' या सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा खाजगी डेटा इंटरनेटपासून वाचवू शकता..

या सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा खाजगी डेटा इंटरनेटपासून वाचवू शकता..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सोशल मीडियाचा वापर आजकाल आपण सर्वच करतो. असे खूपच कमी लोक तुम्हाला पाहायला मिळतील, जे या सोशल मीडियाचा वापर करत नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जगाशी जोडले जातो.

तसेच, आपण एखादी गोष्ट शोधण्यासाठी किंवा आपल्याला हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी गुगल आणि इतर काही इंटरनेटच्या सर्च इंजिनचा वापर करतो.

 

income from internet inmarathi

 

पण तुम्हाला हे माहित आहे का ? की हे सर्च इंजिन आणि सोशल मीडियाला तुमच्याबद्दल खूप काही गोष्टी माहित असतात. ज्या कदाचित तुमच्या खास मित्राला देखील माहित नसतील.

मग तुमच्याबद्दल किती माहिती सोशल मीडिया पोर्टलला किंवा तुमच्या सर्च इंजिनला माहित आहे, हे तुम्ही आठ दिवसांमध्ये स्वतःहून शोधू शकता. दररोज फक्त अर्धा तास घालवून तुम्ही ही माहिती मिळवू शकता.

डेटा डेटॉक्स या प्रोग्राममध्ये ही माहिती मिळवण्यासाठी काही ट्रिक्स दिलेल्या आहेत. ज्यांचा वापर करून तुम्ही इंटरनेटवर तुमची लीक होणारी माहिती वाचवू शकता.

१. शोध घेणे

 

Better digital life.Inmarathi1

 

तुम्ही दररोज ऑनलाईन सर्च इंजिनद्वारे किती वेळ ऑनलाईन असता हे पहिले जाणून घ्या. तुम्ही जेव्हा सर्च इंजिनद्वारे काही सर्च करता, ती माहिती तुमचे सर्च इंजिन स्टोर करते आणि दुसऱ्यावेळी सर्फिंग करताना तुम्हाला त्याच्याविषयीची काही माहिती सजेस्ट करते.

असे तुमच्याबरोबर देखील खूप वेळा झाले असेल की, तुमचे सर्च इंजिन तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सजेस्ट करत आहे. तुम्ही तुमची ब्राउझर हिस्ट्री जरी डिलीट मारली, तरी देखील हे सर्च इंजिन तुम्ही सर्च केलेल्या गोष्टी तुम्हाला सजेस्ट करतेच.

तुम्ही सर्च केलेल्या गोष्टींच्या संबंधित असणाऱ्या लिंक्स आणि इमेजेस तुम्हाला दाखवण्यात येतात.

२. सर्वकाही एकाच ठिकाणी

 

google_search 1 InMarathi

 

 

तुम्ही गुगलच्या क्रोम, डॉक्स, ट्रान्सलेट, जीमेल, युट्युब, मॅप्स यांसारख्या सुविधा वापरतात. म्हणेजच तुम्ही बहुतेक काम करण्यासाठी गुगलचा वापर करता. त्यामुळे तुम्ही गुगलला वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्सेस देता.

या ऍक्सेसमुळे गुगलला तुमच्याबद्दल खूप गोष्टी माहिती पडतात.

गुगलला अशा काही गोष्टी देखील तुमच्याबद्दल माहिती पडतात, ज्या कदाचित तुमच्या खास मित्राला देखील तुमच्याबद्दल माहित नसतील.

यावरून हे समजते की, तुम्ही स्वतःबद्दलची जी माहिती गुप्त ठेवू इच्छिता, ती माहिती गुगलकडे असू शकते!

३. फेसबुकला तुमच्याबद्दल काय माहित आहे ?

गुगलकडे जशी तुमच्याबद्दल काही माहिती असते. त्याचप्रमाणे फेसबुक सारख्या सोशल मीडियाकडे देखील तुमच्याबद्दल काही माहिती असते. याच माहितीच्या आधारे ते तुमच्या स्वभावाचा, आवडीचा आणि इतर काही गोष्टींचा अंदाज लावतात.

 

Facebook Artificial Intelligence InMarathi

 

तुम्ही डेटॉक्स प्रोग्रामद्वारे याबद्दल माहिती मिळवू शकता. तुमची फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टची माहिती फेसबुक साठवून ठेवते.

तुमची प्रोफाइल आणि तुमच्या पोस्टवरून फेसबुक तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावते.

या सर्वांवरून फेसबुक तुमच्याबद्दल योग्य ती माहिती जमा करते आणि त्यानुसार तुम्हाला जाहिराती वगैरे दाखवते.

४. सर्चिंग आणि सर्फिंग

प्रत्येकवेळी आपण इंटरनेटवर सर्फिंग आणि सर्चिंग करतच असतो. आपले काम असो किंवा नसो. तरीदेखील आपण इंटरनेटचा वापर करणे सोडत नाही.

इंटरनेटमुळे आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात हे बरोबर आहे. पण याच इंटरनेटमुळे आपल्या खाजगी गोष्टी इतर लोकांना समजण्याचा धोका निर्माण होतो.

 

google_search InMarathi

 

कधी – कधी आपण सर्फिंग करत असताना कोणत्याही आपल्याला नको असलेल्या साईट्स खुलतात आणि त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये किंवा संगणकामध्ये व्हायरस देखील जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सर्फिंग करताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही काही गोष्टी साफिंग करत असाल, त्या शक्यतो क्रोममधील इनकॉगिटो मोडवर सर्च कराव्यात.

५. कनेक्टिंग

तुमच्या मोबाईलसाठी कनेक्टिंग सुविधा खूप महत्त्वाची असते. आपण आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट चालू करण्यासाठी डेटा पॅक किंवा वाय – फायचा वापर करतो. पण कधी – कधी आपण इंटरनेटचा लाभ घेण्यासाठी मिळेल त्या वायफायला कनेक्ट करतो.

Better digital life.Inmarathi3
belatrixsf.com

 

हे खूप धोक्याचे असते. यामुळे तुमचे खाजगी चॅट्स किंवा इतर काही माहिती वायफाय इंटरनेट प्रोव्हायडरला मिळण्याचा धोका असतो.

तसेच, ब्लूटूथ, शेयर इट आणि इतर काही डेटा ट्रान्सफर करणाऱ्या सुविधांमधून देखील तुमचा डेटा लीक होण्याचा धोका निर्माण होतो.

त्यामुळे कधीही कोणत्याही वायफाय नेटवर्कला कनेक्ट करताना नक्की विचार करा आणि त्याची पूर्ण  डिटेल पहा.

६. मोबाईलमधील नको असलेले काढून टाकणे.

आपण डाउनलोड केलेलं काही ऍप्स आपल्याला मोबाईलमधील काही डेटा वापरण्यासाठी परवानगी मागतात. त्यावेळी आपण काहीही विचार न करता आपल्याला गरज असल्यामुळे अशा ऍप्सना परवानगी देतो. पण हे देखील तेवढेच धोक्याचे ठरू शकते.

 

Better digital life.Inmarathi4
mytechlogy.com

 

त्यामुळे गरज नसलेल्या ऍप्सना तुमच्या मोबाईलमधील डेटा वापरण्याची परवानगी देऊ नका. तुम्हाला जे गरजेचे ऍप्स आहेत आणि जे तुम्ही नेहमी वापरता असेच ऍप्स ठेवा. गरज नसलेले ऍप्स सहसा डाउनलोड करू नका आणि केलेत तर त्याचा वापर झाल्यावर ते मोबाईलमधून काढून टाका.

त्याचप्रमाणे या ऍप्समुळे तयार झालेला डेटा देखील मोबाईलच्या इंटरनल मेमरीमधून काढून टाका. त्यामुळे तुमचा मोबाईल अशा ऍप्सपासून सुरक्षित राहू शकेल.

या काही डेटा डेटॉक्स या प्रोग्रामने सांगितलेल्या ट्रिक्स वापरून तुम्ही योग्य ती खबरदारी घेऊ शकता आणि आपला खाजगी डेटा इतरांना किंवा इंटरनेट प्रोव्हायडरला माहित होण्यापासून वाचवू शकता.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?