकलेल्या करण रस्तोगी या २९ वर्षीय मित्राबरोबर याबद्दल चर्चा केली. त्यावेळी करण फॉरेनमधून शिक्षण घेऊन भारतामध्ये परत आला होता.
त्या दोघांनी गंगेमध्ये फेकल्या जाणाऱ्या फुलांबद्दल चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ठरवले की, नद्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रदूषणमुक्त करण्यासाठी काहीतरी वेगळे करावे लागेल.
जेव्हा त्यांनी लोकांना सांगितले की, ते नद्यांना फुलांमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून वाचवण्यासाठी काही वेगळे करू इच्छित आहेत. तेव्हा लोकांनी त्यांना वेडे म्हणून त्यांची मस्करी केली. पण त्यांनी कोणाचीही पर्वा केली नाही.
७२ हजारांमध्ये सुरु केली कंपनी
अंकितने सांगितले की,
“२०१४ पर्यंत मी पुण्यामधील एका सॉफ्टवेयर कंपनीमध्ये ऑटोमेशन साइंटिस्टच्या स्वरूपात काम करत होतो. तर करण हा मास्टर्सच्या शिक्षणानंतर भारतामध्ये येऊन आपले स्वतःचे काम करत होता.”
अंकित आणि करण यांनी आपली जुनी कामे सोडून २०१५ मध्ये ७२ हजार रुपयाच्या भांडवलामध्ये ‘हेल्प अस ग्रीन’ कंपनी लॉंच केली. या दरम्यान त्यांना ओळखणारे लोक त्यांना वेडे म्हणत होते.
दोन महिन्यानंतर ते आपले पहिले वर्मी कंपोस्ट उत्पादन घेऊन आले. ज्याला त्यांनी ‘माती’ असे नाव दिले.
या कंपोस्टमध्ये १७ नैसर्गिक वस्तू आहेत. ज्यामध्ये कॉफीच्या स्थानिक दुकानांमध्ये फेकण्यात आलेल्या कॉफीचा गाळ देखील आहे. काही काळानंतर आयआयटी कानपुर देखील आर्थिक सहाय्यासह यांच्याबरोबर जोडली गेली.
काही काळानंतर त्यांची ही कंपनी कानपूरच्या सरसौल गावामध्ये पर्यावरणाला अनुकूल असणाऱ्या उदबत्त्या बनवायला लागली.
उदबत्तीच्या डब्ब्यांवर देवांचे फोटो असल्याने त्यांना कचरपेटीमध्ये फेकण्यास श्रद्धाळूंना अडचण येत असे. त्यामुळे हेल्प अस ग्रीनने उदरबत्ती या तुळशीच्या बियांपासून तयार करण्यात आलेल्या पेपरमधून विकण्यास सुरुवात केली.
आज आहे २ कोटींपेक्षा जास्त उलाढाल
अंकित अग्रवालने सांगितले की,
“त्यांची कंपनी २०,००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे. त्यांच्या कंपनीमध्ये ७० पेक्षा जास्त स्त्रिया काम करतात आणि त्यांना दररोज कमीत कमी २०० रुपये मजूरी मिळते.
या त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल सध्या जवळपास सव्वा दोन कोटींपेक्षा जास्त आहे. कानपूर, कन्नौज, उन्नाव यांच्या व्यतिरिक्त इतर काही ठिकाणी देखील त्यांचा व्यवसाय पसरलेला आहे.
२९ मंदिरांमधून दररोज जवळपास ८०० किलो टाकाऊ फुले एकत्रित केली जातात आणि त्यानंतर त्यांना अगरबत्ती व जैविक वर्मी कंपोस्टमध्ये रुपांतरीत येते.
पहिल्यांदा त्यांच्या टीममध्ये दोन लोक होते. आज नऊ लोक आहेत. आज त्यांच्या ‘हेल्प अस ग्रीन’ या कंपनीला आयआयटीकडून चार कोटींपेक्षा जास्त रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.
अशाप्रकारे एका भन्नाट कल्पनेमुळे या २८ वर्षीय तरुणाने कमी भांडवलामध्ये जास्त नफा मिळवणाऱ्या व्यवसायाची निर्मिती केली आणि त्याचबरोबर पर्यावरणाला सुरक्षित ठेवण्यासाठी देखील हातभार लावला.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Would like to contribute to this great initiative. Probably starting from my local area.
Very nice activity I also interested in this project please guide me
Give me mobail number
I’m interested in this project please guide me.
plz share ur mobile number pls.
I am interested in this project please guide me,and send your mob. No. Pls,
I’m interested in this project please guide me.plz share ur co.number pls.
I am in interested in this porjoct plz guide plz share your number .
Mo no 8105348645
Very Nice invention
Very nice i am intrested in this project pl guid me and help me . give me your mobile no whatsup no
Very nice sir I glad to meet u sir I am intrestested plzz give contact no plzz sir
I am interested for this project in pune region. Pls give me idea … Waiting for ur reply.
Thanks.
Nice work and I am interested in this project
That’s amazing!
I’ve a strong desire to start such social entrepreneurial venture in Pune city. We’ve 4 main rivers flowing through our twin cities and 2 most sacred, holy places called as Dehu and Alandi so obviously huge Garland’s, flowers in turn becomes wet waste. I’m currently in to business but wish to start this as I care for our Rivers, Oceans and in totality our environment.
I am also interested in this..i am from aurngabad Maharashtra… Please guide me if possible
I am interesting of this Project …plz guide us
I am also interested in this. Pls guide us
Hi Sir.
Really inspiring innovative.
I really thankful if you help me in this business.
Please share your valuable ideas n thoughts so I can think and try to take positive approach on the same.
Again thank you…
Please find below contact details.
Sunil D. Mahajan
Mob. No. 9167905541
E-mail id : sdmahajan7@gmail.com
Can u help me in helping the community and environment with your project in our locality.
8369155998 is my number Abhishek
plz share the contact number on 8999197506
I am interesting of this Project …plz guide us
Please sir contact us
I also interested u r project tn tnk ful Gide line nd ur mo no send
hi sir i am so much interested to start this project in JV with you in nasik city.
I am also interested in please guide mi
I am staying in Mumbai
My mobile number 8828784472
Can You help .me to expand this business Mumbai
Hi sir nice idea can I joint u in this project or give me suggestions how to start this business pl