' शुभ-अशुभाच्या पलीकडील डोळ्यांच्या “पापण्या” फडफडण्यामागेचे रंजक कारण – InMarathi

शुभ-अशुभाच्या पलीकडील डोळ्यांच्या “पापण्या” फडफडण्यामागेचे रंजक कारण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“काय माहित, आज काहीतरी वाईट होणार आहे तर…?”

ऑफिसमध्ये मध्ये बसल्या बसल्या पूजा स्वतःशीच बडबडत होती…

तेवढ्यात तिला स्वातीने विचारले, काय ग पूजे काय बडबडतिये…

“आग बघ न आज सकाळ पासूनच माझा उजवा डोळा फडकतो आहे नुसता, काय माहित काय होणार आहे आज?” पूजा उत्तरली…

“तर काय झालं, हे डोळा फडकणे वगैरे काही नसत ग… काही नाही होत त्याने… जस्ट चिल..!”

स्वाती पूजाला समजावत होती.

“तरी पण गं, डोळा फडकणे चांगल नसतं म्हणे…”

” नाही न होणार काही, काय फालतू विचार करत बसली आहे?”

स्वातीने यावेळी जरा चिडून सांगितले…

हे वरील संवाद जरी पूजा आणि स्वाती मधले असले तरी आपणही कधी ना कधी ह्यावर चर्चा केलीच असणार. जर कधी कुणाचा डोळा फडकत असेल तर त्याला आपण शुभ आणि अशुभ असे दोन तर्क जोडतो. उजवा डोळा फडकत असेल तर काहीतरी वाईट नक्की घडणार आणि जर डावा डोळा फडकत असेल तर तो शुभ संकेत असतो.

आता यात किती सत्यता आहे हे तर नाही माहित. हा पण तुमचा डोळा का फडकतो याच कारण आम्ही सांगू शकतो. आणि त्याचा ह्या शुभ किंवा अशुभशी काहीही संबंध नाही. तर त्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत.

 

eyelid-twitching-inmarathi00

डोळ्याचं फडफडणे याचा थेट संबंध तुमच्या आरोग्याशी आहे. तुम्ही नोटीस केले असेल की कधी कधी तुमचा डोळा हा अगदी काही वेळा करिता फडकतो, जर असं होत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. हे सामान्य आहे. पण तोच जर फार काळापर्यंत फडकत असेल तर मात्र ते गंभीरपणे घ्यायला हवे.

 

eyelid-twitching-inmarathi

डोळ्यांचे फडफडणे याला डॉक्टरी भाषेत ‘Myokymia’ असे म्हणतात. या स्थितीत डोळ्यांतील स्नायू आकुंचन पावतात.
आता असे का होत असेल, ते जाणून घेऊ…

 

eyelid-twitching-inmarathi01

 

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच तणावाला सामोरे जावे लागते. तणाव हा आजकालच सर्वात कॉमन आजार आहे. जेव्हा आपण कुठल्याही प्रकारच्या तणावाखाली असतो तेव्हा आपलं शरीर वेगवेगळ्याप्रकारे प्रतिक्रिया देते. डोळ्याचं फडफडणे हे देखील त्यापैकी एक.

 

eyelid-twitching-inmarathi02

 

अति प्रमाणात कॉम्पुटरचा वापर, कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्याने, कॅफिनचे जास्त प्रमाणत सेवन केल्याने तसेच काही औषधींमुळे आपले डोळे ड्राय होऊन जातात. त्यामुळे देखील आपले डोळे फडफडतात. त्याकरिता डोळ्यांची नीट काळजी घ्या त्यांना ड्राय होऊ देऊ नका.

eyelid-twitching-inmarathi03

ज्यांना व्हिजन संबंधी प्रॉब्लेम्स असतात, तर त्यांच्या डोळ्यांवर जास्त ताण पडतो. असे डोळ्यांना चष्मा लागणार असेल किंवा तुमच्या चष्म्याचा नंबर वाढला असेल तेव्हा होते. ह्या स्थतीत देखील आपला डोळा फडफडतो

 

eyelid-twitching-inmarathi09

दारूचे सेवन केल्याने देखील डोळे फडफडतात. जर तुमचे डोळे जास्त फडकत आहेत तर काही काळाकरिता दारूचे सेवन करणे टाळा. जर तिचे सेवन करणे बंद करू शकत असाल तर मग तर उत्तमच.

 

 

चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स, चॉकलेट यांच्यात कॅफिनचे प्रमाण अधिक असते. यांचे अतिप्रमाणात सेवेन केल्याने देखील तुमचे डोळे फडकू शकतात.

 

 

eyelid-twitching-inmarathi04

तणाव, झोप पूर्ण न होणे हे देखील डोळे फडफडण्याचे एक कारण असू शकते. म्हणून चांगली आणि पूर्ण झोप घेणे आवश्यक असते.
काही स्टडीनुसार जर शरीरात मॅगनेशिअमची कमतरता असेल तरी देखील आपले डोळे फडकतात.

 

eyelid-twitching-inmarathi05

ज्या लोकांना डोळ्या संबंधी एलर्जी आहे, त्यांना डोळ्यात खाज येणे, डोळे सुजणे, डोळ्यात पाणी येणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते. जेव्हा ते डोळे चोळतात तेव्हा त्यांचे डोळे फडकायला लागतात. हे त्यांना असलेल्या एलर्जी मुळेच होत असते.

 

eyelid-twitching-inmarathi06

सातत्याने कॉम्पुटर, मोबाईल किंवा टीव्ही बघितल्याने देखील डोळे फडकू शकतात. यापासून वाचण्याकरिता दर २० मिनिटांनी आपल्या डोळ्यांना तुमच्या कॉम्पुटर स्क्रीन पासून ब्रेक द्या.

 

eyelid-twitching-inmarathi10

 

तसे तर डोळे अगदी काही वेळाकरिता फडकतात. पण जर ते फार काळा पर्यंत फडकत असतील, तर ह्या स्थितीत तुम्हाला ‘Benign Blepharospasm’ आणि ‘Hemifacial spasm’ ह्याप्रकारचे डिसऑर्डर होऊ शकतात.

आपल्या शरीरात जे काही बदल होतात, किंवा आपण ज्या काही हालचाली करतो, जे काही घडते त्यामागे काही ना काही जीवशास्त्रीय कारणे असतात. त्याला उगाचच शुभ अशुभ सांगून इतरांची दिशाभूल करणे आता बंद करायला हवे…

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?