' भारताचे टॉप पंतप्रधान : प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विश्लेषकाने तयार केलीये लिस्ट… – InMarathi

भारताचे टॉप पंतप्रधान : प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विश्लेषकाने तयार केलीये लिस्ट…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===  

भारताला राजकारणाचा खूप मोठा इतिहास आहे. भारताने स्वातंत्र्य मिळवल्यानंतर अनेक मोठमोठ्या राजनैतिक घडामोडी भारतामध्ये घडल्या. नेहरूंपासून आता मोदींपर्यंत सगळ्यांनीच आपापल्या परीने भारताच्या विकासामध्ये हातभार लावला.

भारताचे पंधरा पंतप्रधान होऊन गेले. मोदी हे भारताचे सोळावे पंतप्रधान आहेत.

 

Prime-Ministers-of-India-inmarathi

 

त्यातील चार भारतीय पंतप्रधानांची एक लिस्ट बालाजी विश्वनाथ ह्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विश्लेषकाने तयार केली आहे. क्वोरा वर “भारताचे टॉप ४ पंतप्रधान कोण?” ह्या प्रश्नाचं उत्तर देताना विश्वनाथ सरांनी ही लिस्ट दिली आहे.

एवढंच नाही, या लिस्टमध्ये त्याने या पंतप्रधानांची  भारतीय क्रिकेट जगतातील काही दिग्गज खेळाडूंशी फार खुमासदार तुलना केली आहे…!

बालाजी विश्वनाथ सरांनुसार जवाहरलाल नेहरू, अटल बिहारी वाजपेयी, पी.व्ही. नरसिंहराव आणि नरेंद्र मोदी हे भारतासाठी आतापर्यंतचे सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे, भारताचे टॉप ४ पंतप्रधान आहेत.

१. पंडित जवाहरलाल नेहरू

नेहरू हे भारतीय राजकारणातील गावस्कर आहेत. गावस्करने उखडलेल्या पिचवर धारदार गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांसमोर हेल्मेट न घालता फलंदाजी केली होती आणि भारताला जागतिक स्तराच्या लीगमध्ये स्थान मिळवून दिले.

त्याचप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरूंनी नुकत्याच स्वातंत्र्य मिळवलेल्या देशाची जबाबदारी सांभाळली होती. आपले महत्त्वपूर्ण सोबती पटेल आणि गांधीजी लवकर निधन पावल्यानंतरच्या खूप कठीण काळात त्यांनी देशाची धुरा उत्तमरीत्या सांभाळली.

त्यावेळी भारत बर्मा /पाकिस्तान सारखा विभाजित झाला असता किंवा त्याचा शेवट झाला असता. पण नेहरूंच्या शांत डोक्यामुळेच भारत देश म्हणून टिकू शकला.

 

Top 4 Prime Ministers of India.Inmarathi

 

नेहरूंनी हिंदू कोड विधेयक आणले, उत्तम धरणे बांधली आणि वीज प्रकल्प उभारले. महान शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. भारताला एकत्रित करण्यात मदत केली आणि गोव्यासारख्या ठिकाणाला भारताच्या नकाशावर आणण्यास यशस्वी झाले. तसेच त्यांनी जागतिक नकाशावर भारताबद्दल आदर निर्माण केला.

त्यांच्या या यशामुळे त्यांनी स्ट्राईक रेट कमी असूनही १७ वर्ष राज्य केले आणि तरी त्यांना त्यांच्या या कारकिर्दीत कुणीही आव्हान देणारे नव्हते आणि त्यांनी अजून काही वर्ष राज्य केले असते.

गावस्कर आणि नेहरू हे दोन्ही त्यांच्या वाईट कामगिरीसाठी लक्षात राहिलेले आहेत.

इंग्लंडच्या विरुद्ध खेळताना गावस्करने १७६ चेंडूंमध्ये फक्त ३६ धावा केल्या होत्या आणि एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात हळू खेळली गेलेली पारी म्हणून सर्वांच्या लक्षात आहे. तसेच काहीसे नेहरू यांचे चीन – भारत त्यांच्या युद्धाच्यावेळी झाले होते.

त्यामुळे त्यांना त्यांच्या यशाने न ओळखता, त्यांच्या चुकीच्या गोष्टींमुळे ओळखतात.

२. अटल बिहारी वाजपेयी

हे राजकारणातील राहुल द्रविड आहेत, कारण ते सर्वांचे चाहते आहेत, जसा द्रविड होता. ते शांत-संथ होते, सावध होते. पण एक महत्वाचे नेतृत्व म्हणून पुढे आले.

१९९८ मध्ये आशियाई आर्थिक संकटाच्या काळामध्ये त्यांनी भारतामध्ये दर्जेदार रस्ते विस्तारित केले आणि अर्थव्यवस्थेची उभारणी केली.

त्यांनी भारताला अणुअस्त्रांमध्ये सक्षम बनवले आणि जगाच्या पूर्व व पश्चिम दोन्ही भागांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित केले.

Top 4 Prime Ministers of India.Inmarathi1

 

हे सर्व असूनही, ते सामाजिक आघाडीवर अधिक काही करू शकले असते आणि भारताला अजून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळवून  देऊ शकले असते.

याच कारणामुळे २००४ मध्ये त्यांना सत्तेतून बाहेर काढण्यात आले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

३. पी.व्ही. नरसिंहराव

हे भारतीय राजकारणातील गांगुली आहेत. गांगुली हा जसा आक्रमक आणि unpredictable होता. तो काय करू शकेल याचा कधीही अंदाज लावता येत नसे. तसेच काहीसे पी.व्ही. नरसिंहराव यांचे आहे.

गांगुलीने जसा भारतीय क्रिकेटचा सध्याचा काळ घडवला तसेच काहीसे राव यांनी केले. अर्थव्यवस्था आणि परराष्ट्र धोरणातील त्यांनी खूप  धाडसी पावले टाकली होती.

त्यांनी दिवाळखोर राष्ट्राची धुरा हाती घेतली आणि त्याला आपल्या पायांवर उभं केलं.

 

Top 4 Prime Ministers of India.Inmarathi2

 

राव यांची पहिली तीन वर्ष खरोखर त्यांच्यासाठी सुवर्णकाळ होता. पण त्यांच्यानंतर शेवटच्या दोन वर्षात त्याची खूप घसरण झाली. त्यानंतर जेव्हा पुन्हा निवडणूक आली, तेव्हा ते आपला सुवर्णकाळ विसरले आणि आपल्या शेवटच्या दोन वर्षांमध्ये झालेल्या काही चुका सुधारू शकले नाही. त्यामुळे त्यांनी सत्ता गमावली.

राव यांची शेवटची दोन वर्ष ही गांगुलीच्या कारकीर्दीसारखीच होती. गांगुली जसा आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळामध्ये गोलंदाजांच्या शॉर्ट पिच गोलंदाजीला प्रतिसाद देऊ शकत नव्हता. तसेच काहीसे राव यांचे झाले होते.

४. नरेंद्र मोदी

मोदी हे भारतीय राजकारणातील विराट कोहली आहेत. मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये कोहली सारख्याच खूप संभाव्यता आणि खूप यश आहे. पण तरीही त्यांना कोहलीसारखेच लगेच पारखणे थोडे चुकीचे आहे.

मोदींना कर्णधार म्हणून घरच्या मैदानात उत्तम यश मिळाले, पण हे त्यांच्यासाठी पुरेसे नाही. मोदींना अजून काही आव्हाने पार करायची आहेत.

मोदींनी आतापर्यंत त्यांच्या कारकिर्दीमध्ये खूप मोलाचे आणि चकित करणारे निर्णय घेतले आहेत.

 

Top-4-Prime-Ministers-of-India.Inmarathi3.

 

त्यांच्या यशाबद्दल बोलताना, मोदी खरच आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जाऊ शकतात का – यावर आताच काही बोलणे चुकीचे आहे, कारण अद्याप त्यांना आपण असे पाहिलेले नाही. पण, ते आपल्या कारकिर्दीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करतील आणि ते एक मोठ्या नेत्याच्या रूपाने समोर येतील असा लोकांचा आशावाद आहे.

जाता जाता विश्वनाथ सरांनी एक खरपूस गुगली टाकली आहे –

“आपल्या पंतप्रधानांमधील “तेंडुलकर” कोण हे विचारू नका! कारण आपल्याला तेंडुलकर मिळालाच नाही.

जर मिळाला असता – तर आपण चीन ला कधीच मागे टाकलं असतं…!”

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?