' कौरव पांडवांच्या एकुलत्या एक बहिणीची करुण कथा - जिला खुद्द अर्जुनानेच विधवा केले

कौरव पांडवांच्या एकुलत्या एक बहिणीची करुण कथा – जिला खुद्द अर्जुनानेच विधवा केले

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

महाभारत… हा एक असा ग्रंथ आहे ज्याबद्दल आपल्याला आजही संपूर्ण माहिती नाही. यात अनेक असे पात्र आहेत ज्यांच्या बद्दल अजूनही आपण ऐकलेले नाही.

जेव्हा केव्हा महाभारताचा विषय निघतो, तेव्हा आपल्यासमोर त्यातील मुख्य पात्र जसे की कृष्ण, धृतराष्ट्र, पांडु, गांधारी, कुंती, कौरव, कर्ण, पांडव आणि त्यांची पत्नी द्रौपदी हेच येतात.

आपण आजवर यांच्याबाबत अनेक कथा, आख्यायिका ऐकल्या वाचल्या असतील. पण काय महाभारतात केवळ हेच होते. तर नाही.

महाभारतात अनेक असे पात्र होते ज्यांच्याबद्दल आपल्याला माहित नाही.

अश्या काही वंचित पात्रांपैकीच एक म्हणजे “दुशाला”…

 

dushala-inmarathi

 

१०० कौरवांची आणि पांडवांची एकुलती एक बहिण होती दुशाला. हिच्या बद्दल आपण क्वचितच कधी ऐकले असेल. पण पुराणांत दुशाला बाबत देखील अनेक कथा आणि संदर्भ आढळतात.

दुशाला ह्या आपल्या एकुलत्या एक बहिणीला पांडवांनीच विधवा केले होते. पांडवांनी दुशालाच्या पतीची हत्या केली होती.

दुशाला ही धृतराष्ट्र आणि गांधारीची मुलगी आणि कौरव-पांडवांची बहिण होती. आपल्याला हे तर माहित आहे की, गांधारीला १०० पुत्रांचे वरदान होते.

पण ह्या पुत्रांसोबतच गांधारी आणि धृतराष्ट्रला दुशाला नावाची मुलगी देखील होती.

अर्थातच, ती एकुलती एक राजकुमारी होती म्हणूनच लहानपणी पासूनच ती अतिशय लाडात वाढली होती. सगळेच तिच्यावर खूप प्रेम करायचे.

दुशाला ही मोठी झाल्यावर तिचा विवाह सिंधू राज्याचा राजा जयद्रथ ह्याच्याशी झाला. आणि येथूनच दुशालाच्या जीवनाचा दुसरा अध्याय सुरू झाला.

 

dushala-inmarathi01

हे ही वाचा – महाभारतातील रील लाईफ मधला ‘अर्जुन’ रिअल लाईफ मध्ये देखील ‘अर्जुन’ का बनला?

राजा जयद्रथ हा अतिशय शूरवीर होता, तशी त्याची ख्याती होती. पण त्यासोबतच तो त्याच्या दुटप्पी आणि स्त्रीलंपट व्यक्तिमत्वासाठी देखील ओळखला जायचा.

जयद्रथ हा भलेही शूर असेल, पण त्याची महिलांप्रती वागणूक अतिशय वाईट होती. कधी तो महिलांशी चांगली वागणूक ठेवायचा तर कधी अगदीच वाईट वागायचा.

 

dushala-inmarathi02

 

त्याच्या या वागणुकीला दुशाला बरीच वैतागली होती. पण ती ह्याबाबत नाही कोणाला सांगू ही शकत नव्हती नि आपल्या पतीचा विरोध ही करू शकत नव्हती.

त्यामुळे ती हा सर्व अत्याचार निमूटपणे सहन करत राहायची.

पण जयद्रथने आपल्या वागणुकीच्या सर्व मर्यादा तेव्हा पार केल्या, जेव्हा त्याने पांडवांची पत्नी द्रौपदीचे अपहरण केले.

 

dushala-inmarathi06

 

त्याच्या ह्या कृत्याने पांडव संतापले आणि ते द्रौपदीला जयद्रथच्या तावडीतून सोडवण्यासाठी, जयद्रथला त्याच्या कृत्याची शिक्षा देण्यासाठी निघाले.

संतापलेल्या पांडवांच्या हाती जेव्हा जयद्रथ लागला तेव्हा त्यांनी त्याच्या या अपराधासाठी त्याचे शीर कापण्याचा निर्णय घेतला.

पण द्रौपदीने त्यांना असे करण्यापासून थांबवले.

 

dushala-inmarathi08

 

द्रौपदीने आपल्या पतींना थांबवले आणि समजावले की, जयद्रथ कितीही वाईट असला तरी तो तुमच्या बहिणीचा पती आहे. जर त्यांनी जयद्रथला मारले तर त्यांची बहिण विधवा होऊन जाईल.

पण पांडवांनी जयद्रथला त्याच्या ह्या कृत्याची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला होता, म्हणून त्यांनी त्याचे प्राण तर नाही घेतले. पण जयद्रथचे मुंडण करवले.

ज्यामुळे त्याला त्याच्या अपराधाची जाणीव होत राहील.

ह्या घटनेनंतर जयद्रथला आपल्या करणीवर पश्चाताप झाला, त्याला स्वतःचीच लाज वाटली. म्हणून त्याने या कृत्याचे प्रायश्चित करण्याकरिता भगवान शंकराची तपस्या करण्यास सुरवात केली.

त्याची तपस्या बघून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि वरदान दिले.

 

Lord Shiva Birth.Inmarathi2

 

जेव्हा दुशालाला ही महिती मिळाली की, जयद्रथ त्याच्या कृत्यासाठी प्रायश्चित करतो आहे तेव्हा तिला खूप आनंद झाला. तिला वाटले की आता तिच्या पतीला त्याच्या चुकांची जाणीव झाली आहे.

आणि म्हणून तिने त्याला माफ केले.

पण जयद्रथ अजूनही पूर्णपणे बदलला नव्हता. त्याच्या मनात पांडवांबाबत रोष अजूनही होता.

काही काळाने जेव्हा महाभारताचे युद्ध सुरू झाले तेव्हा दुर्योधनाने जयद्रथला कौरवांकडून लढण्यासाठी, त्यांच्या सेनेत सामील होण्याचे निमंत्रण दिले.

जयद्रथने दुर्योधनचे निमंत्रण स्वीकारले आणि तो कौरवांकडून युद्ध करण्यासाठी निघाला.

 

 

युद्धादरम्यान जयद्रथने अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू याची हत्या केली. आपल्या प्रिय पुत्राच्या हत्येची माहिती मिळताच अर्जुन संतापला आणि त्याने श्रीकृष्णाच्या मदतीने जयद्रथला कंठस्नान घातले.

 

dushala-inmarathi05

हे ही वाचा – उर्वशीने दिलेला ‘नपुंसकत्वाचा’ शाप अर्जुनासाठी ‘वरदान’ कसा ठरला? हे वाचा

महाभारताचे युद्ध संपल्यानंतर काही वर्षांनी अश्वमेध यज्ञासाठी अर्जुन नकळत सिंधू राज्यात प्रवेश करता झाला. त्यावेळी दुशाला हिचा पुत्र सिंधू राज्याचा राजा होता.

आपल्या पित्याला मारणारा अर्जुन आपल्या राज्यात येतो आहे हे कळताच दुशालाचा मुलगा भयभीत झाला आणि त्याने आपले प्राण त्यागले.

 

dushala-inmarathi04

 

आधी पती आणि मग मुलाच्या विरहाने दुशाला व्याकूळ झाली, दुखी झाली. दुशाला ने अर्जुनाला तिचा वंश वाचविण्याची विनंती केली.

तेव्हा अर्जुनाने दुशालाच्या पुत्राला राज्याच्या गादीवर बसविले आणि संपूर्ण सम्मानासहित सिंधू राज्याचा राजा बनविले.

अशी ही दुशाला, जी महाभारतातील कौरव आणि पांडवांची बहिण असून देखील तिचे पात्र हे नेहेमी असेच वंचित राहिले.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?