' भारतीय क्रिकेटमधील "या" भन्नाट गोष्टी कदाचित तुम्हाला माहितच नसतील...

भारतीय क्रिकेटमधील “या” भन्नाट गोष्टी कदाचित तुम्हाला माहितच नसतील…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतीय क्रिकेट संघ अनेक चढउतारांचे डोंगर पार करत स्वतःचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले स्थान पक्के करत आला आहे. क्रिकेटला खूप मोठा इतिहास लाभला आहे.

मोठमोठ्या दिग्गज खेळाडूंनी आपल्या खेळाने भारतीय क्रिकेटला एक वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवले आहे. आज आपण याच भारतीय क्रिकेटबद्दलची काही तथ्य जाणून घेऊया, जी कदाचित तुम्हाला माहित नसतील.

 

१. सचिन तेंडुलकर हा भारताकडून खेळण्यास सुरुवात करण्याच्या आधी एकदा पाकिस्तानसाठी खेळला होता.

१९८७ साली ब्रेबॉन स्टेडियमवर भारत पाकिस्तान यांच्यात झालेल्या सर्व सामन्यात हा प्रकार घडला होता.

 

sachin-tendulkar-inmarathi

 

त्यावेळी सचिन तेंडुलकर मैदानात पाकिस्तानकडून बदली क्षेत्ररक्षक म्हणून उतरला होता.

 

२. भारतीय संघ हा जगातील असा पहिला संघ आहे, जो कसोटी सामन्याच्या एका दिवसात दोनदा संपूर्ण संघ बाद झाला. १९५२ मध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड येथे इंग्लंड विरुद्ध खेळताना घडले होते. अशी नामुष्की सर्वप्रथम भारतावर ओढवली होती.

भारताव्यतिरिक्त झिम्बाब्वे सांगावर दोनदा आणि नव्याने कसोटी खेळू लागलेल्या अफगाणिस्तान संघावर एकदा अशी वेळ आलेली आहे. अफगाणिस्तान संघाने भारताविरुद्ध हा दिवस पाहिला आहे.

 

Unknown Facts About Indian cricket History.Inmarathi1

 

३. व्हेरी व्हेरी स्पेशल या टोपण नावाने ओळखला जाणारा भारताचा फलंदाज.

 

vvs-laxman-inmarathi

 

व्ही. व्ही. एस लक्ष्मण हा असा एकमेव भारतीय क्रिकेट खेळाडू आहे, जो १०० कसोटी सामने खेळून देखील विश्वचषकाचा एकही सामना खेळलेला नाही.

 

४. आपली धडाकेबाज फलंदाजी आणि खास “हेलीकॉप्टर शॉट” साठी प्रसिध्द असणारा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार! महेद्रसिंग धोनी.

 

ms-dhoni-inmarathi

 

धोनीने आशिया खंडाच्या बाहेर, म्हणजे श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश वगळता इतर ठिकाणी एकदिवसीय सामन्यांमध्ये एकही शतक झळकावले नाही आहे.

 

५. क्रिकेटचा देव म्हणून सगळीकडे प्रसिद्ध असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा आपल्या रणजी करंडक क्रिकेट कारकिर्दीमध्ये फक्त एकदाच शून्यावर बाद झाला आहे.

 

Unknown Facts About Indian cricket History.Inmarathi2

 

त्याला शून्यावर बाद करणारा त्यावेळचा साधा तरुण गोलंदाज आणि आताचा भारतीय क्रिकेटमधील स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा आहे.

 

६. भारतीय क्रिकेटमध्ये लिटिल मास्टर म्हणून ओळखले जाणारे सुनील गावसकर हे आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये तीन वेळा कसोटी सामन्याचा पहिल्याच चेंडूमध्ये बाद झाले होते.

 

sunil-gavaskar-inmarathi

 

दुसरे म्हणजे सुनील गावसकर हे १९७५ च्या विश्वचषकामध्ये संपूर्ण ६० षटकांचा  सामना खेळले होते. पण त्यांनी  या संपूर्ण इनिंगमध्ये फक्त ३६ धावा केल्या होत्या.

हा सामना इंग्लंड विरुद्ध खेळला गेला होता. या सामन्यात गावसकर नाबाद राहूनही हा सामना २०० धावा एवढ्या मोठ्या फरकाने गमवावा लागला होता.

 

७. भारत हा जगातील पहिला असा देश आहे, ज्याने क्रिकेटमधील ६० षटकांचा, ५० षटकांचा आणि २० षटकांचे विश्व चषक जिंकले आहेत. ६० षटकांचा विश्वचषक १९८३ मध्ये, ५० षटकांचा विश्वचषक २०११ मध्ये आणि २० षटकांचा विश्वचषक २००७ मध्ये जिंकला आहे.

 

Unknown Facts About Indian cricket History.Inmarathi3

 

८. आपल्या वादग्रस्त कारकिर्दीसाठी कायम चर्चेत राहिलेला माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन हा एकमेव फलंदाज आहे, ज्याने आपल्या पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये लागोपाठ तीन शतके लगावली होती.

 

azaruddin-inmarathi

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पणातच अशी बेजोड कामगिरी करून दाखवत त्याने अनेक समीक्षकांना आणि निवड समितीला आपली दखल घ्यायला भाग पाडले होते.

 

९. भुवनेश्वर कुमार हा फक्त दुसराच फलंदाज ठरला, जो एकही बॉल न खेळता शून्यावर बाद झाला. पण विशेष म्हणजे तो धावचीत झाला नव्हता. तो वाईड चेंडूला स्टम्प आउट झाला होता.

वाईडचा चेंडू हा चेंडू म्हणून गणला जात नाही. तो ‘अतिरिक्त’ म्हणून मोजला जातो. त्यामुळे गोलंदाजाने एकही बॉल न टाकता भुवनेश्वरला आउट केले असे म्हटले गेले.

 

bhuvaneshwar-batting-inmarathi

 

या आधी २० षटकांच्या क्रिकेट सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करताना विराट कोहली याने याच प्रकारे आउट केले. केविन पीटरसन हा इंग्लंडचा खेळाडू पहिला चेंडू वाईड टाकून त्याने आउट केला.

हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात केविनने जागा सोडली आणि मागे उभ्या असलेल्या धोनीने हातात सहज आलेल्या चेंडूने यष्ट्या उडवल्या. केविनला एकही चेंडू न खेळता बाद म्हणून घोषित करण्यात आले.

 

१०. भारताच्या क्रिकेट इतिहासात बंगालचे प्रोबिर सेन हे एकमात्र असे विकेट किपर आहेत, ज्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सर डॉन ब्रॅडमन या दिग्गज फलंदाजाला स्टम्प आउट केले होते.

 

probir-sen-inmarathi

 

११. बिशनसिंग बेदी यांनी एकदा स्वतःहून एकदिवसीय सामना गमावला. भारत – पाकिस्तान यांच्यामध्ये पाकिस्तानमध्ये एकदिवसीय सामना चालला होता.

त्यावेळी भारताला १४ चेंडूंमध्ये २३ धावा पाहिजे होत्या आणि भारताकडे अजून ८ गडी बाकी होते. त्यावेळी पाकिस्तानी संघाने सामना जिंकण्यासाठी खूप बाउन्सर टाकण्यास सुरुवात केली.

 

bishansing-bedi-inmarathi

 

खासकरून सर्फराज नवाझ असे करत होता. असे असताना देखील पंच हे होम टीमला पाठिंबा देत होते. त्यामुळे चिडून कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी आपल्या फलंदाजांना परत बोलवून सामना घोषित केला आणि सामना गमावला.

आपल्या काही दिग्गज फलंदाजांविषयी काही वेगळे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. समोर काय होईल याचा अंदाज लावणे या खेळात जवळजवळ अशक्य असते. त्यामुळे अशा अनेक अफलातून घटना क्रिकेटमध्ये घडत असतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?