' इंग्रजांच्या सोयीसाठी बजेट दुपारी; अशी बदलली NDA सरकारने ५० वर्षांची प्रथा!

इंग्रजांच्या सोयीसाठी बजेट दुपारी; अशी बदलली NDA सरकारने ५० वर्षांची प्रथा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बजेट हा प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. सरकारसाठी आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचा तर सामान्यांसाठी खर्चाचे गणित मांडणारा हा विषय अनेकदा वादाचा मुद्दाही ठरतो.

दरवर्षी सादर केलं जाणारं बजेट कधीपासून सुरु झालं? त्याबरोबर अनेक प्रथा आहेत त्या कोणत्या? हे जाणून  घेणे मोठे रंजक आहे.

 

actors inmarathi

 

एक वेळ होती जेव्हा आपलं बजेट सकाळी नाही तर सायंकाळी जाहीर केले जात होतं आणि तेही बरोबर ५ वाजता.

बजेट जाहीर करण्याची ही परंपरा १९४७ च्या आधीची आहे. म्हणजेचं हे बजेट तेव्हापासून चालत आलेलं आहे जेव्हा आपण गुलामगिरीत होतो. तेव्हा भारतावर ब्रिटीशांचे राज्य होते. त्यामुळे हे बजेट भलेही भारताचं असेलं तरी ते त्यांच्या सोयीनुसार सादर केलं जायचं.

जेव्हा भारतात सायंकाळचे ५ वाजायचे तेव्हा ब्रिटन मध्ये सकाळचे ११:३० वाजत असत.

यावेळी ब्रिटीश संसदेत हाउस ऑफ कॉमन्स म्हणजेच तिथल्या लोकसभेचे कामकाज सुरु व्हायचं. त्यामुळे ते भारतात सादर होणारं बजेट रेडीओवर ऐकू शकतील म्हणून बजेट सायंकाळी ५ वाजता सादर केलं जायचं.

 

Morarji-Desai-inmarathi

 

त्यानंतर भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला, पण तरी देखील बजेट सायंकाळी सादर करण्याची प्रथा सुरूच राहिली.

बजेट दिवसाच्या कुठल्याही तासाला सादर झालं तरी काय फरक पडतो? फक्त बजेट सादर व्हायला पाहिजे. आपण असाच विचार करतो. पण तसं नाहीये. आपण भलेही केवळ बजेट ऐकत असू पण ते तयार करण्यासाठी अर्थमंत्र्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जर बजेट सायंकाळी ५ वाजता सादर झालं, तर वित्तमंत्री दिवसभर त्याच्या कामात व्यस्त असत. एकदा संसदेत बजेट सादर केल्यानंतर त्यांना प्रसारमाध्यमांसाठी देखील वेळ काढावा लागत असे आणि ह्या पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देत देत मध्यरात्र होऊन जात असे. त्यामुळे बजेट सायंकाळी सादर करणं हे वित्त मंत्र्यांसाठी थकवणारे असायचंं.

 

yashwant-sinha-inmarathi02

म्हणून यशवंत सिन्हा यांनी वित्त मंत्र्यांना ह्या समस्येतून बाहेर काढण्याचा विचार केला. ते अटल बिहारी वाजपेयी ह्यांच्या एनडीए सरकारमध्ये वित्तमंत्री होते. त्यांनी १९९९ च्या जानेवारीपासूनच वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना बजेट सादर करण्याचा वेळ बदलण्यावर विचार करण्यास सांगितलं.

तेव्हाचे वित्त सचिव विजय केळकर यांचे देखील असं मानणं होतं की, बजेट हे सकाळी जाहीर व्हायला हवं आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना देखील हा प्रस्ताव आवडला.

 

yashwant-sinha-inmarathi01

ह्यानंतर, यशवंत सिन्हा यांनी ह्याबाबत एक पत्र लोकसभा आणि राज्यसभेच्या अध्यक्षांना लिहिलं. ज्यामध्ये अशी विनंती करण्यात आली होती की, बजेट च्या दिवशी सकाळी ११ वाजता होणाऱ्या प्रश्नांच्या तासाला रद्द करण्यात यावे. आणि त्यांची ही विनंती स्वीकारण्यात आली.

ज्यानंतर २७ फेब्रुवारी १९९९ साली सकाळी ११ वाजता वर्ष १९९९-२००० चं बजेट सादर करण्यात आलं.

सायंकाळी नाही तर सकाळी बजेट सादर करण्याची ही प्रथा यशवंत सिन्हा यांनी सुरु करत, ब्रिटीशांच्या प्रथेवर पूर्ण विराम लावला.

 

yashwant-sinha-inmarathi

 

वेळेनुसार ह्यात आणखी काही बदल देखील झालेत. आधी एकाच ठिकाणी हिंदी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषेत बजेट लिहिले जायचे. ज्यामुळे त्या पानांची जाडी खूप जास्त असायची. त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी साठी दोन वेगवेगळ्या प्रत केल्या जाऊ लागल्या.

त्यासोबतच बजेट सोबत येणाऱ्या इतर कागदपत्रांना वेगवेगळे रंग देण्यात आले. ह्याआधी सर्व कागदपत्र हे केवळ पांढऱ्या रंगात असायचे त्यामुळे त्यात कधी कधी कन्फ्युजन व्हायचे.

आता यासाठी लाल, नारंगी आणि निळ्या रंगाचा वापर केला जातो. जेणेकरून बजेट सादर करताना कुठलेही कन्फ्युजन राहू नये.

२०१६ पर्यंत हे बजेट फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सादर केल्या जायचं पण आता ते फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी सादर केल्या जाते, ज्यामुळे बजेटवर सर्व काम पूर्ण करून १ एप्रिलच्या आधी ते सर्व सरकारी विभागांना पोहोचविण्यात येईल.

ज्यामुळे सर्व सरकारी विभागांना नवीन बजेटविषयी संपूर्ण माहिती असेल आणि त्यानुसार ते नवीन वित्तीय वर्षातील योजना बनवू शकतील.

 

halva ceremony inmarathi

 

बजेटमध्ये, बजेट सादर करण्याच्या वेळेत, तारखेत अनेक बदल झाले. पण एक प्रथा अशी आहे ज्यात अजूनही काहीही बदल झालेला नाही. ती प्रथा म्हणजे बजेट आधी होणारी हलवा सेरेमनी.

बजेट सदनात सादर करण्याआधी तो एक महत्त्वपूर्ण आणि गोपनीय दस्तऐवज असतो. त्यामुळे त्याला वित्त मंत्रालय स्वतःच्या प्रेसमध्ये छापतं.

एकदा का बजेट छापलं  की त्यानंतर त्या संबंधित कुठलाही कर्मचारी अथवा अधिकारी मंत्रालय परिसरातून बाहेर जाऊ शकत नाही. त्याचं खाणे-पिणे सर्व आतच होत असते.

बजेटच्याबद्दल अशा अनेक गमतीदार परंतु माहित नसलेल्या गोष्टी तुम्हाला या लेखात वाचता येतील: असा तयार केला जातो अर्थसंकल्प…!

ह्या महत्वपूर्ण कामाला सुरवात करण्याआधी सर्वांना हलव्याची मेजवानी दिली जाते, ज्याला हलवा सेरेमनी म्हणतात. ह्या कार्यक्रमात वित्त मंत्री तसेच वित्त मंत्रालयाचे इतर सर्व बडे अधिकारी सहभाग घेत असतात. भारतासारख्या खंडप्राय देशाचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करताना अशा अनेक गोष्टी पडद्यामागे घडत असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?