चीनच्या छातीत धडकी भरणारं भारताचं “जळजळीत” अस्त्र !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

१८ जानेवारी २०१८ ला भारताने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यात शक्तिशाली अश्या अग्नी ५ क्षेपणास्त्राची पाचवी चाचणी केली. ह्या क्षेपणास्त्रा ने १४ मिनिटात ४९०० किमी. चा पल्ला पार करत लक्ष्याचा अचूक भेद घेतला.

शत्रूच्या मनात धडकी भरवणारे खरे तर चीन च्या गोटात खळबळ माजवणाऱ्या ह्या क्षेपणास्त्राने भारताला काही मोजक्या देशांच्या पंक्तीत नेऊन बसवले आहे.

 

agni five inmarathi

 

तब्बल ५५०० ते ५८०० किमी पल्ला असणाऱ्या व १५०० किलोग्र्याम पर्यंत अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल हे क्षेपणास्त भारताच्या भात्यातील घातक समजले जाते.

चीन च्या मते ह्याची क्षमता ८००० किमी पेक्षा जास्त आहे. परंतु आंतराष्ट्रीय मंचावर भारत जाणून बुजून ह्याचा पल्ला कमी सांगत आहे.

चीन हि ओरड का करत आहे आणि भारत का ह्याची क्षमता कमी सांगत आहे हे समजून घेणं रंजक आहे.

कोणत्याही क्षेपणास्त्राचा पल्ला हा तो वाहून नेऊ शकत असलेलं फ्युल आणि ते वाहून नेऊ शकत असलेली शस्त्र ह्यावर अवलंबून असतो. अग्नी ५ हे जगातील अत्याधुनिक असं घातक क्षेपणास्त्र आहे.

ट्रायडेंट हे युनायटेड किंगडम चं असंच आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे.

 

1097px-Trident_I_C-4_missiles united kingdom inmarathi
National Museum of the U.S. Navy

अग्नी ५ मध्ये ३ स्टेज असून त्यात सॉलिड प्रोपेलंट चा वापर केलेला आहे. तर ट्रायडेंट मध्ये हि ३ स्टेज असून सॉलिड प्रोपेलंट वापरल आहे.

ट्रायडेंट चं वजन ५९ टन असून ते १३.५ मीटर लांब २.१ मीटर व्यासाचं आहे. तर अग्नी ५ चं वजन ५० टन असून ते १७.५ मीटर लांब आणि २ मीटर व्यासाचं आहे.

अग्नी ५ चं वजन कमी असण्याचं प्रमुख कारण म्हणजे – ते पूर्णतः कम्पोझीट मटेरियल नी बनवलेलं आहे.।

ट्रायडेंट च्या तुलनेत अग्नी चा व्यास कमी असला तरी अग्नी ची लांबी तुलनेने अधिक आहे. ह्यामुळे दोन्ही क्षेपणास्त्र जवळपास सारखंच फ्युल नेऊ शकतात.

पण ट्रायडेंट ची रेंज तब्बल १२,००० किमी ची आहे. पण त्या तुलनेत अग्नी ५ ची रेंज फक्त ५००० किमी आहे.

जवळपास सारखीच तांत्रिक रचना असताना रेंज मधील हि तफावत भारत जाणूनबुजून निर्माण करतो आहे – असं बऱ्याच राष्ट्रांचं म्हणणं आहे.

तर “भारत कोणत्याही स्पर्धेत नाही” हे दाखवण्यासाठी भारत आपल्या क्षेपणास्त्राची क्षमता कमी सांगतो आहे.

 

agni five range inmarathi

 

एक लक्ष्य भेद्ल्यावर आपण नवीन लक्ष ठेवतो आणि ते आधी गाठलेल्या लक्ष्यापेक्षा अजून जास्ती उंचीवरच असते…!

अग्नी ५ यशस्वी होताच भारताने पुढल्या लक्ष्यावर आपली नजर वळवली आहे – ते आहे अग्नी ६ किंवा सूर्य मिसाईल.

हे मिसाईल पाणबुडी वरून डागता येऊ शकणार असून जवळपास १०,००० किमी चा पल्ला असणार हे क्षेपणास्त्र ३००० किलोग्र्याम वजनाची अण्वस्त्र वाहून नेऊ शकणार आहे.

त्याचा पल्ला अजून गुलदस्त्यात असला, तरी अग्नी ६ वेगळ्याच कारणांसाठी घातक असणार आहे.

ते म्हणजे Multiple Independently Targetable Reentry Vehicle (MIRV) त्याच्या सोबत आहे Maneuverable reentry vehicle(MaRV).

ह्या दोन्ही गोष्टी अग्नी ६ ला आणि त्यायोगे भारताला एका वेगळ्याच उंचीवर नेणार आहेत.

Multiple Independently Targetable Reentry Vehicle (MIRV) म्हणजे एकाच क्षेपणास्त्र मधून अनेक अनेक क्षेपणास्त्र.

अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं झाल तर रामायण सगळ्यांनी बघितलं आहे. त्या युद्धात रामाने एक बाण हवेत सोडल्यावर त्यातून अनेक बाण निघून राक्षसी सेनेला घायाळ केल्याचं बघितल्याचं आठवत असेल…!

MIRV म्हणजे तेच…!

एक “अग्नी ६” डागल्यावर हवेतल्या हवेत शत्रूवर हल्ला करताना त्यातून अनेक वेगळी क्षेपणास्त्र, अण्वस्त्र वेगवेगळ्या शत्रूच्या ठिकाणावर एकाच वेळी हल्लाबोल करतील.

ह्यातून एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणची शत्रूची ठिकाणं उध्वस्त करता येतील. काही मोजक्या देशांकडे असलेल हे प्रगत तंत्रज्ञान भारताच्या अग्नी ६ मध्ये असणार आहे.

 

agni six surya missile india

 

Maneuverable reentry vehicle हे अजून वैशिष्ठ अग्नी ६ ला प्रचंड ताकद देते.

एकदा लक्ष्यावर हल्ला केल्यावर, समजा, लक्ष्य बदललं किंवा त्याचं स्थान बदललं तर त्याप्रमाणे हवेतल्या हवेत हे क्षेपणास्त्र किंवा त्यातील अण्वस्त्र हे आपलं लक्ष्य हवेतल्या हवेत बदलवून लक्ष्याचा भेद करण्यात सक्षम असतील.

ह्याला “होमिंग गाईडनन्स सिस्टीम” लागते – जी हे नक्की करते कि रस्ता बदलून सुद्धा क्षेपणास्त्र ठरलेल्या ठिकाणी त्याची कामगिरी फत्ते करेल.

आता ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला दूरवरून नियंत्रित करता आल्या किंवा डागता आल्या तर शत्रूला कळायच्या आधी त्याचं खूप मोठं नुकसान झालं असेल.

इच्छुकांनी पुढील व्हिडीओ जरूर बघावा :

 

 

अग्नी ५ च्या सगळ्या चाचण्या आत्तापर्यंत यशस्वी झाल्या असून ते भारताच्या संरक्षणासाठी लवकरच सज्ज झालेल असेल.

अग्नी ५ च्या ह्या यशस्वी चाचण्यांमुळे भारत असं तंत्रज्ञान बाळगणारा जगातील मोजक्या देशांच्या पंक्तीत विराजमान आहे. काही लोकांना असंही वाटू शकेल हि स्पर्धा कुठवर आणि कितपत न्यायची.

पण जिकडे आपले शेजारी १२,००० किमी ची क्षेपणास्त्र बनवून बसले आहेत तिकडे आपल्या संरक्षणासाठी आपण सज्ज राहायला हवंच.

गेल्या हजार वर्षांच्या इतिहासात भारताने ना कोणत्या देशावर आक्रमण केलं ना कोणत्या देशाचं अस्तित्व पुसलं. जी काही युद्धं लढली ती आपलाच भूभाग वाचवण्यासाठी.

ह्यामुळे भारताची महत्वाकांक्षां हि “जगातील सर्वात प्रबळ आणि शक्तिशाली देश बनून इतरांना गुलाम बनवण्याची” नसून आपल्यावर “होणाऱ्या हल्याला तितक्याच ताकदीने प्रतिउत्तर देण्याची” आहे.

ह्याची जाणीव एक भारतीय म्हणून आपल्याला असायला हवीच. अग्नी ५ च्या यशासाठी डी.आर.डी.ओ. चे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि अभियंते ह्यांच अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “चीनच्या छातीत धडकी भरणारं भारताचं “जळजळीत” अस्त्र !

 • March 9, 2018 at 6:56 pm
  Permalink

  अप्रतिम माहिती सर… धन्यवाद….

  Reply
 • April 6, 2018 at 9:06 am
  Permalink

  video is fan made. Soyuz rocket is used in first image and second image used does not belong to indian base. same with third image and 4th shows PSLV/GSLV and not Surya.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?